ऋतुजा वैरागडकर

Romance

3.9  

ऋतुजा वैरागडकर

Romance

पहिलं प्रेम..

पहिलं प्रेम..

2 mins
175


ती आणि तो एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच वर्गात शिकायचे...


तिच्या गावापासून त्याचे गाव पाच किलोमीटर पुढे असल्याने, रस्ताही एकच आणि येण्या जाण्यासाठी बसही एकच... हा एक निव्वळ योगायोग...


सुरुवातीला त्याच्या शेजारी ती बसत नव्हती, कधी कधी गाडीला गर्दी होत असल्याने ती ताटकळत उभी असायची.. तो बसायला जागा द्यायचा पण अडसरीत कशाला म्हणून तीच बसत नव्हती...


पंधरा वीस दिवसानंतर त्याला काय वाटले कुणास ठाऊक, त्याने येतानाच, त्याच्या शेजारी हातरुमाल टाकून जागा धरली, ती मात्र बसली नाही....


त्याने विंनती केली


" बस ना... म्हटल्यावर अंग चोरत ती बसली.....


आणि त्या दिवसापासून सुरू झाला त्यांच्या प्रेमाचा काटेरी प्रवास..


एकाच बसमध्ये एकाच सिटवर बसून गप्पागोष्टीचे रुपांतर प्रेमात कधी झाले, हे कळलेसुद्धा नाही..


बस मध्ये कितीही गर्दी असली तरी ती निश्चितं असायची, कारण तिची जागा धरणारा तिचा " तो " त्या गाडीत असायचा. गप्पांच्या ओघात स्टँड कधी यायचे कळायचे ही नाही.


हा प्रवास संपूच नये असे वाटायचे. पण कोणत्याही गोष्टीस शेवट हा ठरलेलाच असतो.


त्यांच्या प्रेमाला ती बस, तो वाहक, चालक, रोज येणारे विद्यार्थी साक्षिदार होते...त्यांच्या पहिल्या प्रेमाचे साक्षीदार...



रविवारी तो येत नसल्याने तीच मन बेचैन व्हायच...


सोमवारी त्याला पहिल्याशिवाय करमत नसायचे.....

त्याच बोलणं, वागणं, राहणीमान सगळ्यांचीच भुरळ पडली होती तीला... त्याचा आकर्षक बांधा ,पिळदार शरीरयष्टी... सगळ्यात हरवून गेली होती ती...



शिक्षण संपल्यावर जीवनसाथी बनण्याच्या आणाभाका ही घेतल्या ...


कॉलेज, कॉलेज कॅन्टीन, सगळीकडेच त्यांच्याच प्रेमाच्या चर्चा आसायच्या....



प्रेमप्रकरण वाढतच गेले, घरापर्यंत गेले आणि सुरू झाला काटेरी प्रवास..


तिचे कॉलेज बंद झाले, तिच्या

भावाने मुलाचा तपास काढला, आणि प्रेमाला विरोध सुरू झाला.


त्याच्या घरच्यांनी त्याचे तिच्याबरोबर लग्न करण्याचे ठरवले. ते स्वत:हून घरी ही गेले, पण तिच्या घरच्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला, ती काहीच बोलू शकली नाही.



नकारा नंतर मात्र तिच्या घरचे तिच्या साठी स्थळ शोधू लागले. परीक्षा ही दिली नाही, शिक्षण आणि प्रेम... अर्ध्यावरच सुटले...


काही महिन्याने तिचे लग्न झाले...




लग्नानंतर ब-याच महिन्यानंतर ती तिच्या गावी गेली...


गावच्या पाटीवर थांबली.... पांढ-या शुभ्र रंगाची एक अलिशान गाडी आली आणि पाटीवर थांबली, गाडीचे काच खाली झाले आणि त्यात तो दिसला.


पांढ-या शुभ्र कोटवर टाय लावलेला, अगदी एखाद्या हिरोसारखा दिसणारा तीच पहिलं प्रेम होता तो..


तिनी मात्र मान खाली घातली, त्याच्याकडे पाहण्याचेही धाडस झाले नाही


त्याचे चांगले झाल्याचे मनोमन समाधान होते.


दोघांची चुकून नजरानजर झाली... डोळ्यात भावना दाटून आल्या....


पुन्हा पहिल्या वहिल्या प्रेमाची आठवण झाली. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance