स्त्री
स्त्री
सरीताचे सासरे आजारी पडले, सुनेच्या रुपात नर्सची भूमिका ती पार पाडायची, नवऱ्याला दररोज सकाळी लवकर उठून डबा तयार करून द्यायची, सासूसोबत बसून मनमोकळ्या गप्पाही मारायची अगदी माय-लेकीसारख्याच... मुलीची मैत्रीण बनून तिच्याशी मनमोकळं हसायची, ऑफिसमध्ये बॉस असली तरीही सगळ्यांची ममतेने काळजी करायची व वेळप्रसंगी रागेही भरायची... शेवटी स्त्री हे वरदान आहे, तिच्या अनेक छटा आहेत.
