स्टोरी मिररचा एक प्रवास असाही
स्टोरी मिररचा एक प्रवास असाही
मला वेगवेगळ्या विषयाची नवनवीन पुस्तके वाचण्याची आवड आहे आणि त्यात शिक्षकी पेशा. त्यामुळे पुस्तकांशी मैत्री होतीच .वाचनाबरोबरच मनातले विचार कागदावरच लिहायची हळूहळू सवय लागली. .सुरुवातीला मैत्रिणींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायची त्या कवितेतून व चारोळ्यातून. त्यांचे खूप प्रोत्साहन असायचे. एखादी कविता केली की त्यांना ती वाचून दाखवायचे. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच कविता लेखन किंवा वाचन स्पर्धेत भाग घ्यायची इच्छा झाली. कॉलेजमधल्या वेगवेगळ्या स्पर्धेत मी त्या वाचल्याही. सध्या ऑनलाईनचे युग आहे .मोबाईल शिवाय कुणाचे पान हलत नाही .मीही त्याला अपवाद नव्हते .मग कुठे कविता स्पर्धा चालू आहेत का याची शोध मोहीम सुरू झाली. पण मी ज्या ज्या वेळेस शोधत होते त्या त्या वेळेस त्या स्पर्धांची तारीख संपलेली असायची .परंतु मी माझी शोध मोहीम चालूच ठेवली आणि त्यात सफल झाले. गुगल वर सर्च करताना स्टोरी मिरर वर अशाच काही विविध स्पर्धा चालू होत्या .पण त्यातल्याही बऱ्याच स्पर्धांची सबमिशनची तारीख उलटून गेलेली होती. नशिबाने 'गौरव मराठी भाषेचा 'या स्पर्धेत अजून मुदत होती. खरं तर मराठी भाषेविषयी कविता लिहायला हवी होती पण उत्साहाच्या भरात मी वेगळ्याच विषयावर एक कविता पाठवली आणि सुदैवाने या पहिल्याच कवितेला ओथर ऑफ द विक चे नॉमिनेशन मिळाले. खूप आनंद झाला .सर्वांनी केलेले कौतुक स्वीकारले. पण पुढे क्लॅप मिळवण्यासाठीची धडपट सुरू झाली. काही करता काही समजेना काय करायचे . बऱ्याच जणींना विचारले. त्यांनाही लिंक ओपन होईना. जास्तीत जास्त क्लॅप मिळवण्यात यश आले नाही .शोध मोहीम सुरूच होती. सर्वांची पेपर तपासणी व निकाल तयार करण्याची घाई असल्याने या गोष्टीकडे जास्त कोणी लक्ष देऊ शकले नाही. परंतु पहिल्याच कवितेला मिळालेले नॉमिनेशन मला माझ्यातल्या कवी मनाला खुणावू लागले. अजून कोणत्या स्पर्धेत मला भाग घेता येतो का हे बघू लागले. विचार प्रत्यक्ष कागदावर लिहून त्यांचे कवितेत रूपांतर करू लागले. रोज सकाळी पहिल्यांदा वेगवेगळ्या विषयावर येणारा एखादा शब्द व त्याचे कोट्स तयार करून मी पाठवू लागले .मनातल्या सर्व कल्पना, विचार, आवड प्रत्यक्षात उतरवताना होणारा आनंद खूप वेगळाच .हे सर्व स्टोरी मिरर मुळे. त्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद. माझा हा प्रवास सुरू ठेवण्यासाठी स्टोरी मिररची मिळालेली साथ अनमोल आहे. अजूनही मी शिकते आहे. मी लिहिलेल्या कविता कथा कोट्सविषयीच्या प्रतिक्रिया कळवा. पुनश्च एकदा स्टोरी मिरर प्लॅटफॉर्म वरील सर्वांचे मनःपूर्वक आभार.
