STORYMIRROR

Achala Dharap

Inspirational

3  

Achala Dharap

Inspirational

स्पर्श

स्पर्श

1 min
196

  अबोली अगदी नावाप्रमाणेच नाजूक ! गोड बोलणारी आणि हुशार मुलगी. पदवीधर झाल्यावर नोकरी करुन आपल्या पायावर उभ रहायच आणि पैसे जमवुन बाबांना मदत करायची अस तिने ठरवल. मग नोकरी साठी स्पर्धा परीक्षेची तयारी, कुठे जागा असेल तिथे अर्ज करायला तिनी सुरवात केली. 

  एके दिवशी आईला तिच्या मैत्रीणीचा फोन आला, ' तुझ्या अबोलीच लग्न करायचय का ग? स्थळ उत्तम आहे. एकुलता एक मुलगा आणि त्याची आई दोघच घरी असतात. मुलगा इंजिनिअर आहे. साॅफ्टवेअर कंपनीत चांगल पॅकेज आहे. दिसायला ही छान आहे. त्यांना मुलगी आणि नारळ एवढच दिल तरी चालणार आहे. '

    फोन ठेवल्यावर अबोलीच्या आईच्या मनात आलं की हीच लग्न एवढ्यात करायच नाहीये. पण स्थळ उत्तम आहे. काही अपेक्षा नाही. म्हणजे थोड्या खर्चात लग्न होईल.

   अबोलीच्या आईने अबोलीला स्थळाबद्दल सांगितल. अबोली तयार नव्हती. मग आई म्हणाली, 'एकदा बघायला काय हरकत आहे? तुला आवडला तर लग्न करु . सक्ती नाही. '

   अनिकेत हुशार, उंच ,गोरा छान मुलगा होता. तो आणि त्याची आई अबोलीला बघायला आले. अनिकेतला अबोली आणि अबोलीला अनिकेत आवडला. 

   चांगला मुहूर्त साधून दोघांचे लग्न झाले.जोडी अगदी छान दिसत होती. 

   अनिकेत खूप हौशी होता.त्याला फिरायची खूप आवड होती. लग्न झाल्यावर त्याने अबोलीला छान ड्रेसेस घेतले .अबोलीला विमानाने उटी, बेंगलोरला फिरायला घेऊन गेला.अबोली खूप खुश होती. दोघांनी ट्रीपचा मस्त आनंद घेतला. आठवड्याने दोघे पुण्यात घरी आले.


  (क्रमशः) 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational