योग गुरुंचा सहवास
योग गुरुंचा सहवास
योग हा मानवी जीवनातील अतीशय महत्वाचा घटक आहे. मानसाला दिर्घायुषी व विना आजार तंदरुस्त रहायचं असेल तर योगसाधनेकडे वळावं लागेल. हे मी प्रामाणीकपणे सांगतो. कारण मानसाला ज्यावेळी एखादी शारीरीक व्याधी निर्माण होते व कीतीही औषधे गोळ्या खाऊन पैसा बरबाद करुन म्हणावा तसा फरक पडत नाही त्यावेळी तो इतर पर्याय शोधु लागतो. मलाही असाच एक पर्याय सुचला. योगाकडे अक्षम्य दुर्लक्ष करणारा मी जेव्हा कंबरदुखीने हैराण झालो होतो. डाँक्टरकडे जाऊन औषध गोळ्या एक्स रे इ. साठी दोन हजार रू खर्च करुन ही माझी कंबर दुखी थांबेना. मला तर असं वाटु लागलं की, आनखी कीती हजार असे जातील व कीती दीवस मी असा त्रस्त राहणार या गणीतीचं कोडंच काही केल्या सुटेना.
असाच एक दिवस शाळेमध्ये योग शिक्षक आमचे परम मित्र श्री. संजय हक्के सर यांच्याबरोबर या विषयावर चर्चा करत बसलो होतो. त्यांना सर्व हकीकत सांगीतली पैशाचा झालेला अपव्यय त्यातुन मिळालेला शून्य रिझल्ट याचा पाढा त्यांना वाचुन दाखविला. त्यावेळी त्यांनी मला शुन्य रुपयांचा इलाज सांगीतला. तोही एका आठवड्यात त्रासापासुन संपुर्ण मुक्ती देणारा. मी ही तो स्विकारला कारण माझ्याजवळ पर्यायच नव्हतां. चला पाहुया तर करुन कुठे पैसा खर्च होनार आहे. झालाच तर फक्त वेळच खर्च होनार या उक्तीप्रमानं मी त्याना होकार दीला ते योग शिक्षक असल्यामुळे त्यांनी मला सुर्य नमस्कार एक संपुर्ण शारीरीक व्यायाम व सुर्य उपासना याची माहीती दीली या विषयावरील पुस्तके वाचावयास दीली व त्यानी योग्य पद्धताने सुर्यनमस्कार कसे घालावे याचे प्रशिक्षण दीले रोज एक महीना त्यानी माझ्यासाठी आपला बहुमुल्य वेळ दीला व सुर्यनमस्कार शिकवीले प्राणायाम मेडीटेशन यांच ज्ञान दीलं. माझ्या पोटाची ढेरी ही थोडी वाढायला सुरवात झाली होती. कंबरदुखी ही सतत त्रास देत होती. या सर्वांपासुन मुक्ती मीळवण्यासाठी हक्के सरांच्या मार्गदर्शनाखाली सुर्यनमस्कार घालायला सुरवात केली आणि आश्चर्य काय ? एका आठवड्याच्या आत माझी कंबरदुखी बंद झाली. एक महीना झाला रोज सातत्याने सरांच्या मार्गदर्शनाखाली नित्यनियमाने चार सुर्यनमस्कार घालतो. त्यामुऴे माझे पोटही कमी झाले शारीरीक लवचीकता ही वाढली आहे. आता हक्के सर मित्राचे गुरू झालेत. या योग गुरूंच्या सहवासामुळे माझी कंबरदुखी निघुन गेली पोटाची ढेरी गायब झाली. व पुढे होणारे अर्थिक नुकसान ही वाचले.
या अवलीया मित्राने माझा गुरू बनुन विनामुल्य योगशिक्षा दीली व माझे दवाखान्याच्या माध्यमातुन होणारे हजारो रुपयांचे नुकसान एक रुपया ही न घेता वाचविले मला अवश्यक असणारा शारीरीक व मानसीक बदल घडवुन आनला. अशा या खास प्रथम मित्रांचे व नंतर बनलेल्या गुरुवर्यांचे मानावे तीतके आभार कमीच आहेत. कारण असं म्हणतात की, जिथं शब्द ही कमी पडतात तिथ भावना काम करतात. या दोन्हींचा सुयोग संगम साधुन सरांना पुन्हा एकदा थँक यू व्हेरी मच.
