स्पर्श - भाग २
स्पर्श - भाग २
अनिकेत नि अबोली घरी आले. दुसऱ्या दिवशी पासुन अनिकेतची ड्युटी चालू झाली.
दोघांना एकमेकांची सवय झाल्यामुळे आता दोघांनाही करमत नव्हतं.
अबोलीला सोबतीला सासुबाई होत्या. त्या स्वतः सैपाक करायच्या. रोज नवीन नवीन पदार्थ बनवायच्या आणि अबोली पण त्यांच्या कडून सगळं शिकुन घेत होती.
अनिकेतला रोज कंपनीतन यायला उशीर होयचा. पण शनिवार, रविवार सुट्टी असायची.तेव्हा तो अबोलीला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचा. दिवस मजेत जात होते. पण अबोलीला दर शनिवार, रविवार सासुबाईंना घरी ठेवून फिरायला जाण तिला पटत नव्हतं. सासुबाईंना कळल्यावर त्या म्हणाल्या, ' अग तुमचे फिरायचे दिवस आहेत.पैसा पण आहे. मस्त फिरुन घ्या. अग आमच लग्न झालं तेव्हा आमच्या कडे फिरायला जायला पैसे नव्हते. नंतर अनिकेतच्या बाबांना चांगली नोकरी लागल्यावर आम्ही फ्लॅट घ्यायला कर्ज घेतल. अनिकेतच शिक्षण. या मुळे फिरायला जायला जमलच नाही. बाबांची पन्नाशी आली तेव्हा या सगळ्या जबाबदाऱ्यातुन मोकळे झाले होते. आता दरवर्षी नक्की कुठे तरी फिरायला जायच अस ठरवल. पण नियतीच्या मनात काही तरी वेगळच होतं. अनिकेतच्या बाबांना ह्रदय विकाराचा झटका आला आणि ते निघून गेले. '
अबोलीला ऐकून कस तरी वाटलं. मग अबोलीने अनिकेतला सांगितल की आपण महिन्यातुन एकदा सासुबाईंना पण त्यांच्या आवडीच्या ठिकाणी फिरायला न्यायच.त्यांची हौस करायची. मग महिन्यातल्या एका विकएंडला तिघेही फिरायला जायचे. मग अनिकेतने आईचा पण पासपोर्ट काढला आणि तिला घेऊन तिघे एक फाॅरेन ट्रिप पण करुन आले.
दिवस मजेत चालले होते. हा हा म्हणता लग्नाला दोन वर्षे झाली. मग अनिकेतच्या आईने एकदा तिघे गप्पा मारत असताना सांगितले की मला आजी होयचा योग येऊ दे.
दोघे एकमेकांकडे बघून हसले.
(क्रमशः)
