STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Inspirational

2  

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Inspirational

सण आणि मासिक पाळी

सण आणि मासिक पाळी

2 mins
106

"मधुरा... अगं ए मधुरा!!!" शेजारच्या शालिनी काकू मधुराला हाक देत होत्या. तोच मधुराच्या सासूबाई बाहेर आल्या. " काय गं शालिनी काय झाल?? " काही नाही हो ताई. जरा फुलं घ्यायला आले होते तुमच्या बागेतली. त्यासाठीच हाका देत होते. " शालिनी म्हणाली. "अगं विचारतेस काय?? घे ना मग." असं म्हणून मधुराच्या सासूबाई आत निघून गेल्या. थोडयाच वेळात शालिनीला आतून काही आवज ऐकू यायला लागले....;


"तू.., जरा लांबच रहा. उगाच इकडे तिकडे हात लावू नकोस गं!!मला हे अजिबात आवडत नाही." मधुराच्या सासूबाई जरा रागातच वाटतं होत्या. "या आजकालच्या मुली ना!! जरा म्हणून जबाबदारीने वागत नाही.सगळं घर बाटवून टाकलंय तिने!"असं म्हणत म्हणत त्या पोर्च मधील झोपाळ्यावर येऊन बसल्या.


 शालिनी : "काय हो ताई.. काय झालं?? इतक्या का रागावल्यात??"


सासूबाई : "रागावू नको तर काय?? या आजकालच्या मुलींना काही सोवळ ओवळ नसतच मुळी. अरे, पाळी आली तर बसाव ना वेगळं! राहावं ना दूर... तर नाहीच! श्रावण म्हटला की, सणवार असतात, पूजापाठ असतो. ते तर कळतच नाही यांना. आम्ही पण सुना होतोच ना! आम्ही पण पाळलेत सोवळे ओवळे. आमच्या सासवांना तर असं जमायचंच नाही.आपल्याला कितीही त्रास झाला तरी चालेल. पण आम्ही कधीच त्यांच्या मर्जीच्या बाहेर गेलो नाही."


   

          मधुराच्या सासूबाई रागातच बोलत होत्या. त्यांच बोलणं ऐकून शालिनी त्यांना म्हणाली, " अहो ताई.., मग तुम्हाला असं वाटतंय का, की जो त्रास तुम्ही सहन केलाय तोच तुमच्याही सुनेने सहन करावा..?? तुम्हला जे काही सहन कराव लागलं तेच सगळं तिनेही करावं?? अहो, तिच्या जागी तुमची मुलगी सोनाली असती तरीही तुम्ही तिला वेगळं बसवलं असतं का?? मी तर कधीच सोनालीला वेगळं बसलेलं नाही पाहिलं. मग मधुरा फक्त सून आहे म्हणून तिने हे सगळं पाळाव असं वाटतंय का तुम्हाला?? ती पण नवीनच आहे ना इथे. तिला समजून घ्यायला वेळ लागेलच ना! आई विना वाढलेली पोरं आहे ती. तुम्हीच सांभाळून घ्यायला नको का तिला?? "


          शालिनीच्या बोलण्याने मधुराची सासू एकदम शांत झाली होती. त्यांना त्यांची चूक लक्ष्यात आली होती. थोडयाच वेळात त्या आत गेल्या. आणि मधुराला हाक दिली, " मधुरा, अगं ए मधुरा... बाहेर ये बाळा. सोबत चहा घेऊयात...!!! मधुरालाही आज आई भेटली होती.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract