Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

kishor zote

Inspirational


4.8  

kishor zote

Inspirational


संतुलित आहार काळाची गरज

संतुलित आहार काळाची गरज

4 mins 17.7K 4 mins 17.7K

     मानवी जीवनात सर्वात जास्त महत्व आरोग्यासच आहे. आरोग्याशिवाय माणूस सुखी राहूच शकणार नाही. आरोग्य संपादन करणे हा प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क असल्याचे संयुक्त राष्ट्र संघ व जागतिक आरोग्य संघटना या दोहोंनी मान्य केले आहे.

       आरोग्य ही माणसाची स्वाभाविक स्थीती आहे. आरोग्य म्हणजे आरोग्यदायक निकोप जीवन. ज्याचे शरीर व मन धड तो खरा निरोगी. जागतिक विश्व स्वास्थ संघटनेने स्वास्थाची अशी व्याख्या केली आहे -" आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तता यांचा अभाव नव्हे तर शारीरिक , मानसिक व सामाजिक सुस्थिती होय. "

     आरोग्य ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. आरोग्य हे दैनंदिन क्रियांतून मिळत असते. त्यासाठी संतुलित आहार , व्यायाम, विश्रांती व मनोरंजन, उत्तम परिसर व उत्तम सवयी यांची आवश्यकता असते.

       आपल्या वैयक्तिक प्रगतीसाठी व्यक्ती शारीरिकदृष्टया निरोगी असलीच पाहिजे, तरच ती व्यवस्थित काम करू शकेल व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडू शकेल.  शरीराप्रमाणेच त्याचे मनही निरोगी असावे लागते. रोगी मनाचा माणूस चिडचिडा, निराश व कर्तृत्वहीन होतो व तो इतरांस "भार" ठरतो.

       देशातील व्यक्ती जेवढया अधिक निरोगी तेवढा देश अधिक प्रगतीशील, सुसंपन्न व बलशाली असे समजण्यास हरकत नाही;  कारण देश म्हणजेच देशातील माणसे. आरोग्य हे स्वतःच्या व राष्ट्राच्या उन्नतीचे साधन आहे.

     आरोग्याचा पाया म्हणजे आहार. आहार ही माणसाची प्राथमिक गरज आहे. हवा व पाणी यानंतर आपल्या शरीर पोषणासाठी अन्नाची गरज आहे. अन्नाची व्याख्याच अशी केली जाते की, अन्नपदार्थ ते होत की साधारण रूपात ग्रहण करतो व जे शरीरात गेल्यानंतर शरीरास शक्ती प्रदान करते.  या वरून आपणास असे दिसून येते की अन्नाचे कार्य चार प्रकारचे आहे -

१ ) दैनिक कार्य करण्यासाठी शरीरास शक्ती प्रदान करणे.

२ ) शारीरिक क्रिया सुचारू रुपाने चालवण्यासाठी उर्जा (उष्णता) निर्माण करणे.

३ ) शरीरातील पेशींची नवनिर्मिती करुन जुन्या पेशींना नवजीवन देणे

४ ) शरीरातील निरनिराळ्या संस्थांची कार्यक्षमता टिकवून धरणे, ह्या सर्व गोष्टींचा समन्वय साधल्या जातो.

        समतोल आहारात पौष्टिक अन्नाचे महत्व आहे. आपण जे अन्न खातो ते शरीरास पोषक असेल तरच ते आपल्यास आरोग्यदायी होईल.आहारात पौष्टिक तत्व असणारे अन्नच खायला पाहिजेत. आहार पौष्टिक नसला, तर मनुष्य अनेक रोगांनी पीडित होण्याची शक्यता असते. 

पौष्टिक भोजनाचे कार्य -

१ ) या भोजनाने पेशीची रचना होते.

२ ) तुटल्या-फुटल्या पेशी ठीक होतात.

३ ) शरीरात रासायनिक पारिवर्तन होते.

४ ) शरीरात उष्णता निर्माण होते.

५ ) शरीरात शक्ती निर्माण होते.

 

    अन्न खाण्यामागे केवळ पोट भरणे हाच उद्देश नाही. प्रौढ माणसाच्या शरीरातून रोज ६ पौंड पाणी व २ पौंड इतर द्रव्ये बाहेर टाकली जातात. शिवाय ३०० ग्रेन नैट्रोजन व ४७०० ग्रेन कार्बन हा उच्छ्वास , घाम, लघवी या वाटे बाहेर पडतो. याची भरपाई होणे गरजेच आहे. अन्नामुळे शक्ति निर्माण झाली पाहिजे. नवीन पेशी निर्माण झाल्या पाहिजे व शरीरातील निरनिराळ्या संस्थांची कार्यक्षमता टिकून राहिली पाहिजे. यासाठी आपल्या जेवणात पिष्टमय पदार्थ व शर्करा , स्निग्ध पदार्थ , नैट्रोजन युक्त पदार्थ, क्षार ,पाणी व जीवनसत्व हे अन्नाचे ६ घटक योग्य प्रमाणात असावे लागतात. हे घटक ज्या आहारात योग्य प्रमाणात आहेत, त्यालाच संतुलित (समतोल ) किंवा चौरस आहार म्हणतात. हे घटक मिळवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात गहू, तांदूळ , दाळी, तूप , मोड आलेले धान्य, अंडी, पालेभाज्या, फळे इ. पदार्थाचा समावेश असावा.

संतुलित आहाराची वैशिष्टये :

१ ) यात ऊर्जा देणारे घटक योग्य प्रमाणात असतात.

२ ) यात सुरक्षात्मक पोषक तत्वे आस्तित्वात असतात.

३ ) हा आहार वयानुसार, लिंगानुसार, व्यवसायानुरूप वेगवेगळा असतो. 

एका साधारण व्यक्तिस खालिल प्रमाणे अन्न घटकांची आवश्यकता असते.

प्रोटीन - ७३ ग्रॅम

कार्बोज-२०८ ग्रॅम

कॅल्शिअम - २०० ग्रॅम

लोह - ३० मिली ग्रॅम

फॉस्फरस -१५० ग्रॅम

जीवनसत्त्व A-७० मिली ग्रॅम

जीवनसत्त्व B -४९ मिली ग्रॅम

जीवनसत्त्व C - ५० मिली ग्रॅम

वरील विविध अन्न घटक खालील संतुलित आहारातून प्राप्त होवू शकतात.

धान्य - ४०० ग्रॅम

दाळ - ५० ग्रॅम

हिरव्या भाज्या - ७५० ग्रॅम

दूध, दही - २५० ग्रॅम

तेल - २५ ग्रॅम

साखर -४० ग्रॅम

मांस - १५० ग्रॅम

फळ - १०० ग्रॅम

याशिवाय पाणी व जीवनसत्वे हवीत.

      आजच्या फास्ट लाइफ मधे फास्ट फूड व जाहिरात बाजी यामुळे नको ते अन्न सेवन केल्या जात आहे. आपण स्वतः आणि घरातील मुले देखील, आपण संतुलित आहार घेत आहोत की नाही तेही स्पष्ट करता येईल.

संतुलित आहाराची लक्षणे

१ ) शारीरीक व मानसिक विकास होतोय.

२ ) उंची व वजन योग्य प्रमाणात वाढते आहे.

३ ) मासपेशी कार्यशील आहेत.

४ ) हाडे मजबूत आहेत.

५ ) शारीरीक त्रास होत नाही.

६ ) रोगांचा प्रभाव कमी होतो.

७ ) चांगली झोप लागते.

८ ) आरोग्य चांगले राहते.

९ ) सतत आनंदी व उत्साही राहतात.

         

   या पैकी लक्षणे दिसत नसल्यास समजावे आपला आहार नक्कीच बिघडला आहे. 'शरीर धड तर मन धड.'  त्यासाठी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. सामाजिक स्वास्थ बिघडण्यास हेही एक कारण आहे. त्यामुळे संतुलित आहार ही आता काळाची गरज झाली आहे.


Rate this content
Log in

More marathi story from kishor zote

Similar marathi story from Inspirational