"संसाराची खरी कमाई"
"संसाराची खरी कमाई"


माझे बाबांची सरकारी नोकरी होती म्हणून क्वार्टर होती राहायला त्याचबरोबर आम्ही दोघी बहिणींचा शिक्षणासाठी फी-भरणे, इतर सर्व घरखर्च खूपच ओढून-तानून पूर्ण व्हायचे. आई शिवणकाम करून मदद करायची बाबांना. पण आम्ही आई-वडिलांनी दिलेले संस्कारान बरोबर वरचेवर चांगला अभ्यास करून मुलाखतीसाठी सामोरे गेलो. पहिल्याच निकालात मिळालीसुद्धा मला नौकरी. मला अजून लक्षात आहे , पहिल्या पगारातून आईसाठी साड़ी आणि बाबासाठी टेपरिकॉर्डर आणले तेव्हा आई-बाबांच्या डोळ्यात प्रेमरूपी-अश्रु बघून भूतकाळाच्या पलीकडे आनंदाने मी बहरले होते, "मिळाला आशीर्वाद नेहमीच आत्मनिर्भर रहा ".
माझ्या लग्नाच्या वेळी काका खर्च्यांचे हिशोब लावत होते, तेव्हां माझी कमाई कामास आली. सर्व काका म्हणले आई-बाबांना " हीच तुमच्या संसाराची खरी-कमाई ".