Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Pakija Attar

Inspirational


4.7  

Pakija Attar

Inspirational


सन स्ट्रोक -एका मतदानाची गाथा

सन स्ट्रोक -एका मतदानाची गाथा

5 mins 620 5 mins 620

हवेत उष्णता खूपच वाढली होती. एप्रिलचा महिना होता. जीवाची तगमग होत होती. शाळेत इलेक्शन ड्युटी चे ऑर्डर आलेली. परीक्षा पेपर ची कामे कमी होती का ! त्यात इलेक्शन ड्युटी लागली.अनु शाळेत शिक्षिका होती. मे महिन्याची सुट्टी लागणार होती. गावी जाणे भाग होते. मुलांना कपडे तयारी करू लागली.

"काय तुला इलेक्शन ड्युटी आली म्हणे?" अमित म्हणाला.

"हो सरकारी काम करायलाच हवं. आम्ही शिक्षक प्रामाणिक, आमच्यावर खूप विश्वास. गरीब पामर. एका शब्दानेही बोलणार नाही."अनु म्हणाली. 

"अगं चिडतेस काय अशी. माणसाला नेहमी सकारात्मक रहावे. कोणतंही काम आनंदाने करावे. तू चिडचिड करून इलेक्शन ड्युटी रद्द होणार आहे का. जे काम करावेच लागणार आहे. ते आनंदाने का करू नये?"अमित म्हणाला.


तेही अगदी बरोबरच होतं. दुसऱ्या दिवशी इलेक्शनचे ट्रेनिंग होते. अनु सकाळी लवकर उठली. भरभर कामे उरकली. नऊची ट्रेन पकडायची होती. दहा वाजता ट्रेनिंगला हजर व्हायचे होते. धावतच ट्रेन पकडली.


एका हॉलमध्ये ट्रेनिंग ठेवले होते. मतदान अधिकारी, त्यांची कामे व कंट्रोल युनिट यांची माहिती देण्यात येत होती. सगळे लक्षपूर्वक ऐकत होते. साडेपाच वाजता सर्वांनी मतदान केंद्रावर हजर राहावे असा आदेश देण्यात आला. हे राष्ट्रीय कार्य आहे. सर्वांनी चांगल्याप्रकारे पार पाडावे असे सांगून ट्रेनिंग संपली. सगळेच टेन्शनमध्ये बाहेर पडले.


"विद्या ऐकलस ना कुठेही आपण चुकता कामा नये?"अनु म्हणाली. 

"होय मतदानाची ड्युटी संपली जिंकलो आपण", विद्या म्हणाली. 


सगळे आपापल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी लवकर जायचे होते. दुसर्‍या दिवशी मुख्य केंद्रावर सगळे जमले. साहित्य वाटप होतं. आणि प्रत्येकाचे केंद्र समजणार होते.

"विद्या कुठे आला तुला मतदान केंद्र?"अनु म्हणाली

"मला जवळच आहे. रेल्वेस्थानक आहे ना तिथे"

"वा मजा आहे तुझी. तुझं मतदान केंद्र कुठे आहे?" विद्या म्हणाली. 

"ते विचारू नको. मला पार्क साईटला मतदान केंद्र आले आहे. झोनल ऑफिसर म्हणाले बस पायथ्यापर्यंत जाईल. डोंगरावर तुम्हाला साहित्य घेऊन जावे लागेल. जाताना कंट्रोल युनीट बॅलेट युनिट नीट जपून घेऊन जावा. रस्त्यामध्ये काही होऊ शकतं. पाऊलवाट आहे. मी सकारात्मक विचार करते म्हणून जास्त अडचणी येतात, जाऊ दे आता आहे ते काम करावेच लागेल. 

म्हणतात ना, 

आलिया भोगासी असावे सादर

देवावरी भार घालुनिया."

असे म्हणत प्रत्येक जण आपापल्या मतदान केंद्रावर हजर झाले.


मुख्य केंद्रावर पोचल्यावर सामान मिळण्याची वाट पाहू लागले. गटातले सगळ्या आल्याशिवाय सामान्य मिळणार नव्हतं. एक पीओ अजून आला नव्हता. बाकीचे गट निघून जात होते. अनुची तगमग होत होती. उशीर झाला तर ऊन पडेल. या उन्हात डोंगर चढावा लागेल. एकदाचा पीओ‌ आला. जीव भांड्यात पडला. "सर चला आता सामान घेऊ या. लवकर निघू या."

"हो हो मॅडम सामान घेतो आता मी." केंद्राध्यक्ष म्हणाला.

सामान घेतले आणि बसमध्ये चढलो. शिपाई पण मिळाला होता. एक पोलीस आमच्याबरोबर होता. सर्वांनी थोडंथोडं हातात सामान घेतले. बसमधून उतरल्यावर डोंगर चढू लागलो. सामान घेऊन चढताना दम लागत होता. एकदाचं मतदान कक्षामध्ये पोहोचलो. मतदान कक्षामध्ये सर्व सामान लावले बॅलेट युनिट व्यवस्थित ठेवले बैठक व्यवस्था केली. फॉर्म भरायला घेतले. प्रत्येक पाकिटात एकेक फॉर्म टाकत गेलो.

मतदान केंद्राध्यक्षाला विचारले, "आता आम्ही घरी जाऊ शकतो का उद्या लवकर यायचं आहे?"

त्यांनी हो म्हणाले तेव्हा सगळेजण सुसाट वेगाने घरी गेलो.


दुसऱ्या दिवशी अनु पहाटे उठली. 04:27 ची गाडी पकडायची होती. पटकन आवरलं आणि सुसाट स्टेशनच्या मार्गाला लागली. मनात गाडी सुटते की काय धडधड होती. त्यानंतरच्या गाडीने खूप उशीर झाला असता. साडेपाचला सर्वांना हजर राहायला सांगितले होते. धावतच तिने गाडी पकडली. तिला आनंद झाला. सगळ्या मैत्रिणी त्या गाडी चढल्या" होत्या." बरं झालं गाडी मिळाली आता वेळेवर पोहोचू सानिका म्हणाली.


आज वेळेवर पोहोचलो एजंट प्रतिनिधी आले होते. त्यांच्या सहीनुसार व त्यांच्या समक्ष मॅाक पोल घेण्यात आला. मशीन व्यवस्थित होते. टोटल दाबून झिरो झिरो दाखवण्यात आले. प्रत्येक जणाने आपली जागा घेतली. मतदान सुरू झाले. हळूहळू मतदान काम करताकरता अकरा कधी वाजले समजले नाही. ऊन वाढले होते. उष्णता वाढली होती. पत्रा तापत होता. उंचावर असल्यामुळे आणखीनच उष्णता वाढली होती. अनुला अस्वस्थ व्हायला लागलं. मनात घाबरल्यासारखे झालं. हृदय धडधड करत होते, हृदयाची गती वाढली. काय होतंय समजेना. 


"अहो बाई लवकर लवकर घ्या गर्दी वाढत चालली आहे", एक माणूस म्हणाला. 

"हो हो घेते." अनु म्हणाली. 

हळूहळू अनुचे हात पाय थरथरू लागले. 

"सर मी जरा फोन करून येऊ का... मला कसंतरी होतंय माझ्या मुलाला मी फक्त विचारते. तो डॉक्टर आहे. चालेल ना?", अनु म्हणाली. 

"हो हो ! जा तुम्ही मी बसतो तुमच्या जागेवर."

फोन लावला."हॅलो आई कसं काय चाललंय मतदान केंद्रात?" मुलगा म्हणाला.

"अरे ते सोड, मला कसंतरी होतंय. माझ्या हृदयाची गती वाढली डोकं दुखतंय. घाबरायला होतंय मी काय करू?"अनु म्हणाली. 

"आई तिथे खूप उष्णता आहे का?" 

"होय, कारण येथे सगळे पत्र्याचे शेड आहेत. ते खूप तापले! मला ते सहन होईना."

"गोळ्या वगैरे खाल्ल्यास काय?"

"हो रे बाळा, सगळ्या गोळ्या घेतल्या."

"मग आई, एक काम कर. तू तोंडावर, खांद्यावर, पाणी मारत जा. तसं काही जास्त वाटलं तर जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन बीपी चेक कर."

"अरे मला कुठे आता सुटका मिळणार. मतदारांची रांग लागली आहे. मी सरांना सांगून बाहेर येउन फोन केला आहे."

"ठीक आहे बघ कसं होतं ते. मी घ्यायला येतो नाहीतर."


 दिवसभर जीवाची काहिली होत होती. कसाबसा दिवस पूर्ण झाला. सरांना सांगून लवकर निघाले, मुलाला फोन लावला.

"हॅलो! मी ट्रेनमध्ये बसले आहे. तू स्टेशनवर घ्यायला ये." 

ट्रेनमध्ये डोळे बंद करून झोपले होते. स्टेशन आले. अनु उतरल्यावर तिचे डोळे आपल्या मुलाला शोधत होते.

"आई", मुलाने हाक मारली. 

सामान हातात घेतले व बाईकवर बसविले. भरधाव वेगात तो चालवत होता. अनुने त्याच्या खांद्यावर डोके टेकले होते. मुलाने तिला घरी आणले. तशी ती बेशुद्ध पडली. त्याने पटकन तिला इंजेक्शन दिले.

"इशा, फ्रीजमधला सगळ बर्फ बाहेर काढ पटकन आणून दे मला."

त्याने आईच्या शरीराच्या काही भागांवर बर्फ ठेवले. तिचं शरीर तापलं होतं. डोळे लाल झाले होते. शेवटच्या क्षणापर्यंत खिंड लढवली होती ! 


"आई तुला काही होणार नाही डोळे उघड. बघ तू घरी आहेस. आई तुला अर्ध्यातून घरी यायला काय झालं होतं. बोल आता थोडं तरी बोल !"

हळूहळू आईने डोळे उघडले. 

"आता बरं वाटतंय आहे ना आई?"

"हो बाळ! अरे आम्ही अर्ध काम सोडून नाही येऊ शकत. जबाबदारी असते. राष्ट्रीय काम आहे." अनु म्हणाली. 

"हो अगदी बरोबर आहे. तुझ्या जिवाला काही झालं असतं तर!" मुलगा म्हणाला. 

"काही नसतं झालं."

"ठीक आहे! आता तू आराम कर. तुला काय झाले आहे माहित आहे का? सन स्ट्रोक! आई खरं, तुझ्या कार्याला सलाम. खरंच धन्य आहे आई. तुझा मुलगा म्हणून मी भाग्यवान आहे. आई तुला मी सॅल्युट करतो." 

अनु हसली. तिच्या चेहर्‍यावर समाधान होतं - देशाचे कार्य पार पाडले होते !!  


Rate this content
Log in

More marathi story from Pakija Attar

Similar marathi story from Inspirational