umesh todakar

Romance

3  

umesh todakar

Romance

साथिया (कथा)

साथिया (कथा)

8 mins
287


सकाळची वेळ होती मी सोफ्यात निवांत झोपलो होतो .तसा सुर्यनारायनाने दर्शन दिल्याशिवाय मी उठतच नसे . पण आजचा दिवस काही औरच होता कदाचित सूर्यनारायण प्रेमाचा गुलाबी रंग घेऊन आला असावा. खरच प्रेमाचा गुलाबी स्पर्श माझ्या डोळ्यांना होणार होता कि काय कोणास ठाऊक ? डोळे उघडले आणि कानावर गुड मॉर्निंग असा छान आवाज आला . डोळे त्या आवाजाच्या दिशेने वळले , त्याच क्षणी डोळ्याचे पारणे फिटल्याचा आनंद मिळाला .समोर साथिया होती . सुंदर हाश्य तिच्या चेहरयावर दरवळत होते . तीला पाहिलं आणि पाहतच बसावं अस वाटल का कोणास ठाऊक मन जारा बेचैन झाल्यासारखं झालं तिचा सुंदर चेहरा तितकेच सुंदर आखीव रेखीव ओठ त्याचा गुलाबी रंग अंगावरती परिधान केलेला फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस तिच्या शरीरावर शोभून दिसत होता . खूप सुंदर सकाळ होती आज; मी उठलो आणि माझ्या ओठातून ही गुड मॉर्निंग असा आवाज आला . आणि प्रतिसाद म्हणून एक सुंदर हाश्य मिळालं . मी उठून आत गेलो ;ती आली होती भाऊ बरोबर कॉलेज ला जायला, आणि ती निघून ही गेली .          


एखादी व्यक्ती समोर येते काय आणि मनात घर करून जाते काय ही कोणती मनाची अवस्था ? काय होत असेल मनामध्ये असे सर्व प्रश्न एका वेळी माझ्या मनात आले. आणि मन गोंधळून गेले. असाच एक दिवस कोलेजला जाता जाता ती मला दिसली आम्ही घड्याळ्याच्या कट्या प्रमाणे एका क्षणी एका मेका समोर आलो . ती होती तिच्या मामाच्या बाईकवर आणि मी होतो नेहमी प्रमाणे माझ्या बाईकवर .“ मामा म्हणाला “‘ मेजर कॉलेज सुटल्यावर साथिया ला बरोबर घेऊन ये.’मग काय मी जरा स्टाइल मध्ये म्हणालो.‘ मला कसं कळणार कुठे थांबायचं ते; ‘‘ त्यात काय एवढ तिला फोन कर की मामानं प्रतीउत्तर दिलं,’“ मी म्हणालो “‘ माझ्याकडे नाही तिचा नंबर ; ‘‘ ये सांग की ‘ मामा म्हणालाआणि काय तिनं आपल्या सुंदर ओठातून सुंदर अक्षरांना हवेत अलगद सोडून दिलं . आणि बघता बघता ते सुरील स्वर माझ्या कानावर पडले. मीही ते अलगद मनावर कोरून ठेवले , कायमचे. आणि त्याची एक कॉपी माझ्या मोबाईल मध्ये जतन करून ठेवली आणि आम्ही पुढे जाऊ लागलो .          


मला आजही आठवतोय तो क्षण तिचं नंबर देतानाच स्मित हास्य माझ्या काळजावर घाव घालून जातं . असं हाश्य पाहिल्यावर कोण नाही पडणार त्याच्या प्रेमात . सांगा ना ? कॉलेज मध्ये गेल्यावर मी एक सुंदर असा तिला मेसेज पाठवला पण रिप्लाय काय आला माहित आहे का ? मराठी मेसेज पाठउ नका आमचा मराठी अभिमान येथेच संपला आणि इंग्रजी च प्रेम निर्माण झालं . मग काय एक नाही तर दुसरा तो हि हिंग्लिश म्हणजे मराठी मेसेज इंग्रजी मध्ये टाईप करून , मग काय रिप्लाय हजर . मैत्रीची विन मेसेज मधून बांधण्यास सुरवात झाली . एखादी सुंदर मुलगी पाहिल्यानंतर आपण तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडतो . पण तिला मिळवण्याचा आटाहास मात्र नसतो . किंबहुना तसेच माझे प्रेम होते. सौंदर्याची उपमा कोणालाही करता येणार नाही . आणि ते कोणत्याही मापपट्टीत मोजता येणार नाही . असच असतं ते आणि अशा सुंदर मुलीवर तितकच नितांत सुंदर प्रेम मी करू लागलो . आणि ते ही निस्वार्थी पणे ; माझी आणि तिची नित्याचीच भेट होऊ लागली. भेटीमधुनच मैत्री वाढली आणि मैत्रीतूनच जवळीकता निर्माण झाली . हि जवळीकता मेसेज मधून स्पष्ट जानवु लागली . तिची मेसेज मधील प्रत्येक ओळ माझ्या रुधयाला स्पर्श करून जात होती. आणि सांगत होती . मी तुझीच आहे रे सख्या फक्त तुला ओळखता येत कसं नाही रे . मी प्रत्येक शब्दामधून हेच सागत असते पण तू समजूनही न समजल्यासारखे का करत असशील ;असा सवाल ती करत असेल ; असं प्रत्येक मेसेज मधून मला जाणवत होतं. असंच दिवस जात होतं आणि आमची मैत्री आघाद होत होती . आणि नकळत तिला प्रेमाची झालर चढत होती . आणि त्या झालरीवर साथिया व मेजर अशी दोन नावं कोरली जात होती.           


नकळत होणार हे प्रेम कोणत्या ना कोणत्या मार्गाने माझापुढे स्पष्ट होत होत . त्यामध्ये भावना होत्या , डोळ्यांचे इशारे होते , न बोलताही बरच काही सांगून जाणारी अबोलता होती , जवळ येताच दोन्ही रधयाची होणारी धकधक होती . आपुलकी, ओढ होती. सतत होणारी मनाची तगमगता होती , न सांगताही मनातील भावना ओळखणारी, मनात काय चालालय हे ओळखणारी रधये होती . आणखी काय हवं होतं स्पष्टीकरणासाठी ; मीही निसर्गनियमाना डावलू शकत नव्हतो आणि मलाही तसंच वाटू लागलं नकळत माझ्याकडून ही तिला होकार जाऊ लागला आता आम्हाला न सांगताच दोघातील प्रेमाच्या भावना कळू लागल्या . साथियाला मेजर मध्ये आपलं आयुष्य दिसू लागलं आणि मेजरला साथियात आपलं आयुष्य दिसू लागलं ही मनांची देवान घेवाण सतत चालूच राहिली . आणि या देवान घेवाणीतून . प्रेमाची विन घट्ट होऊ लागली . त्या वीणेला प्रेमाचे सप्तरंग प्राप्त होऊ लागले. आयुष्याचा धागा घट्ट होत होता कधीही न तुटण्यासाठी . असाच प्रवास सुरु होता.         


वार्षिक परीक्षा जवळ येउन ठेपल्या होत्या . आता मात्र हे तासंतास बोलन मेसेज कारण बंद कराव असं वाटलं आणि आम्ही ते बंद केलं . पण त्याला मन तयार होईना , पण कसतरी त्याला तयार केलं एक माहीना संपर्क तुटला , समाजावर कशी नैसर्गिक आपत्ती कोसळल्यावर जगाशी संपर्क तुटतो . आणि काही क्षण सर्व संपल्याची जाणीव होते . तसं काही क्षण मला जाणवू लागलं . पण आपत्ती काही दिवसच असते तसा हा दुरावा काही क्षणांचाच आहे याची जाणीव होती त्यामुळे दोघांनाही सांभाळून घेणं सहज शक्य झालं . परीक्षेचा शेवटचा दिवस कधी येतोय याची दोघेहो आतुरतेने वात पाहत होतो . कारण त्या दिवशी आम्ही काही क्षणांसाठी एकत्र येणार होतो . तो आनंद सेलिब्रेट करणार होतो . आणि तो दोवास उजाडला साथीयाचा पेपर ३ ते ६ होता . त्यामुळे व.स. कॉलेजवर ५:३० ला जाण्याचा प्ल्यान केला आणि तिथून एकत्र नाश्ता करण्याचे प्ल्यानिंग पुढे गार्डन मध्ये फिरणं असं एकंदरीत माझ प्ल्यान . ते ठरवून मी घरातून बाहेर पडलो . कॉलेजच काम आटोपून मी ५:३० ला व.स. कॉलेजवर पोहचलो . अर्धा तास बाहेर घालवावा लागला . बेल वाजण्याची जणू काही चातकाप्रमाणे वात पाहत होतो . चातकाला जसी पावसाच्या एका सरीची प्रतीक्षा लागते . तसी या मेजरला क्षणाच्या भेटीची ओढ लागली होती . आणि ती ओढ काही क्षणातच पूर्ण होणार याचा आनंद ही तेवढाच होत होता .        


वाऱ्याची झुळूक यावी आणि झाडाची पानं अलगद झुलावीत आणि त्याच्या झुलण्याबरोबरच येणारा गार वारा मनाला सुखद गारवा देऊन जावा . तसीच काहीशी भावना तिच्या दर्शनाने माझ्या मनामध्ये निर्माण झाली . साथिया समोर दिसताच , मन वाऱ्या प्रमाणे अलगद तिच्यापर्यंत पोहचले देखील तिच्या नाजूक देहाला स्पर्श करून क्षणात माझ्यापर्यंत पोहचले सुद्धा . आता ती आली तिनं पाहिलं ती हसली . आणि …..‘ चला ’ म्हणाली.’' मी हि चल म्हणालो 'बाईक चालू झाली तसं विचार चक्र हि तिच्या चाका प्रमाणे फिरू लागली त्याना मनाचा ब्रेक काही केल्या लागेना . ठरल्या प्रमाणे आम्ही आमच्या प्रेमाचे नाजूक क्षण एकत्र बहरू दिले . पण त्यांना कोणतेही व्यभिचाराचे गालबोट लागू न देता . हे त्यातील वैशिष्ठ्य." इतके दिवस का फोन केला नाहीस "' ती म्हणाली '" तुझी आठवण आली की जातच नाही "" का " मी म्हणालो' का कोणास ठाऊक '' पण '" पण काय "" काही नाही "' बोल ना '' तूच बोल '" माझ्या पासून दूर राहताना काहीच वाटलं नाही तुला "' असं तुला वाटतंय '' काय माहित ' मी म्हणालोतसं ती शांतच झाली' अरे बाबा असंच म्हंटल ' हो का ? बरं ?" ये "" हु "आपण आता बागेत जाऊ ब आईस्क्रीम खात खूप खूप बोलू' असं म्हणत आम्ही निघालो '       


आता साथिया आणि मेजर यांच्या लव्ह स्टोरी ला एक अनोख रूप मिळालं ,ते म्हणजे संस्काराच आम्ही काहीही प्रेमामध्ये आपला पाय घसरू दिला नाही . आणि तो कधी घसरणार ही नव्हता . कारण निस्सीम प्रेमाची ती खून होती . आंतर्मनातून ते निर्माण झालं होतं कधीही न संपण्यासाठी . ते वाढतच जाणार होतं हिमालयाप्रमाणे ; ते शुभ्र होतं त्यातील बर्फा प्रमाणे ; ते शीतल होतं त्यातील थंडाव्याप्रमाणे ; ते आघाध होतं त्याच्या विस्ताराप्रमाणे ; त्याची उंची होती त्याच्या अगाध टोका प्रमाणे . कारण ते प्रेम होतं साथिया आणि मेजर यांच .        पण काळ आणि वेळ कधी बदलेल सांगता येत नाही . आणि बदल हा श्रुष्टीचा नियम आहे . तो कधी न्याय्य असतो तर कधी अन्याय्य असतो ; कधी योग्य असतो कधी अयोग्य असतो .तो त्या त्या क्षणांवर अवलंबून असतो . आमच प्रेम चालू झालं होतं कधीही न संपण्यासाठी पण काळ बदलत होता त्याना न सांगताच; वेळ बदलत होती त्याना न विचारताच ; कारण आता वेळ आली होती आयुष्याचा धागा एकत्र विणण्याची आणि आणि विनता विनता विनता आयुष्याचं वस्त्र तयार करण्याची . आणि त्याची सुरवात ही झाली . तिन मला सांगितलं.“ मी माझ्या घरी आपल्या लग्ना बद्दल विचारते “' मी हि विचार म्हणालो ' आणि तीन तसं केलं हीं पण मला वेळ मिळताच तिच्या मामाला विचारलं मामान मला होकार दिला तुमच्यासाठी काय पण म्हणून त्यांनी आमच्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी दर्शवली . आणि माझा जीव भांड्यात पडला .        


तिनेही तिच्या भावाला सुमित ला सांगितले आणि आमची रत्नागिरीच्या डोंगरावर भेट घडवून आणली . निस्सीम प्रेमाची हिच तर पोचपावती होती . साथिया माझ्याबरोबर होती पण वेळ मात्र माझ्या बरोबर नव्हती . तिचा मामा आमच्या आयुष्यात शकुनीमामा म्हणून आला होता . हे आम्हा दोन जीवाना माहित ही नव्हते . सुमित ने आपली इन्व्हेस्टीगेशन चालू केली आणि शकुनी मामाने आणि मामीने तिचा शेवट केला . माझ्या बद्दल चुकीची माहिती पुरवून हि स्टोरी एंड केलि." मामानं मला दगा दिला " पण आम्ही पण पांडवांचे वंशज या कौरवांना गप्प बसवन्यासाठी मी सज्ज झालो . पण पांडवाना श्रीकृष्णाने मदत केली म्हणून ते जिंकले . पण इथे जिंकण्यासाठी श्रीकृष्ण कोठून येणार . माझा श्रीकृष्ण ही तोच होता आणि राधा ही तीच होती .साथियान जर कृष्णाची भूमिका केली असती तर आम्ही जिंकलो असतो . पण या आधुनिक श्रीकृष्णान तटस्थतेचि भूमिका घेतली . आणि आमची संसारमार्गावरून चालणारी गाडी रुळावरून घसरण्यास सुरवात झाली .        


महाभारतात शकुनी मामानं पांडवावर जसं जाळं पसरवलं होतं तसं जाळ आमच्या भोवती पसरलं गेलं होतं आणि त्या जाळ्यात मात्र शेवटी मीच अडकलो . कधीही न बाहेर निघण्यासारखा . साथियाच्या बापा बरोबर मामान शाळां करून माझा अलगद काटा काढायचा ठरवलं हे साथियाला ही माहित होतं . पण तिनं या क्षणी आपली बाजू सेफ ठेवली . आणि तीन कर्ण अवतार धारण केला . ज्या क्षणी श्रीकृष्ण व्ह्यावयाच होतं त्याक्षणी ती कर्ण झाली आणि कौरवांची बाजू घेतली . आणि बापाला आंधळा धृतराष्ट्र केलं मग काय त्यान कौरवांची बाजू घेतली. ज्या श्रीकृष्णाच्या जोरावर हे कुरुक्षेत्र जिंकायचं होतं त्यानंच कर्णावतार धारण केल्यानं आमचा सपशेल पराभव आम्हाला दिसू लागला . पण यातूनही विजय मिळवण्यासठी स्वतः श्रीकृष्ण होण्याचा प्रयत्न केला पण सर्व पात्र एकट्याने करण्यासाठी तो काय एकपात्री प्रयोग नव्हता . ती होती जीवनाची शाळा , आणि त्यात नंबर येण्याऐवजी आम्ही नापास होणार याचं जाम टेन्शन मला येत होतं .आणि अतोनात प्रयत्न करूनही मी नापास झालो .      


आता आम्ही वरून मी पर्यंत प्रवास पोहचला होता. आणि तोही तेथेच थांबण्यासाठी . कारण ना श्रीकृष्ण माझ्याबरोबर होता ना माझी राधा माझ्याबरोबर होती . फक्त एकटाच होतो या प्रेमाच्या विराण कुरुक्षेत्रावर ; त्याचं शेवटचं अस्तित्व पाहत ; अगदी एकटाच ; अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी प्रेमभंगाची जखम घेऊन, अगदी एकटाच!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance