सोन्याची अंडी
सोन्याची अंडी
मोठ्या सुनेने केसर ने न राहवुन जेव्हा कुंदा ताईंना उत्तर दिले कि, "बरोबर आहे शेवटी लोकं सोन्याची अंडी देणारी कोंबडी कशी काय सोडतील?" सुनील भाऊजी आणि अणिता ला तुम्हांला सोडायचेच नाही ना? केसर चे बोलणे ऐकून कुंदा ताईंचा पारा अजुनच जास्त चढला आणि गेल्या एक तासापासून चाललेल्या भांडणात शेवटी केसरने माघार घेऊन पुर्ण विराम दिला.तो पुन्हा कधीही काहीही न बोलण्याचा विचार करुनच.
केसर च्या नवऱ्याच्या म्हणजे अनिलच्या कानावर सर्व गोष्टी पोहोचवण्याचे काम कुंदा ताईंने चोख बजावले होते.पण यावेळी मात्र अनिल ने बायकोची बाजु योग्य असल्यामुळे आईलाच दोन समजुतीचे शब्द सुनावले.
पण कुंदा ताई नेहमी प्रमाणे कुणाचेही काहीही ऐकायला तयार नसतात.त्यांना फक्त आपला लहान मुलगा सुनील आणि त्याची बायको अणिता च बरोबर वाटतात.बाकी सर्व त्यांच्या पुढे वेडेच दिसतात.
हे काही आजचे नव्हते या गोष्टीची सवय घरात आता सर्वांनाच झाली होती आणि सर्वांनी सुनील आणि अणिता ची चाल ही चांगलीच ओळखली होती.
जसे अणिता आणि सुनील चे लग्न झाले होते.तेव्हापासून घरात दोन गट पाडण्याचे काम अणिता करत आली होती.सुनील हा आधीपासूनच मोठ्या दोघा भावांपेक्षा चॅप्टर,बोलण्यात सराईत, आणि लोकांना फसवण्यात पटाईत होताच.पण अणिता सारखी वागण्यात चपळ बायको मिळाली त्यामुळे त्याचे अजुनच फावले होते.
आपल्या खोट्या आणि वरकरणी चांगल्या स्वभावाचे आणि वागणुकीचे जाळे अणिताने आपल्या सासु च्या भोवताली विनलेले होते. कुंदा ताई त्या गोड बोलण्याच्या जाळ्यात अशा गुंतल्या होत्या की, घरातील दुसऱ्या लोकांचा चांगुलपणा त्यांना दिसतच नव्हता.कसे आईच्या पैशांसाठी सुनील आणि अणिता ने आईला आपल्यात अडकवुन ठेवले आहे.हे दुसरे दोन मुलं कुंदा ताई ला समजावण्याचा प्रयत्न करत होते.पण कुंदा ताई कुणाकडे ही लक्ष देत नव्हत्या.त्या ऐकायच्या सर्वांचे पण करायच्या मात्र आपल्या मनाचे.
आणि सुनील अणिता ला ही आता समजले होते की, कुणी कीतीही शिकवण्याचा प्रयत्न केला तरी आई मात्र आपल्याच ताब्यात आहेत.त्या मुळे ते निर्धास्त होते.आणि अशा प्रकारे वागत असत जणु आंम्हाला दोघांनाच फक्त आईची काळजी आहे.बाकी दोन्ही मुलं आणि सुना बोलुन बोलुन आईला त्रास देतात.म्हातारपणात कटकटी, भांडण करायला लावतात.कुंदा ताईंच्या पैशांसाठी हे सर्व चालले होते.
(क्रमशः-)
फोटो साभार गुगल
