स्पर्श अंतिम भाग
स्पर्श अंतिम भाग
अनन्या महिन्यातुन एकदा आश्रमात जायची. पायल पण दर रविवारी आश्रमात जाऊन तेथील अपंग मुलांची शुश्रुषा करायची.अनन्याला तिच कौतुक वाटायचे. पायलच्या आईचा वयोमानानुसार धंदा बंद झाला होता. पायलला हाॅस्पिटलमधे पगार चांगला मिळत होता. शिवाय ती पेशंटच्या घरी इंजिक्शन द्यायला, मलमपट्टी करायला जायची. त्यामुळे आणखी पैसे मिळायचे. पण पायलच्या आईला पायलच्या लग्नाची काळजी होती. कोणी तिच्याशी लग्न करेल की नाही? ती अनन्याशी पण या विषयावर बोलली होती. अनन्याच्या आश्रम गृपमधल्या मुलांना पायल आश्रमात येत होती म्हणून माहित होती. अनन्याने मग एकदा त्या वाॅट्सअॅप गृपवर मेसेज टाकला की पायलशी आपल्या गृपमधील कोणी लग्न करेल का? तिची यात काहीच चुक नाही.
गृपमधला एक मुलगा म्हणाला की माझे बाबा देवाघरी गेलेत. आईला अर्धांगवायुचा झटका आलेला आहे. माझ्या आईला ती नीट सांभाळणार असेल तर मी लग्न करायला तयार आहे. पायलची आई आमच्या बरोबर राहिली तरी मला चालेल. अनन्याला खूप आनंद झाला. मग चांगला मुहूर्त बघून पायलच लग्न झालं.
पायलच लग्न झाल्यावर अबोलीने अनन्याच्या लग्नासाठी आग्रह धरला. पण अनन्याने सांगितल की माझ्या शिक्षणासाठी जेवढे पैसे बाबांनी खर्च केलेत तेवढे साठल्याशिवाय मी लग्न करणार नाही.
आणखी एक वर्ष झाल्यावर अबोलीने सांगितल की अग आमचे पैसे नंतर तुलाच मिळणार. तर योग्य वयात लग्न होयलाच हवं. अनिकेतनी पण सांगितल. मग ती तयार झाली.
अबोलीला किती दिवस वाटत होतं की अबोलीच शुभमशी लग्न व्हाव. अनन्या आणि तो दोघेही दत्तक घेतलेले होते.हल्ली बरेच दिवसात तिची शुभमशी भेट झाली नव्हती. त्याच्या बाबांची नोकरी संपल्यावर शुभांगी आणि तिचे यजमान पण बेंगलोरलाच गेले होते.अनन्याने फोन करून शुभांगीला लग्नासंबंधी विचारल. ती म्हणाली,' त्या दोघांना मान्य असेल तर माझी काही हरकत नाही .'
अनन्या आणि शुभमला विचारल्यावर दोघांनी होकार दिला. अनन्याला आश्रमातील मुलाशीच लग्न करण्याची इच्छा होती. दोघांचे धुमधडाक्यात लग्न झाले. पाठवणी करताना अनिकेतला आणि अबोलीला खूपच जड गेलं. त्यात शुभमच्या बेंगलोरमधील नोकरीमुळे तिला पुण्यातील नोकरी सोडून बेंगलोरला जायला लागल. लग्न झाल्यावर दोघे हनिमुनला बालीला जाऊन आले.दोघे खुशीत होते. अनन्याला अबोलीने चांगले संस्कार केले होते. सैपाक शिकवला होता म्हणून ती घरातल सगळ करायची. शुभांगी पण तिला समजून घ्यायची.
दिवसामागुन दिवस जात होते. आता अनिकेत पण निवृत्त झाला होता. अनन्याने पण त्यांना बेंगलोरला रहायला यायचा आग्रह केला. पण अनिकेत म्हणाला आमच आम्हाला जमतय तो पर्यंत आम्ही पुण्यातच राहू. अधून मधून ते बेंगलोरला जाऊन यायचे.
अनन्याचं लग्न झाल्यापासुन अबोलीच्या मनात यायच की अनन्याला बाळ होईल ना? माझ्यासारख होयचं नाही ना? पण ती कोणाला बोलली नव्हती. लग्नाला दोन वर्षे झाल्यावर अबोलीला वाटत होतं अनन्याला सांगाव. पण अनिकेतनी सांगितल की तू काही बोलायच नाही. एकदा रविवारी अनन्याचा व्हिडीओ काॅल आला ती म्हणाली ,'आई तू जी बातमी ऐकायला उत्सुक होतीस ती बातमी आहे. मी आई होणार आहे. ' अबोलीच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहू लागले. शुभांगीची पण अवस्था तशीच होती. सगळेच खुप खुश झाले. सातवा महिना लागल्यावर अनन्याने अबोलीला आणि अनिकेतला बेंगलोरला बोलवुन घेतले.
अबोलीने आणि शुभांगीने हौशीनी तीच झोपाळ्यावरच ,चांदण्यातल डोहाळजेवण केलं.
नववा महिना लागल्यावर अनन्याने सुट्टी घेतली. पंधरा दिवस झाल्यनंतर संध्याकाळी अनन्याच्या पोटात दुखायला लागलं. तिला हाॅस्पिटलमधे अॅडमिट केलं. अबोली आणि शुभांगी बाहेर देवाच नाव घेत बसल्या होत्या.
'नवजात बाळाला कधी स्पर्श करतोय ' दोघी एकदम बोलल्या. दोघींनाही स्वतःच मुल नसल्याने त्यांना हा क्षण अनुभवता आला नव्हता. आज इतक्या वर्षांची इच्छा पूर्ण होणार होती.. शुभांगी म्हणाली, 'ए तुझ्या मुलीला बाळ होणार तर तू आधी घे. मी मग घेईन.'
शुभम ऐकून गालातल्या गालात हसत होता. इतक्यात बाळाच्या रडण्याचा टॅहा ,टॅहा आवाज झाला. दोघी तिथल्या बाकड्यावरून उठल्या. तितक्यात परत टॅहा, टॅहा. आवाज झाला. थोड्या वेळात नर्स दोन बाळांना घेऊन बाहेर आली. अनन्याला एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती. दोघींना ते बाळ हातात घेताना भरून आलं होतं. तो हवाहवासा नवजात बाळाचा स्पर्श...तो स्पर्श अनुभवुन दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अनन्या आणि शुभम कुतुहलाने ते बघत होते.