शर्यत जिंकायला मानीत सार्थक
शर्यत जिंकायला मानीत सार्थक
आजकालच्या काळात एका स्त्रीने आपल्या मनासारखे करायचे म्हणजे फारच कठीण असते. त्यात जर लहान बाळ असले तर मग तेव्हा फजितीच होते. पण ही कहाणी जर तुम्ही वाचलं तर नक्कीच तुमची पण मनातली शक्ती मजबूत होणार आहे.
ज्योती क्षीरसागर यांना मानीतच्या रुपात पुत्र झाल्यावर त्यांचे वजन खूपच वाढले होते. मानीत जेमतेम एक वर्षाचा झालाच होता की त्याचवेळी सीआयडी विभागातील महिलांचा ‘जाऊ बाई जोरात’ नव्हे तर ‘धावू बाई जोरात’ चा नारा चालला होता. ज्योतीला वाटले आत्ता कुठे मानीत खूपच लहान आहे, त्याचा मागे धावायचे की.. पुढचा पर्याय विचारात ही नव्हता.
तिच्या मनात वेग वेगळे विचार येऊ लागले, अजून मानीत खूपच लहान आहे आणि मी त्याची आई म्हणून त्याची काळजी घेणं पण तितकच गरजेचं आहे. ज्योतीला धावायची पण खूपच हौस होती आणि अगदी मनापासून.
पण तरी ही तिने मनात ठरवलं होतं की कसे ही करून आपले वजन पण कमी करायचेच आहे आणि आपली धावायची हौस पण प
ूर्ण करायची .
त्यानंतर त्यांचा महिला मंडळाचा उत्साह बघूनच ज्योतीला वाटले की धावायचा सराव सुरु करावा आणि तिने केले. पहिली शर्यत पूर्ण केल्यावर तिला क्षणभर वाटले की मुलाच्या जन्मामुळेच हा योग आला. मानीत याचा अर्थ उदात्त गोष्टींचे अनुकरण करणे. त्याचे नाव सार्थक ठरले.
महिला मंडळास खर तर फार धन्यवाद द्यायला पाहिजे की आपल्याला उत्साहामुळे ज्योतीची हिम्मत वाढली आणि तिने शर्यत जिंकली सुद्धा.
अश्या स्त्रीशक्तींना मनापासून नमस्कार आहे, मानीत एकच वर्षाचा असून ही त्याची काळजी घेऊन सुध्दा आपले मनाच करायला फार हिम्मती ची गरज असते आणि ते ज्योती नी करून दाखविले.
असेच कोणते ही काम करायच्या आधी आपण फारच विचार करतो , पण कोणत्या ही क्षेत्रात जर आम्ही सकारात्मक विचार ठेवून जर पुढे वाढू तर नक्कीच यशस्वी हून विजय मिळेल. हेच करून दाखविले आहे ज्योती क्षीरसागर यांनी. आम्हा सर्वांना त्यांच्या कडून शिकायला पाहिजे.