Meenakshi Kilawat

Inspirational

4.5  

Meenakshi Kilawat

Inspirational

सत्वपरिक्षा

सत्वपरिक्षा

3 mins
1.2K



कथा...

          सत्वपरिक्षा


      सर्व काम आटपवून दुपारी एकच्या दरम्यान वेळेत मी निवांतपणी लिहायला बसलेच होते की,दारावर टकटकचा आवाज आला. कोणीतरी बेल न वाजवता दरवाजावर उभ असल्याने मी जावून पटकन दरवाजा उघडला.शेजारची बाई दारात उभी होती.काही विचारायच्या आतच भळभळून रडायला लागली.मी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला,तोच अजूनच रडायला लागली.मला काही अनुचित घटना झाल्याची मनात कल्पना आली.मी म्हंटल,काय झाल.?तिला काही काहीतरी सांगायच होत,पण ती सारखी रडत होती.रडता रडता ती सांगायला लागली .

      आपली बाली गेली.तोच दचकून मी तिला म्हणाली ! कुठे गेली,ती म्हणाली घर सोडून पळाली. तेंव्हा माझ्या लक्षात आलय.मी म्हणाली! कुठे गेली कधी गेली,कोणासोबत पळाली,ती तशी दिसत नव्हती ,काय झालय ,थोड सविस्तर सांग बघू! ती सांगायला लागली. तो पोरगा नेहमी घरी यायचा,तुम्हीबी त्याला बघितल हाय ताई! समोरच जुणे मंदिर आहे.त्या मंदिराची देखभाल करायला म्हणुन आम्हिच त्या परिवाराला ठेवल होत.त्यामुळे ती आम्हाला जवळचे समजुन दु:खसु:ख सांगत असे , एक वेगळी रूम तयार करून त्यात त्यांच्या तीन अपत्यासह राहायचे .पती पत्नी दोन मुली व एक मुलगा,परिवार छान साधाभोळा होता. नाइट वॉचमन होता,पगार खुपच कमी ,स्वता:चे घरही नव्हते. किराया द्यायला ही पैशे नव्हते .म्हणुन तोच आला होता,आमच्याकडे ,मी इथ खोली काढून राहू कायजी,माझ्या सासऱ्यांनी लगेच होकार दिला मंदिराच्या साफसफाईला कोणीतरी पाहिजेच होता.त्यामुळे काही मदत देवून रूम उभारली,त्यात तो आपल्या परिवारासोबत राहू लागला होता. लहान लहान मुले आमच्या समोरच मोठी झालेली होती,एका मुलीच लग्न पण करून दिल होत. ही मुलगी शिकत होती ,बारावी झाली होती,बऱ्यापैकी हुशार होती.माझ्या प्रशिक्षण केंद्रात मोफत कोर्सचे प्रशिक्षण पण दोघीही बहिनींनी घेतले होते ,पुन्हा बँकेत एंजेंटशिप करित होती.सर्वांना तिचे कौतूक वाटायचे ,काहीतरी करून ती आपल्या कुटूंबाला मदत करित होती . दिसायला सर्वसाधारण सावळी पण चेहऱ्यावर तजेला व साधेपणा होता.उंच सडसडित शरीरयष्टी छान दिसायची. पण त्या गरीब परिवार दुखाच्या सागरात लोटल,करती सवरती मुलगी घरातून निघुन गेली.आईवडिलावर दु:खाचा पहाड कोसळला.ती रडत होती देव आमचीच काहून का परीक्षा पहातो,आम्ही काय बिगडवल कोणाच,दहा दिवस झाले पोरगी आली नाही,बापान तिचे कपडेलत्ते कचराकुंडीत नेवून टाकले.तिच्या शाळेचे कागदपत्र बी जारून टाकले.मले कोणीतरी सांगल का तो पोरगा दोन पोराचा बाप आहे,बायकोबी आहे,काही दिवस ठेवन आन ईकून टाकन ,मी काय करू आता,बाप जागेवरून उठाले तयार नाही .वरतून म्हणते माह्यासाठी मेली थे.आता तुम्हीच सांगा बाई,अशी माया का तुटते काजी ? माह्या पोटचा गोळा त्यो,मही माया नाही तुटनार ,का?काही तरी करा या परीक्षेच्या घडीले आमची मदत करा,तुमचे लई उपकार हाय आता अजून एक उपकार करा ,मही बाली मह्या घरी आली पाहिजेन .

    मी तिला धीर देवून माझ्या मीस्टरांना ही गोष्ट सांगितली व मी पण तिला घेवून तडक पोलीस स्टेशनला गेली.रितसर कंप्लेंट दर्ज केली,पोलीस कार्यवाही ताबडतोब कामी लागली,तब्बल दोन तासात त्या मुलाला व बालीला पोलीस स्टेशनला आणले ,तसाच एका पोलीसाने त्या मुलाच्या थोबाडित चपराख दिली.तशिच बाली कळवळली व म्हणाली त्यानले नोका मारूजी मले मारा.सारा गुन्हा माह्याकडून झाला आहे . मग परिस्थीती पाहाता इन्पेक्टरने समजावण्याचा प्रयत्न केला .त्या मुलाची पुर्ण माहिती बालीला दिली .तरी त्याचाच पक्ष घेत होती,पर्याय म्हणुन त्या मुलाच्या पत्नीला बोलवण्यात आले.तिने सोडचिठ्ठी द्यायला नकार दिला.

     नंतर बालीला एंकातात नेवून त्यांनी समजवल ,की आता तू त्या मुलाची रखैल होवून राहणार आहेस काय ? तुला त्याने लग्नाचे आमिश दाखवून तब्बल दहा दिवस नेवून ठेवले,मग लग्न का नाही केले .त्याची अशी लग्न करायची इच्छा होती व तो तुझ्यावर खरच प्रेम करत होता तर त्याने लग्न का नाही केले.टूव्हिलर विकून खोलीच भाड दिल ,,यानंतर तुझे भरण पोषण कसा करणार ,तिकडे त्याची पत्नी शेतात मजूरी करून लेकर पोसत आहे .तुला तो धंद्यावर लावणार ही गोष्ट त्याच्या मित्राकडून कळली,बाली तुला हे सर्व आवडेल काय? इन्पेक्टरने तऱ्हेतऱ्हेने तिला समजवल ,अनेक उदाहरण दिलेत.तेव्हा बालीची बोलती बंद झाली वाळलेल्या खोडासारखी खाडकण ढासळली .ती दोन दिवसाच्या प्रेमासाठी,आईवडिलाच्या प्रेमाला ठोकर मारणार होती.ही गोष्ट त्या भोळ्या भाबड्या आईवडिलांना किती पचनी पडली असती ,बिचारे मंदिरात दिवसरात्र पुजा अर्चना करणारे ,त्यांची अशी का परीक्षा बघावी. यातून ते बाहेर पडले, बालीच्या डोळ्यावरची पट्टी उतरली,तिला घरी आणुन लगेच मावशीकडे नेवून ठेवली,छानसा मुलगा भेटला तिच लग्न करून दिले.ती सुखाने तिच्या सासरी नांदत आहे. तिला दोन मुले आहेत प्रेम करणारे लोक आहेत.सुखी संसार करते आहे .. 


मीनाक्षी किलावत


8888029763


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational