ऋतुजा वैरागडकर

Romance

3  

ऋतुजा वैरागडकर

Romance

नात्याला गरज एकांताची...

नात्याला गरज एकांताची...

2 mins
166


स्वाती लग्न करून सासरी आली...


भल मोठं वीस पंचवीस जणांचं भरलं कुटुंब...


स्वाती ला एवढ्या लोकांची सवय नव्हती पण हळूहळू तिनी सगळं ऍडजस्ट केलं....


नवलाईचे नऊ दिवस संपले आणि स्वातीच्या वाट्याला कामाची विभागणी आली..


सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काहींना काही कामे सुरू असायची....


समीर सकाळी दहा ला ऑफिस ला जायचा..


तो घरी असेपर्यंत स्वाती ने थोड्यावेळ तरी त्याच्या सोबत बसावं, त्याच्यासोबत वेळ घालवावा... अस त्याला मनापासून वाटायचं..


स्वाती रूम मध्ये चहा नाश्ता घेऊन आली..


"समीर नाश्ता ठेवलाय, पटापट आवरून खाऊन घे...


"बस ना ग थोडावेळ माझ्याजवळ..


"नाही रे, किचन मध्ये भरपूर काम पडली आहेत, मी इथे अशी बसली दिसले तर उगाच कोणाला बोलायला चान्स मिळेल..


"तू इथे माझ्याजवळ थोडावेळ बसावीस म्हणून मी रूम मध्ये नाश्ता बोलावतो... तरीही तूझ आपलंच सुरू असत...


"सॉरी ना रे,मलाही वाटत रे पण ...


"राहूदे, मी जातो...


"अरे पण नाश्ता....


"नको मला, खा तूच...


समीर रागावून काहीही न खाता ऑफिस ला निघून गेला..


रोज असच व्हायचं.... समीर घरी असायचा त्यावेळी स्वाती किचनमध्ये....


रात्री जेवनानंतर समीर रूम मध्ये वाट बघत झोपून जायचा...स्वाती किचन च सगळं आटपून रूम मध्ये जायची आणि तीही झोपून जायची....


हे रोजच व्हायला लागलं..


लग्नाला चार पाच महिने उलटले तरी दोघांमध्ये ते नातंच निर्माण झालं नव्हतं...पाहिजे तसा एकमेकांना वेळ देऊ शकत नव्हते...


आता समीरची चिडचिड वाढायला लागली....


कधी घरच्यांवर तर कधी स्वातीवर तो चिढायला लागला…


स्वातीला त्याच्या मनाची अवस्था कळत होती, पण तिला काहीच करता येतं नव्हतं....


एक दिवस तिची मैत्रीण तिला भेटायला आली,


स्वातीने तिला सगळं सांगितलं...


समीर ची अवस्था, तिच्या मनाची घालमेल...


सगळं सगळं सविस्तर सांगितलं...


त्यावर तिनी सजेस्ट केलं..


"मी एक सुचवू का...?


"हो हो बोल ना...


"तुम्ही दोघे काही दिवसांसाठी बाहेर कुठेतरी दूर फिरायला जा...


तुम्हा दोघांना त्याची गरज आहे ....नात्याला वेळ देण्याची गरज आहे... नात्याला फुलवण्याची गरज आहे... आणि सध्य परिस्थितीत मला इथे शक्य वाटतं नाही...


तू बोल समीर शी...


ओके...


रात्री समीर घरी आणि स्वातीने डायरेक्ट विषयाला हात घातला...


"समीर तू ऑफिस मधून काही दिवसांच्या सुट्ट्या घे, आपल्याला बाहेर जायचय...


"बाहेर कुठे?….आणि मला अश्या सुट्ट्या मिळणार नाही...


"समीर बॉस नी जर सुट्ट्या नाही दिल्या ना तर त्याच्या तोंडावर राजीनामा फेकुन ये..


"स्वाती काय चाललंय...


"समीर.. इकडे बघ.. समीर आपण काही दिवसासाठी बाहेर फिरायला जातोय .... फक्त तू आणि मी ....


हे बघ समीर, इथे आपल्याला एकमेकांना वेळ देता येत नाही, तुझी चिडचिड होतीय मला कळतंय आणि म्हणूनच मला अस वाटत आपण काही दिवसांसाठी बाहेर जावं... तुला काय वाटत...


"तुझं बरोबर आहे...


"स्वाती बॅग पॅक करायला घे, आपण सकाळी निघतोय...


"अरे.. ऑफिस च्या सुट्ट्या?..


"गोली मार...


दोघेही हसले..


सकाळी स्वाती आणि समीर तयार झाले... बॅग घेऊन रूम मधुन निघाले...सगळे आश्चर्याने बघायला लागले...



"अरे, तुम्ही दोघे कुठे निघालात.?..


"बाबा आम्ही काही दिवसासाठी बाहेर चाललोय...


"अरे सांगायची, विचारायची काही पद्धत असते की नाही...


"सॉरी बाबा, वेळेवर ठरलं... दोघांनीही नमस्कार केला आणि निघाले....


दोघेही उटी ला गेले....


तिथे त्यांनी खूप एन्जॉय केलं, त्यांना एकमेकांना वेळ देता आला... समीर च्या चेहऱ्यावरचा स्ट्रेस कमी वाटत होता.... स्वाती चा चेहरा खुललेला होता...


एकमेकांच्या स्पर्शाने दोन्ही शरीरानी संमत्ती दिली होती...


नवीन नात खुलायला लागलं होतं...


एकमेकांची ओढ हवीहवीशी वाटत होती...


मन आणि शरीर दोन्ही समरस झाले होते....


एकमेकांत विलीन झाले होते ..


समाप्त:


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance