Sangieta Devkar

Inspirational Others

3.5  

Sangieta Devkar

Inspirational Others

सगळ्यांना सक्तीची सुट्टी पण

सगळ्यांना सक्तीची सुट्टी पण

3 mins
624


आज कोरोना विषाणु मुळे सारा देश बंद आहे. सारे व्यवहार, अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे सगळ जग एका वळणावर थांबले आहे पन एक गोष्ट अविरत चालू आहे ते म्हणजे प्रत्येक घरातील आई चे किचन.. जे कधीच बंद होत नाही. आज प्रत्येकाला सक्तिची सुट्टी मिळाली आहे पन आई ला सुट्टी आहे का? तिच्या टाइमटेबल मध्ये काही ही बदल झाला नाही फक्त त्यात अजुन कामाची भर पडली आहे. बाहेर जाने नाही बाहेरचे पदार्थ मिळत नाहीत. मग आहे न हक्काची आई!! तुम्हा सर्वाना सुट्टी मिळाली मग निवांत सकाळी उठने प्रत्येकाला रोज वेगवेगळा नाष्टा हवा असतो कारण रोज एकच पदार्थ आमच्या घशा खाली नाही उतरत मग काय शेवटी आई आहे ना ती! आपल्या मुलांसाठी जी फ़रमाईश ती ते करून देते ते ही आवडी ने न कंटाळता. परत दुपारी जेवनात निरनिराळे पदार्थ . त्यात आता मदतीला कामवाली बाई नाही मग सगळ काम आई वर झाडलोट,साफसफाई,भांडी घासने कपड़े मशीन ला लावणे ते उन्हात टाकने परत सुकल्या वर घड़ी करून ठेवणे आणि हो सध्या प्रेस दुकान ही बंद मग कपड़े प्रेस करन हे ही काम वाढ़ल. संध्याकाळी चहा सोबत परत नाष्टा, घरी बसून बसून भूक लागतेच ना!!


कधी तरी विचार केलात का की आई सुद्धा दमते काम करून थकते. तुमची निवांत सुट्टी सुरु आहे वर्क फ्रॉम होम आहे पन तिच काम मात्र संपत नाही. आई मग ती गृहिणी असो किवा नोकरी करणारी असो घरच्या कामा पासून मुलांच्या देखरेखी पासून तिची सुटका नसते तिला सुट्टी कधीच नसते. घरात 2 लोक असो वा चार काम तर सगळच करावे लागते . आपली प्रत्येक जबाबदारी ती नेटाने पार पाड़त असते ,ती तिच्या आजार पनात देखील सुट्टी घेत नाही . सगळयांच सगळ करते तरी ही बोलनारे बोलतात तू घरीच असतेस तू काय करतेस? सव्हता आजारी असली तरी आपल्या मानसांसाठी उठून ती स्वयंपाक करते पन सुट्टी नाही घेत. कधी कधी चेंज म्हणून जिभेचे चोचले पुरवन्यासाठी आपण हॉटेल ला जातो किवा घरी आर्डर करतो पन तरी ही आई चे काम थांबत नाही ना! आज जो तो निवांत घरी सुट्टी चा मनमुराद आनंद घेत आहे पन आई चे काम वाढले आहे . कोरोना मुळे सगळ लॉकडावून आहे त्यामुळे शहरातील रास्ते,झाड़ वेळी सारा आसमंत,प्रदूषण मुक्त झाला आहे . निसर्ग खुप दिवसांनी मोकळा श्वास घेत आहे ,हवा स्वच्छ झाली आहे,पक्षी प्राणी मनसोक्त शुद्ध हवेचा आनंद उपभोगत आहेत मग आपल्या आई ला ही विश्रांति ची गरज आहे ना? तिला ही जरा मोकळा श्वास घेवू दया,तिला ही आपण 21 दिवसातील काही दिवस तरी सुट्टी देवूयात.


आईच्या जागी घरातल काम करून पहा,मग समजेल आई ही आईच असते म्हणूनच तिला सुट्टी नसते. इथे गुरु ठाकुर यांचे हेअप्रतिम गीत आवर्जून नमूद करावेसे वाटते.आज प्रत्येक घरातील आई साठी समर्पित हे गीत... " पुसते पाणी डोळ्यांमधले घास भरवते जी ती आई ती आई…ती आई बोल बोबडे शिकवीत सारे जग दाखविते जी ती आई ती आई…ती आई विसरून सारे मी पण सोबत हसते रडते जी ठेच लागता सगळ्यात आधी ओठी उमटते ती आई ती आई…ती आई जखमेवरली फुंकर होते दयेचा ही सागर होते घास भरवते जी ती आई ती आई…ती आई श्वास हि देते ध्यास हि देते जगण्याचा विश्वास हि देते तरीही म्हणते जग व्यवहारी आई कुठे काय करते आई कुठे काय करते। !!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational