सुविचार- विद्या विनयेन शोभते
सुविचार- विद्या विनयेन शोभते
अनाज चा इंजिनियरिंग चा रिझल्ट लागला. तो फर्स्टक्लास ने पास झाला. परिक्षेसाठी त्याने खूप मेहनत घेतली. होती. दिवसरात्र तो अभ्यास करत असे. टि.व्ही,मोबाईल ,मित्रमंडळी ,नातेवाईक सगळ्यांना विसरून अभ्यासात झोकून दिले होते त्याने. कित्येकदा बसून बसून पाय दुखायचे. आई त्याला तेलाने मॉलिश करुन द्यायची. बाबा परवडत नसले तरी तो सांगेल ती पुस्तके आणून देत. पैशासाठी त्यांना वेळेला ओवरटाईम करायला लागत असे.पण मुलगा चांगला शिकतोय हा आनंद खूप मोठा होता. त्यामुळे ते दमत नसत.तसेच त्याची बहीण माई देखिल भावाची काळजी घेत असे. त्याचे खाणेपिणे ,मूड्स सांभाळत असे. तिही त्याच्याएवढीच हुशार होती.
पूर्ण कुटुंबाच्या सहकार्यामुळेच त्याला उत्तुंग यश मिळाले होते.त्याला चांगले गुण मिळाल्यामुळे अधिकारपदाची नोकरीही लगेच मिळाली.समाजात त्याला खूप मान मिळू लागला कारण खूप लहान वयात त्याने मोठे यश संपादन केले होते.
पण इतक्या लहान वयात आपल्याला मान मिळतोय ते पाहून त्याच्या डोक्यात हवा शिरली.जसे बाहेर त्याला मान मिळतो तसाच मान घरातही मिळावा. त्याची खातिरदारी व्हावी असे त्याला वाटू लागले.तो जरा ताठ्यातच वागू लागला. त्याचे ते वागणे त्याचे आई वडील बहिणीला आवडत नसे पण काय करणार नात्यांची गोडी तो विसरला होता. एव्हडेच नव्हे तर तो जुन्या मित्रांनाही ओळख दाखवेनासा झाल.
कामावरील वयस्कर लोकांना ते पदाने कमी असल्यामुळे कसेही बो
लत असे .त्यांचे अपमान करीत असे.तो आपल्याच धुंदीत राहू लागला. पण कोणीच त्याला बोलू शकत नव्हते.
कंपनीने त्याला गाडी ,ड्रायव्हर ,प्लॅट दिला.प्लॅट प्रशस्त मोठा होता. त्याने आई, वडील ,बहीण यांना तेथे रहायला बोलावले पण आहे तिथेच खूश असल्याने व त्याच्या बदललेल्या स्वभावामुळे त्यांनी त्याच्याबरोबर जाण्याचे टाळले. आम्ही मागावून येतो तू पुढे जा. असे सांगितले. तो तरिही एकटा निघाला. नशिबाने दिलेय पण आपल्या अाई बाबांना घेता येत नाही . या रागात तो निघून प्लॅट मध्ये रहावयास गेला.त्याच्या कामात तो इतका गुंतला की त्याने आईवडिलांची खबरबात ही घेतली नाही .
इकडे अनाज च्या शिक्षणासाठी कर्ज काढले होते.ते फेडताना आईवडिलांना त्रास होऊ लागला.व्यवहाराची खेचाखेच होऊ लागली. त्यात त्याचे बाबा खूप आजारी पडले. कर्णोपकर्णी त्याच्या कानी ही गोष्ट गेली. तो मनोमन लाजला.धावतच बाबांना भेटायला गेला. डॅा . ना भेटला कितीही खर्च झाला तरी चालेल या गोष्टीसाठी तो चक्क त्यांच्या पाया पडला. ते पाहून त्याचे आई बाबा सुखावले. बाबा हळूहळू बरे होऊ लागले. अनाज तो कुटुंबापासून किती दूर गेला याची जाणीव झाली. नुसती विद्या यश असून चालत नाही. त्याबरोबर विनयशीलपणा ही हवा हे त्याला पटले. हळूहळू त्याच्या विनयशीलतेने त्याच्यापासून दूर गेलेले जवळ आले.
त्याने सर्वांची माफी मागितली . विद्या विनयेन शोभते. याची त्याला पुरेपूर जाणीव झाली.