ऋतुजा वैरागडकर

Others

3  

ऋतुजा वैरागडकर

Others

कधी कधी बदलावं लागतं...

कधी कधी बदलावं लागतं...

3 mins
187


नेहा आणि अमित सुखी जोडपं..

लग्नाला दोन वर्षे झालेली..

सुरवातीचे दिवस खूप छान गेले.

नेहा, अमित, सासू रमा आणि सासरे प्रदीप अस चौकोनी कुटुंब..

सगळं आनंदीत चाललेलं होत... पण हळूहळू अमितच्या स्वभावात फरक जाणवायला लागला.. त्याच्या वागणुकीत फरक जाणवायला लागला.. तो घरी विचित्र वागायचा, चीडचीड करायचा, नेहाशी पण छोट्या छोट्या कारणांवरून तो भांडायचा, चिडायचा...असे बरेच दिवस सुरू होत...

एकदा तर त्यानी नेहा वर हात उचलला होता,तेही नेहाची काहीही चूक नसताना... रमा आणि प्रदीपने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला,पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता..

"आई तू गप्प बस, आमच्या मध्ये बोलू नकोस.. मी आधीच तुम्हा दोघांना सांगतो माझ्या आणि नेहा मध्ये बोलायचं नाही...

अस दटावून सांगितलं...

रमा आणि प्रदीप खूप दुःखी झाले , त्यांना आश्चर्य वाटलं आपला मुलगा आपल्याशी असा कसा वागू शकतो.. दोघेही गप्प झाले आणि त्यानंतर काहीच बोलले नाही... ते गप्पच असायचे

आपण काही बोलायचं नाही असं दोघांनी ठरवलं..

नेहा पण खूप दुखावली गेली... ती पण आता त्याच्याशी कमी बोलायला लागली...पण नेहानी ठरवलं यामागचं कारण जाणून घ्यायचं...तिनी अमित वर लक्ष ठेवायचं ठरवलं..

ती त्याच्या मागे मागे ऑफिसमध्ये जायची, त्याच्यावर नजर ठेवायची..

एक दोनदा ऑफिसच्या आता जाऊन तिनी जनरल माहिती काढली, त्यातून तिला काही गोष्टी कळाल्या..

अमितच बाहेर एका मुलीसोबत अफेअर सुरू असल्याचं कळलं.. नेहा आतून हादरली... सगळं संपल्यासारखं वाटलं.. पण ती हरली नाही...

नेहानी हे सगळं घरी सांगितलं...

आता यातून अमितला कसं बाहेर काढायचं याचा विचार ती करू लागली आणि तिनी स्वतःला बदलवायचं ठरवलं.....

अमितच्या डोक्यात काय विचार आहे त्याला काय आवडेल तसा तसा ती विचार करून स्वतःला बदलत गेली, स्वतःला तिनी मॉडर्न बनवलं आणि आधी पेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम करून त्याच मन वळवू लागली.

आपल्या प्रेमाने तिनी हळूहळू अमितच मन वळवल.. त्याचात फरक जाणवायला लागला...तो नेहाशी नीट वागायला लागला पण आई बाबांशी बोलायचा नाही....

त्याची खंत त्या दोघांना होती, त्यांना खटकत होती आणि दोघांनाही त्याचा त्रास होत होता...

एकदा रमाची तब्येत खराब झाली, तिला दवाखान्यात ऍडमिट केलं.... आधी दोन-तीन दिवस तर अमितने ढुंकूनही बघितले नाही, रमाची तब्येत जास्त झाली आणि तिला

पॅरालिसिस झाला आणि एक दिवस तो आईला भेटायला दवाखान्यात केला...तिच्यासाठी डबा नेला, तिला घास भरवून दिला तिची मायेने विचारपूस केली...

रमाला इतका आनंद झाला तिचा आनंद गगनात मावेना.. तिला असं वाटलं की आता मी बरे झाले आणि आत्ता घरी चालत चालत जावं आणि उड्या मारत मारत सगळ्यांना सांगाव हे बघा माझा मुलगा मला परत मिळाला आहे...

काही दिवसांनी रमाला सुट्टी मिळाली..

घरी गेल्यानंतर तिने नेहाला जवळ बोलावलं, तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवत तिला म्हणाली ,

"माझ्या भरकटलेला मुलाला तू माझ्या जवळ आणलंस, मला नव्हतं वाटलं की माझा मुलगा मला परत मिळेल पण तू प्रयत्न केलेस तू स्वतःला बदललं त्याच्यासाठी, तू स्वतः सॅक्रिफाईस केलंस... आणि आज माझा मुलगा मला मिळाला.. तिचा हातात हात घेऊन

" थँक यु सो मच बाळा..

आई... काय बोलताय, येवढे तर मी करूच शकते...

" तरीसुद्धा बाळा थँक्यू असं म्हणत दोघी एकमेकांच्या गळ्या मिळाल्या.....

तितक्यात अमित आणि त्याचे बाबा तिथे आले...

“अरे, वा..हे छान आहे..सुनेचे लाड सुरु आहेत आणि मला विसरलीस आई..

“नाही रे बाळा...तू तर माझा जीव की प्राण...ये इथे..

“बाळा नेहाने तुझ्यासाठी जे केलंय ना,ते विसरू नको...कधी कधी चांगल्या गोष्टी घडाव्या म्हणून स्वतःमध्ये थोडा बदल करायला हवा... तडजोड महत्वाची असते...

अहो तुम्ही काय दूर उभे राहताय, या इकडे..

आता माझ कुटुंब पूर्ण झालं....


Rate this content
Log in