सुविचार - नेहमी खरे बोलावे
सुविचार - नेहमी खरे बोलावे


सुविचार - नेहमी खरे बोलावे
राज हा अतिशय हुशार मुलगा होता. अगदी चुणचुणीत.सर्वांचा लाडका.दिसायला गोरापान.सर्वांना हवाहवासा.पण का कोण जाणे समज वाढायला लागल्यावर तो खोटे बोलू लागला. शाळेला उशीर झाला की तो चेहर्यावर भोळे भाव आणून खोटी कारणे सांगायचा.त्याच्या भोळ्या चेहर्याकडे पाहून बाई त्याला माफ करत.हळूहळू तो आई ,बाबा ,मित्र ,शेजारी यांच्याशीही खोटे बोलू लागला. नव्हे तर खोटे बोलल्याशिवाय त्याला चैन पडत नसे.सगळे गुण चांगले होते ,पण ही नको असलेली सवय त्याला लागली होती.हळूहळू आईच्या लक्षात आले आपले हुशार बाळ हल्ली खोटे बोलू लागलेय. तिने जवळ बोलावून त्याला समजावले, "बेटा तुू हुशार आहेस पण खोटे बोलण्याची सवय कधीही वाईट. या मुळे तू कधीतरी संकटात पडशील .एकदा खोटे बोलले की शंभर वेळा खोटे बोलावे लागेल. " "असे नाही ग आई मी नाही ग खोटे बोलत. " असे म्हणत त्याने आईच्या गळ्याला वेढा घातला. आईने हसत त्याला मिठीत घेतले. गोड पापा घेत माझ्या सोन्या नको हं खोटे बोलूस असा प्रेमळ इशारा दिला.
पुन्हा आपण खोटे बोलायचे नाही असा मनाशी विचार करत राजू झोपी गेला .पण काही वेळा लागलेली सवय लवकर सुटत नाही .मोह होतोच .सकाळी तो लवकर उठला.त्याला फिरायला जायचा मोह झाला .आई पाठवणार नाही म्हणून त्यांनी खोटे कारण सांगितले .शाळेत स्पोर्ट्स चालू आहेत म्हणून सरांनी लवकर बोलावले आहे .प्रॅक्टिसला मला जावयाचे आहे .
आईने लवकर तयारी केली व तो खुशीत बाहेर जायला निघाला .जाता जाता मित्राच्या घरी गेला व त्यालाही सोबत घेतले .रुद्राक्ष त्याला नको नको म्हणत असताना तो त्याला घेऊन बागेत गेला .बागेत दोघे गप्पा मारत बसले तेव्हा आपले वडील खूप श्रीमंत आहेत त्यांच्याकडे खूप पैसा आहे असे त्यांने रुद्राक्षाला सांगितले .तेथेच एक चोरांची टोळी होती त्यांनी ते ऐकले .या दोघांना पळवले तर आपल्याला खूप पैसा कमावता येईल असे त्यांना वाटले .त्यांनी त्याला हाक मारली व चॉकलेट खाण्यास दिले .रुद्राक्ष नको नको म्हणत असताना राज ने चॉकलेट घेतली व दोघांनी खाल्ली.चॉकलेट खाताच दोघांचीही शुद्ध हरपली.त्यांनी त्यांना हळूच उचचले व गाडीत घालून घेऊन गेले .
इथे संध्याकाळ झाली तरी राज घरी परतला नाही . राजच्या आईला टेन्शन आले .तिने रुद्राक्षाच्या घरी फोन केला .तिथेही तीच परिस्थिती होती .
दोन्ही कुटुंबे लगबगीने शाळेत गेली.एव्हाना शाळाही बंद झाली होती. परंतु वॉचमनने मुख्याध्यापकांना फोन केला . शिक्षक व मुख्याध्यापक शाळेत पोहोचले.माहिती काढली असता असे कळले की आज राज व रुद्राक्ष दोघेही शाळेत आले नव्हते .किंवा कोणतीही स्पोर्ट्सची प्रॅक्टिस नव्हती .एवढी हुशार मुले खोटे का बोलतात याचे सगळ्यांना आश्चर्य वाटले .तसेच ती कोठेतरी फसल्याची जाणीवही झाली .
चौघे तसेच पोलिस स्टेशनला गेले व मुले हरवल्याची तक्रार नोंदवली .
इथे चोरांनी त्या दोघांना एका खोलीत डांबले होते .दोघांच्या पालकांकडून किती पैसे मागायचे असे ठरवत होते .आमचे पालक भरपूर पैसे देण्या इतके श्रीमंत नाहीत असे ते दोघेही त्यांना विनवून सांगत होते .राजने अखेरीस तो हे सारे खोटे बोलत होता त्याचा परिणाम आहे हे त्यांना सांगितले .मनोमन आईला दिलेले प्रॉमिस तोडले यांचेही त्याला वाईट वाटत होते .खरेच खोटे बोलण्याचा दुष्परिणाम त्याला जाणवत होता .
आता यातून बाहेर कसे पडायचे याचा तो विचार करीत होता कारण तो बुध्दीनेही तल्लख होता .तरी आपण कोरले गेल्याचे पूर्ण न्याहाळले.त्या माणसाचे बोलणे काळजीपूर्वक ऐकले .त्यात दोन माणसे खूप दयाळू होती.त्यांना या मुलांचे हाल बघवत नव्हते .राजनी त्याच गोष्टीचा फायदा घ्यायचे ठरवले .
त्याने त्या दोघांना जवळ बोलावले व खूप भूक लागल्याचे सांगितले .त्या दोघांना थांबवून बाकीच्यांना खायला आणायला पाठवण्यात आले .बाकीचे गेल्यावर राजने चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याचे सोंग केले .त्या बरोबर दोघेही घाबरले व त्यांचे राजाचे हातपाय सोडवले .एक जण पाणी आणायला धावत आतमध्ये गेला .तेवढ्यात जवळच असलेली बंदूक पटकन उचलून त्यांच्या पाठीवर ठेवली व हात वर करायला सांगितले .दुसऱ्याला बाहेर बोलावले
ते दृष्य पाहून दुसरा घाबरला .त्यांनी रुद्राक्षाचे हातपाय सोडवले .राजने दोघांनाही आतल्या खोलीत जाण्यास सांगितले .पटकन तेथून दोघांनी पळ काढला .दरवाजाला बाहेरून कडी लावली.
धावत धावत दोघे रस्त्याजवळ आले व त्यांनी रिक्षा पकडली .घराजवळ येताच रिक्षावाल्याला तेथे थांबवून दोघांनी घरात पळ काढला. राजच्या आईबाबांना समोर राज व रुद्राक्ष पाहून जीवात जीव आला .त्यांनी रिक्षावाल्याला पैसे देण्यास सांगितले .तोवर रुद्राक्षाच्या आई वडिलांना तसेच पोलिस स्टेशनला फोनवरून मुले आल्याचे राजाच्या आईने सांगितले .तात्काळ सगळे राजच्या घरी पोहोचले .मुख्याध्यापक व शिक्षकही तेथे पोहोचले .राजने घडलेली सर्व हकिकत त्यांना सांगितली.
पोलिसांनी तात्काळ हालचाल करून सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन चोरांच्या टोळीला ताब्यात घेतले .
मुलांनो राजूचा खोटे बोलण्याच्या सवयीमुळे तो संकटातसापडला.हुशारीमुळे त्यांनी त्याची सुटका करून घेतली .राज हुशार नसता तर त्याला ते किती भारी पडले असते .
राजाने सर्वांसमोर कान पकडून पुन्हा कधीही खोटे न बोलण्याची शपथ घेतली .