Deepali Thete-Rao

Inspirational


4.0  

Deepali Thete-Rao

Inspirational


स्त्री अभिमान

स्त्री अभिमान

2 mins 253 2 mins 253

भीमा शेजारच्या गावातील हणमंताबरोबर कुस्ती जिंकला. त्याला खांद्यावर घेत गावकऱ्यांनी मिरवणूक काढली. त्याची आई आणि लहान बहीण साळू दारात वाट पाहत होत्या. भीमाला मिरवत आणत होते. पुढे एक जण विजयाचा भगवा नाचवत होता. 


"आये ! मला बी नाचवायचा हाय झेंडा. लई आवडत बघ मला. आन भैय्यासारखी कुस्ती बी खेळायची हाय. बाबा खेळायचा.. भैय्या खेळतो...आता मी बी खेळणार..." साळू आनंदानं बोलत होती.

 

"येडी का खुळी तू? अंगापिंडानं दणकट हायेस पर म्हनून काय गडी माणसांशी बरोबरी करनार हायेस का? अगं! मुलीची जात... जरा सैपाकपान्याचं, निवडानिवडीचं बघ की. ह्ये असं खुळ्यावाणी कुस्ती-बिस्ति काय बोलतियास.." माय रागं भरली.


मिरवणूक दारापत्तूर आली. लगबगीने पुढं होत मायनं भैय्याला ओवाळलं. भाकर तुकडा फिरवला. 


...साळू मनातून खट्टू झाली. मुलगी असंन तरी काय झालं... ती रोज घरातल्या घरात जोर-बैठका मारू लागली माय समोर नसताना...


मूळची हट्टी कट्टी साळू आता एकदम तब्येतीने मजबूत वाटायला लागली. शेजारपाजारचे तिच्या अंगयष्टीवरून कुजबुजायला लागले...


"पोरीच्या जातीला नाजूकपणा हवा. हीच लग्न तरी कसं व्हायचं. "


"बया! जरा म्हनून कुठं बाईपन नाय अंगात"

........................... 

पाऊस रपारप पडत व्हता. नदीला ह्येsss पानी आलं.... पार पुला पतुर... छोटा पूल पाण्याखाली गेला. नदीकडंच्या वस्तीत पाणी भरलं. 


घरच्या-घर पाण्याखाली गेली. सगळीकडे बोंबाबोंब सुरू झाली. गावातून लोकं मदतीला धावली. साळूही पळाली.. माय नको नको म्हणत असताना...


गडी माणसांच्या बरोबरीनं साळूनं स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवण्याचं काम केलं. कित्येक मायलेकींना हातानं भक्कम आधार देत सुखरूप वरच्या अंगाला घेऊन आली. अख्ख्या गावाला त्यादिवशी लय कौतिक वाटलं साळूचं. 


वातावरण स्थिरस्थावर झाल्यावर सरपंचांनी ठरवलं.... साळूचं जाहीर कौतुक करायचं. सगळ्या गावाला तिचा अभिमान वाटत होता. बोलणारी तोंडं आता कौतुकांच्या नजरांमध्ये बदलली होती. लेकीबाळींकडे बघण्याची दृष्टीही.... 


आता साळूला कुणी कुस्तीवरून बोलणार नव्हते...

 

समारंभानंतर बैलगाडीतून "केशरी" फेटा घातलेल्या साळूला मिरवत आणत होते. काय वाटलं कुणास ठाऊक मध्येच साळू गाडीतून खाली उतरली अन् अभिमानानं तिनं भगवा हातात घेतला. 


एक अनामिक लहर सर्वांगावर पसरली आन् बेभान होऊन ती भगवा उंच आकाशात धरून नाचवू लागली...

 

मिरवणूक घरापर्यंत आली.

 

डोळ्यात कौतुकाचे आनंदाश्रू घेऊन माय तिला औक्षण करण्यासाठी दारात उभी होती.

 

दिव्याच्या ज्योतीचा... अभिमानाचा... ताकदीचा... "केशरी" उजेड घरभर पसरला होता.... 


Rate this content
Log in

More marathi story from Deepali Thete-Rao

Similar marathi story from Inspirational