ऋतुजा वैरागडकर

Comedy

3  

ऋतुजा वैरागडकर

Comedy

शुभमंगल सावधान

शुभमंगल सावधान

5 mins
193


शुभमंगल सावधान “मयुरेश वेड्स दर्शना”

( ही कथा फक्त एक विनोदी कथा म्हणून लिहिली आहे, कुणीही मनावर घेऊ नये आणि रागही मानू नये ही विनंती आणि तरी कुणी दुखावलं असेल तर क्षमा असावी ) 

ज्या दिवसाची आपण सगळे आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस अखेर उजाडला म्हणायचा...

आता तुम्ही म्हणत असाल मी कशाबद्दल बोलतेय..अहो विसरलात का आपल्या मयुरेश तांबे सरांचं लग्न नाही का...

“सेलिब्रिटी आहेत का कोणी?"

सेलिब्रिटी....? अहो हे काय विचारताय, सेलिब्रिटीच आहेत ते, सगळीकडे त्यांच्याच लग्नाची चर्चा सुरू आहे.

कॅटरिना कैफ आणि अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या चर्चा नाहीत तेवढ्या यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. मग आहेत की नाही सेलिब्रिटी..

 चला अखेर आम्ही पोहोचलो बुवा त्यांच्या राजापूरला.

 चला..चला तुम्ही पण चला..

बापरे... कालचा काय तो प्रवास? प्रवासातल्या घटना आठवल्या की हसून हसून पोट धरायची वेळ येते, हसून हसून गाल दुखलेत. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. बाकी मज्जा आली ह. सारंग चव्हाण दादाच्या शेतात जी मस्ती केलीय ना ती तर अविस्मरणीय.

आपल्याला उसाच शेत लय आवडलं.. पायच निघत नव्हता तिथून, पण कस आहे ना दुसऱ्यांकडे अस ठान मांडून बसणं बर दिसत नाही.

नाही तर दादा बोलले असते,

दादा दादा म्हणत हिने माझ्या शेतावरच जप्ती केली. उसाचा दंडा व्ह्यायच्या आधी तिथून पाय काढावा लागला.. तिथे गाणे लावून सगळ्यांनी जबरदस्त डान्स केला, त्यातला किमया मॅडम, वृंदा मॅडमचा नागीण डान्स तर अनोखा, जबरदस्त होता. धनश्री मॅडमची प्रॅक्टिस जाम कामी आली इथे.

तिथून निघालो आणि थेट हॉल वर पोहोचलो. इथेही नाश्त्याचा छान बेत झाला.

चला चला मी काय बोलत बसले, सगळे तयारीला लागले..मी पण निघते.

अरे हे काय....कुणीतरी दिसतंय..थांबा थांबा...नवरदेवाच्या रूममध्ये कुजबुज दिसतेय, चला बघूया...

अरे इकडे सगळे जेन्ड्स कंपनी बसलेली..

मी ईश्वर सरांना विचारलं

“काय हो लग्नाच्या आधीच घाबरवत आहात की काय मयुरेश सरांना.”

“नाही..नाही अनुभवाचे बोल सांगतोय..मोतीचुर का लड्डू “खाये वो भी ....और ना खाये वो भी...” हा हा हा बिचारे बोलता बोलता थांबले कारण समोर मिसेस उभ्या होत्या.

आणि नामदेव सरांच्या हातात पेपर दिसला, मी विचारलं

"हे काय?"

तर म्हणाले,

“शुभेच्छा पत्र लिहून दिलंय पहिल्या रात्रीसाठी. दर्शना मॅडमला बघून तोंडचं उघडलं नाही तर. आधीच सोय करून ठेवलेली बरी."

"पण नामदेव पाटील सर तुम्ही तुमच्या मॅडमला वाचायला दिल का आधी."

“नाही हो हे कसं काय देणार”

असो, सोय वरून आठवलं वृंदा मॅडम कडून गोड साबुदाणा जवळ ठेवा बर कधी काय गरज पडली तर.

आणि हो त्यांनी पर्स लॉक केली आहे ते नंबर विसरायच्या आधी घ्या ह..आणि हे शुभेच्छा पत्र वैगेरे केलं त्यापेक्षा अमित मेढेकर सरांचं सेशन करायचं ना तिथून योग्य ती माहिती मिळाली असती.

मी बोलतच होते तितक्यात निशा मॅडम आणि मेघा मॅडम आल्या...

“ऋतुजा बोलत काय बसलीस. अग तयार हो आणि काय ग तुझी डॅमबिस मुले मीनाक्षी मॅडम आणि अपूर्वा मॅडमला प्रश्न विचारून विचारून हैराण केलंय.

तू तयार हो, तू ..मी..मेघा मॅडम, श्रावणी मॅडम..आणि प्रतीक्षा मॅडम वरातीत आपल्याला समोर उभ राहायचय ,मागेहून कुणाला दिसलोच नाही तर.

आम्ही सगळे तयार झालो...

वरात निघाली दर्शना मॅडच्या दारी.

सगळे नाचायला लागले.

पुन्हा तेच गाणं लागलं

"मै नागीण नागीण......नागीण नागीण.. नागीण डान्स नचना..

आयो हे कोण लोळतय? राहुल चिंचोळीकर सर. अहो जरा दमानी लग्न झाल्यानंतर लोळायचच आहे.

तिकडून राधिका मॅडम बोलल्या

“लोळू दे ग ऋतुजा, दोन वर्षे कोरोनात गेली मनमुराद आनंद घेऊ दे."

लगबगीने शीतल महामुनी मॅडम बोलल्या ज्याला जे करायचं आहे ते करू दे आपण आपल्या कडे लक्ष द्यायचं कळलं का.?

सगळ्यांच जमिनीवर लोळून झालं. वरात पोहोचली नवरीच्या दारी.

नवरदेव मंडपात उभे राहिले तिकडून सासूबाई समोर आल्या, त्यांनी ओवाळून घेतलं आणि कान जरा जोरातच खेचला..नंतर संधी काही मिळायची नाही.

नशीब अगदीच जोरात नाही खेचला नाही तर लग्न व्ह्यायच्या आधी हॉस्पिटलला पाहोचले असते. नवरदेव पोहोचले स्टेज वर.

आता आतुरता लागली दर्शना मॅडमच्या दर्शनाची. सगळे तातकळत बसले पण नवरीचा पत्ता नाय. सगळ्यांची कुजबुज सुरू झाली.

“अरे काय झालं असेल, नवरी मुलगी आली नाही अजून..”

“काही विचार तर बदलला नसेल ना.."

गर्दीतलं कुणी तरी बोललं त्यातच दुसऱ्यानी हाहाहा करायला सुरुवात केली..कुणाला काही वेळेचं भान नाही.तिसरा बोलला..

मी हळूच संजना मॅडमला विचारलं

“आपण जाऊन बघायचं का...”

“मी पण...मी पण येणार नवरीला बघायला.” रुद्र बाळाची एन्ट्री झाली.

किती ती त्याला उत्सुकता नवरीला बघण्याची..

“रुद्र बाळा तू जा ह..तिकडे ना चंद्रकांत घाटाळ सर बसलेत, ते ना तुला छान छान चंद्र तारे दाखवतील ह..”

तो खरचं खुश होऊन धावत पळत गेला.

आम्ही गेलो नवरीच्या खोलीत, बघतो तर काय मॅडमचा इंटर्व्हिएव सुरू होता.

समोर निधी मॅडम बसल्या होत्या.

“अहो निधी मॅडम काय चाललंय, वेळ कोणती आणि तुमचं काय चाललंय?.”

“लग्न झाल्या झाल्या हे दोघे निघून जातील हनिमूनला मग इंटर्व्हिएव राहून जाईल”

“ईरा व्हॉइस विथ निधी” हे नुसतं नावपूरतच झालं, मला हल्ली ईरा वर येताही येत नाही आहे, अमितसरांचं बर आहे मधात कधीतरी चक्कर होतेच..म्हणून विचार केला यांचा तरी इंटर्व्हिएव घेऊनच घेते.”

काय मॅडम.चला चला मुहूर्ताची वेळ निघून जाईल. नवऱ्या मुलीला बघून सगळ्यांनी हुश्श केलं.

नवरीला बघून नवरदेवाची धडधड झालीआणि लगेच गाणं वाजायला लागलं.. मनात हो.

“टिक टिक वाजते डोक्यातधड धड वाढते ठोक्यातटिक टिक वाजते डोक्यातधड धड वाढते ठोक्यात”

इकडे घड्याळाची पण टिक टिक सुरू व्हायला लागली. नवरीने बघितलं नवऱ्या मुलाकडे, दोघांची नजरानजर झाली, नवरदेवाच्या मनात पुन्हा गाणं वाजायला लागलं.

“नजर के सामने जिगर के पास

कोई रहता है वो हो तुम....”

अहो आता हे सगळं सांगायची वेळ आहे का, त्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला असतो. काही कामे दिलेल्या वेळेतच करावी लागतात.

कथा कुठेही बसून लिहिता येते अगदी ट्रेन मध्ये सुद्धा. पण हे अस नसत.

पंडितने दोघांच्या हातात हार दिले. त्यातल्या गुलाबाच्या फुलांनी नवरदेवाला शिंका सुरू झाल्या. एलर्जी आहे म्हणे त्यांना गुलाबाच्या फुलांची, कठीण आहे बाई लग्नानंतर

ह्यो माणूस हिला गुलाबाचं फुल देणारच नाही की काय...लग्नाआधीच झाला बट्ट्याबोळ.

मंगलाष्टके सुरू झाली.

“स्वस्ति ..श्री.. गणनायक गजमुखम ......….......शुभमंगल सावधान..“गोत्रे..भिन्न परस्पराहुनी कशी.........शुभमंगल सावधान.

पाचही मंगलाष्टके ऐकून नवरदेव अगदी सावधान झाले. नको नको ते विचार सुरू झाले..

“ मी बंदिस्त झालो. मी अडकलो...मी पुरता फसलो.

तरी मित्र सांगत होते...नको रे पडू यात...पण तरी मी पडलो."

आता मी बॅचलर नाही, म्हणजे मला बॅचलर पार्टीला जाता येणार नाही..

घरी वेळेत यावं लागेल,नाही आलो तर बेलनने स्वागत होईल.

नवरदेव तिथेच जोरजोरात ओरडायला लागला

“नाही..नाही."

बाजूला ईश्वर सर उभे होते त्यांनी नवरदेवाच्या खांद्यावर हात ठेवून धीर दिला.

“पाण्यात पडलाय ना,मग पोहायला शिका...”

समोरून आवाज आला.

“अहो हार घातलाय ना...”

“ह..हो..हो..घालतोय ना."

दोघांनी एकमेकांना हार घातले...

झालं एकदाच .

शुभमंगल सावधान.....

मयुरेश वेड्स दर्शना

 

समाप्त:


 

 

 



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy