komal dagade.

Fantasy Inspirational

4.0  

komal dagade.

Fantasy Inspirational

सकारात्मक दृष्टीकोन

सकारात्मक दृष्टीकोन

4 mins
387


           शिल्पा ही उच्चशिक्षित गृहिणी नेहमी उदास राही. त्याच कारण म्हणजे एवढं शिक्षण घेऊन घरातच राहतोय याच तिला फार वाईट वाटे. शिल्पाला दोन मुलं, सासुसासरे, आणि नवरा या सगळ्यांना सांभाळत कधी दिवसाची रात्र होई तिलाही समजत नसे . सासुसासऱ्यांच वय झालं होतं, त्यामुळे त्यांना कोणतही काम करणं अशक्य होतं. त्यामुळे घरातील सगळी जबाबदारी पेलता पेलता रात्र झालेली तिच्या लक्षातही येत नसे.


घरात शिल्पाला प्रत्येक गोष्टीची मोकळीक होती. घरातील कोणतेही तिचे निर्णय सर्वाना मान्य असत. सासुसासरे थकले होतें,पण सून सगळं प्रेमाने करते म्हणून त्यांना सुनेचे कौतुकच वाटत. सासुसासर्यांचा शिल्पाला कसलाच त्रास नव्हता. रोज मुलांना नाष्टा, चहा नवऱ्याला ऑफिसचा डबा, सासुसासर्यांचा नाष्टा, गोळ्या हे सगळं आईवडिलां केल्यासारखं करत. त्यामुळे माधवही तिला कधी दुखवत नसे. तिचे सगळे हट्ट पुरवत.


शिल्पाला तिच्या मैत्रिणीचा म्हणजे संजनाचा कॉल आला. तिचं लाईफ बद्दल ऐकून तिला मनातून खूप तिचा हेवा वाटत होता. माझ्याच नशिबी असे आयुष्य का नाही.... असे तिला वाटत होतं. दिवसभर तिचाच विचार शिल्पाच्या मनात घोळत होता. रांधा वाढा उष्टी काढा एवढंच माझ्या आयुष्यात लिहिले आहे का....? ती स्वतःला प्रश्न विचारत होती. स्वतःच्या नशिबाला दोष देत ती पुन्हा कामाला लागली.


आज सकाळीच शेजारीच राहायला आलेली शुभा अनोळख्या स्त्रीला शिल्पाने पाहिले. शिल्पा गॅलरीत तुळशीला पाणी घालण्यासाठी गेली होती. तिच्याकडे पाहताच....ती तिच्याकडेच पाहत बसली. किती आनंदी दिसतेय ही ....!कोण असेल आजच राहायला आली काय....? असे अनेक प्रश्न शिल्पाने मनाला केले.मी का हिच्यासारखी आनंदी राहत नाही....? शिल्पाने स्वतःलाच प्रश्न केले.


हळूहळू शुभाची आणि शिल्पाची ओळख वाढत गेली. शुभाच राहणीमान एकदम छान होतं. मॅचिंगची साडी, बांगडी, टिकली, चेहऱ्यावर हास्य गोरी असणारी शुभा आणखीनच सुंदर दिसें.

शिल्पा मात्र स्वतःची तुलना सुभाशी करत. स्वतःला आरशात न्याहाळात बसत. गृहिणी बनून रोज तेच ड्रेस, केस कधीही वेळेवर न विंचरलेली, लिपस्टिक नाही की, तोंडाला पावडर. हे एवढं कामं थोडीच कामं शुभा करत असेल नाहीतर ती ही अशीच राहिल...शिल्पा आरशात पाहत स्वतःशीच बोलत होती. घरात आवरून बसलं तरी आपल्याला कोण बघणार आहे. काम करता करताच हे आवरलेले सगळं खराब होईल. शिल्पा असे बोलून आरसा ठेऊन दिला आणि कामाला लागली.


शुभाची हळूहळू शिल्पाशी मैत्री वाढू लागली. रोज मुलांच येणेजाणे शुभाच्या घरी होऊ लागलं. शुभाही मुलांना खूप प्रेम लावत. त्यांना त्यांच्या आवडीचं करून खायला घालत. शिल्पाचे सासुसासऱ्यांच तिच्याकडे येणं जाणं होतं. हळूहळू ते दोन्ही कुटुंब फॅमिली सारखं राहत होते.शुभासारखी मैत्रीण मिळाल्याने शिल्पाही आनंदी राहत. तिच्याकडून शिल्पाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या.


एक दिवस अचानक शुभाने तिच्या नवऱ्याची बदली दुसऱ्या गावाला झाल्याचे सांगितले. शिल्पाला खूप वाईट वाटले. शुभा तरीही खुश होती.


शिल्पाने मात्र न राहवून तिच्या आनंदी राहण्याच गमक विचारलंच. तुला नाही का वाईट वाटत आम्हाला सोडून जाण्याचं....?, "शुभाने तिला हसून सांगायला सुरुवात केली. शिल्पा मी आणि माझा नवरा अनाथआश्रमात वाढलोय. त्यामुळे आम्हाला दोघांनाही कुटुंब काय असतं हे माहित नव्हत. याची सारखी बदली होतं असते त्यामुळे एका ठिकाणी कधीच आम्ही स्थिर नसतो. आयुष्यात खूप दुःख आम्ही भोगली.नेहमीच दोघांना वाटायचे आपल्याला मुलं झाली की, आपलं कुटुंब पूर्ण होईल पण देवाने तेही सुख पदरी टाकलं नाही. माझ्या गर्भाशयात दोष असल्याने मला कधीच मुलं होऊ शकणार नाहीत. असे डॉक्टरांनी सांगितल. एकावर एक घात पचवत इथं पर्यंत आलो.त्यानंतर नवऱ्याचा अपघात झाला होता. जवळ जवळ वर्षभर नवरा घरीच व्हीलचेयर वर होता. घरात अन्न खायला नव्हत आणि विचारणाराही कोण नव्हत. त्यावेळी माझी परिस्थिती खूप भयानक यांना घरी ठेऊन मला कामाला जावं लागत. त्यात दवाखान्याचाही खर्च, घराचं भाड पण नवऱ्याने खूप साथ दिली. त्यामुळे नवराही म्हणतो..,"करायचं तर कोणासाठी करून ठेवायचं,म्हणून आम्ही दोघं भरभरून जगतो. हे आयुष्य असच आहे कधी कोणतं वळण येईल सांगता येत नाही,म्हणून आहे त्यात जगायचं, खुश राहायचं हे आम्ही दोघांनी ठरवलं आहे.


तू ही घरात राहतेस म्हणून कमी समजू नकोस. खचू जाऊ नकोस.आज स्त्री घरात राहूनही खूप काही करू शकते.फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेव. नक्कीच तुला घर सांभाळून करिअर करता येईल.


शुभा पुढे म्हणाली, तू खूप लक्की आहेस शिल्पा..... तुझ्या आयुष्यात आईवडिलांसारखं प्रेम करणारे सासुसासरे, दोन गोंडस मुलं आणि एवढं प्रेम करणारा नवरा आहे. ज्याची कधी काहीच तक्रार नसते. इथे आले तेव्हा तुझ्या मुलात माझी मुलं अनुभवली, तुझे सासुसासरे इथे आले की तुझं कौतुक करायला अजिबात थकत नव्हते. सुनेचे तोंडभरून कौतुक करणारे सासुसासरे मी पहिल्यांदाच पाहिले. त्यांना कधी दुखावू नकोस. एक बहीण म्हणून सांगतेय. तुझ्या आयुष्यात हे अनमोल रत्न कधीही गमवू नकोस. तुझ्या फॅमिलीत मी माझी फॅमिली जगली. त्याबरोबर तुझ्यासारखी गोड मैत्रीण मिळाली. शिल्पाचे डोळे पाण्याने भरले होतें. सुधा ही पहिल्यांदाच हळवी झालेली दिसली.तिच्या गळ्यात पडून शिल्पा तिथून निघाली.


शिल्पाला एक एक शब्द तिचा आठवत होता. आज तिला ती जगातील सर्वात सुखी स्त्री जाणवत होती. तीने आज घरात प्रवेश केला पण सकारात्मकतेने मी या घरची राणी अशाच काहीच अविभुशात . मुलाचा वाढदिवस असल्याने ती आज सुंदर साडीत तयार झाली. नवऱ्याने घेतलेला नेकलेस हौसने कधीच घातला नव्हता. तो साडीवर तिने आज घातला होता . वाढदिवसाची सगळी तयारी अगदी मन लावून केली. आज नवऱ्याला जेवणाची ऑर्डर बाहेरच देईला सांगितली. आवरून झालं की ती बाहेर आली, आणि तिच्याकडे सगळेच पाहत राहिले . शिल्पा खूपच सुंदर दिसत होती. सकारात्मकतेचे तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. माधव ही म्हणाला, या राणीसरकार तिला त्या वाक्याने खूपच आनंद झाला. वाढदिवस झाला आणि एक कुटुंबाचा सेल्फी झाला. शुभा ने जाता जाता तिला दाद देत आज माझ्यापेक्षाही सुंदर दिसतेस अशी दाद दिली. शिल्पा तिला हसतच म्हणाली, "हो आहेच मी या घरची राणी....!तिच्या बोलण्याने सर्वजण हसत होतें.


जाता जाता या मैत्रीनेने तिच्या आयुष्याला नवीन कलाटणी देऊन गेली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy