सुपर हिरो
सुपर हिरो
लहानपणा पासून आता पर्यंत त्याने मला गुड मॉर्निंग म्हटल्याशिवाय कधी घराबाहेर पडलाच नाही लहानपणी घरी आल्यावर दोन्ही मुठी बंद करून माझ्यासमोर उभा राहायचा आणि जादू केल्या प्रमाणे बंद मुठी तुन चॉकलेट काढायचा रविवार तर त्याचा माझ्यासाठी च असायचा दिवसभर माझ्याबरोबर खेळून संध्यकाळी मला फिरायला नेणे आणि मागते ते देणे आणि ,मला खुश ठेवणे हा त्याचा अट्टाहास आणि तो अट्टहास त्याने अजूनही जपला आहे लहानपणा पासून माझ्या मित्र मैत्रिणींना कोणाला स्पायडर मॅन तर कोणाला बॅट मॅन आवडायचा पण मला मात्र सुपर हिरो म्हणून माझा बाबाचं आवडायचा आणि का आवडू नये माझा बाबा माझ्यासाठी सुपर हिरोच आहे जे सुपर हिरो करतो ते सगळे बाबा माझ्यासाठी करतो जसा सुपर हिरो लढतो तसेच माझा बाबा माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवस रात्र लढत असतो सुपर हिरो जादू करू शकतो तसेच माझा बाबा माझ्यावर आपल्या प्रेमाची जादू करतो मला नेहमी हसत ठेवणे हेच त्याच्या जीवनाचे उद्देश एवढे सगळे करणारा माझा बाबा माझ्यासाठी सुपर हिरो का असू शकत नाही ...........
"हा हा "
"अहो कुठे गेलात तुम्ही केव्हाची हाक देते""
"अगं इथेच तर आहे""
"आणि हे काय "
"अगं आपल्या तनु ची डायरी मिळाली ती वाचत बसलो काय मस्त लिहिले आहे तिनी माझ्याबद्दल "
"ती आणि कशाला काढली तुम्ही आता आणि काय लिहिलंय तुमच्याबद्दल "
"तेच तर वाचत होतो आणि तू आलीस "
"पण अचानक तुम्ही तिची डायरी का काढलीस "?"
"काही नाही ग असाच ड्रावर उघडला आणि डायरी दिसली उघडली तर नेमके हेच पान हाती लागले "
"बरं आहे तुमच्यासाठी लिहिले माझ्यासाठी नाही आणि आता काय फायदा वाचून हि "
"नाही ग तुच्यासाठी पण पान आहे हा.. अरे ती तुला बरं कसं विसरेन आपली एकुलती एक लेक पण तिनी असं करायला नको होते ""
जाऊ द्या त्या गोष्टी उग्गीच जीवाला त्रास "
"पण पोटचा गोळा ना तो चिंता वाटते तिची कशी असेल काय करत असेल आमची आठवण तरी येत असेल कि नाही"
"तुम्ही म्हणताना चिंता पण मी तिच्या चिंतेने किती झुरते माझं मला माहित पण तुम्हला त्रास नको म्हणून मी काही बोलत नाही तिचा तो निर्णय तीच भविष्य ठरवणारा आहे त्याला आपण काही करू शकत नाही आणि आपली आठवण आली तरी ती कशी परतेल आम्हला सोडून त्याच्या बरोबर लग्न करताना तिने आपला विचार कुठे केला "
"हो ग बरोबर आहे तूच तिच्या सुखासाठी आपण झडलो पण तिनी मात्र आपल्याला दुःखच दिले. तो जर चांगला शिकलेला नोकरी चांगली असणारा मुलगा असता तर मी नाही म्हटले नसते पण आपल्या तनु पेक्षा कमी शिकलेला वर त्याची नोकरी हि पर्मनंट नाही मग अश्या मुलाला मी माझी मुलगी कशी देऊ "?
"पण तिने कुठे आपला विचार केला तिला तिचे प्रेम मोठे दिसले "
"हो ग माझा बाबा माझ्यासाठी माझा सुपर हिरो म्हणणारी माझी तनु तिचा जीवनाचा सुपर हिरो निवडून आमच्यापासून दूर गेली ती हि कधी न परतण्यासाठी "
"जाऊ दे बंद करा ती डायरी या बाहेर आता तिच्यासाठी तिचा बाबा सुपर हिरो नाही राहिला "
ड्रॉवर मध्ये डायरी ठेवून दोघेही आपले डोळे पुसत रूम च्या बाहेर पडले
