स्त्री शक्तिची एक मिसाल
स्त्री शक्तिची एक मिसाल


समूह च्या सदस्यांन्ना व वाचकांन्ना माझा पुनः नमस्कार . सर्वात अधि माझे मागचे लेख आपण सर्वान्नी मनापासून वाचले , आणि तुम्हाला आवडले पण तर त्या साठी तुम्ही सर्वांचे खूपच आभार .
पुनः एकदा एक खरी कहाणी आपल्या समोर घेऊन येती आहे , वाचाल तर मग .
ही कहानी आहे नाशिक च्या कधीकाळी महाविद्यालयीन हॉकी संघाणी गोलकीपर आणि एथलीट म्हणून मैदान गजवीणाऱ्या पंचवटीतील विडी कामगार वसाहतीतील कल्पना यशवंत नेमाडे या एका पदवी वर रिक्षाचालक महिलेची, सध्या आजारी मुलाएवजी स्वतःच रिक्षा चालवून कुटुंबाचा उदर निर्वाह ती करते .
कल्पना या अर्थशास्त्रातिल पदवीवर आहेत . केटीएचएम महाविद्यालयात असताना क्रीडांगण गाजविणारी ही महिला 20 वर्षा पासून एक मुला व एक मुली सह राहते । दोनी मुलांन्ना सोडून पति परांगदा झाले । पण तरी ही कल्पना ने आपली हिम्मत हारली नाही .
घर चालविण्यासह कॉन्वेंट शाळेला मुलांचे संगोपन करण्या साठी, मिळेल ते काम करून चारितार्थ चालवावा लागला . मुलगी शिकली पण आणि इंजीनियर झाली सुद्धा . मुला ला मात्र शिक्षण्या च्या मधेच शाळा सोडावी लागली । घरा मधे मदद करण्या करिता मुलगा रिक्षा चालवायला शिकला . मुलगा कर्ता झाला म्हणून कल्पना ने त्याला रिक्षा घेऊन दिली .
त्या नंतर दोन महीने सर्व ठीक चालले होते , मात्र रिक्षा थांब्यावर नंबर मध्ये काही प्रवांश्यांन्ना भाड़े आकारण्याच्या कारणावरून इतर काही रिक्षा चालकांशी वाद झाला, त्या तकरारीत मुलाचा उजवा हाताचा खूबा निकासी झाला , आणि कुटुंब च्या जीवन यापना साठी व दैनंदिन गुजराण करण्या साठी पुनः तिला रिक्षाचा आधार घ्यावा लागला .
आज ही ती यशस्वी पणे आपल्या कुटुंबाचे सारथ्य करते आहे . वीस वर्षा पासून विविध संकटांन्ना सामोरी जाऊंन सुद्धा त्या खूपच हिम्मतीने सर्व काम पार पाडतात आहे आणि ते त्यांच्या आयूष्या ला बळ देणार ठरेल .
म्हणून आपण म्हणतो न कोणते ही काम कधी ही मोठ छोट नस्त, व्यक्ति मधे काम करायची जागरूक इच्छा असली पाहिजे . जीवना मधे कोणते पण काम जर मनाने करायचे ठरविले न तर ते नक्की पूर्ण होतात , हे कल्पना ताईंन्नी पूर्ण करून दाखविले सुद्धा .
आम्ही सर्व महिलान्ना त्यांचा फारच अभिमान आहे आणि स्त्री शक्ति ची एक मिसाल कायम करण्यात आली आहे .
तर त्या महान यशस्वी स्त्री शक्तिला वारंवार आमचा नमस्कार आहे . तर मग सांगाल तर कसा वाटला माझा हां आजचा लेख .
धन्यवाद तुम्ही सर्व वाचकांन्ना .