गुरूविन कोण दाखविल वाट
गुरूविन कोण दाखविल वाट
आक्टोंबर 2013 हा महिना ब-याच घटना घडामोडी माझ्या आयुष्यात घडवुन गेलेला महिना आहे. कारण या महिन्याने ब-याच गोष्टी शिकविण्याचं काम केलेलं आहे. वास्तविकता म्हणजे काय ? या प्रश्नाच ख-या अर्थान काय उत्तर असावं हे सांगणारा महिना असं म्हंटलं तर योग्यच होईल. आक्टोंबर 2013 हा महिना आमच्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या सुगिचा महिना होता निवडणुकीची पिकं व उमेदवारीची पिकं जोमानं येत होती. कारण त्यांना खतपाणी ही तीतक्याच प्रतिचं मिळत होतं आणि अशा या सुगित माझ्या समाजकार्याची मळणी जोमानं होईल याची मला जरा सुध्दा भनक नव्हती. ग्रामपंचायत ही गावातील राजकारण व समाजकारणाचे मंदीर असते पण या मंदीराची पायरी आम्ही कधिही चढलो नव्हतो. पण समाजकारणाच्या मंदीराचे आम्ही नित्याचे वारकरी होतो. आणि याची वारी आम्ही सातत्याने केला आहे. या वारीचे प्रथम कार्य म्हणजे मी गावच्या कोणत्याही सामाजीक कार्यात हुरहूरीने भाग घेत असेव घेत आहे. मग तो कोणाच्या घरचा लग्न समारंभ असो की आणखी कोणता कार्यक्रम असो, गावच्या लोकांना एकत्र आणुन समाजप्रबोधनाचा कार्यक्रम असो, कींवा गावच्या विकासाचा मुद्दा असो, मी नेहमी अग्रस्थानी आसणार. हे वेड मला वयाच्या 11, 12 व्या वर्षापासुन होतं. त्याचं श्रेय मी फक्त माझ्या वडीलांना (आण्णा) देईन कारण समाजकारणाचा वसा त्यांच्या पासुनच मला मिळाला. कारण माझे वडील मिलेट्री मॅन होते. राटायर्ड झाल्यावर ते आपल्या मिठारवाडी गावात आले. गावची दुर्देवी अवस्था पाहून त्यांनी निर्णय घेतला की या गावचा कायापालट करायचा त्यासाठी त्यांनी प्रथम समाजातील लोकांना एकत्र आणलं. गावाला लाईट नाही, रस्ते नाहीत, प्यायला पाणी नाही, गटारे नाहीत, देऊळ नाही. एकुण एक काय गावाला गावं म्हणावं असं इथं काहिच नाही. त्यामुळं ते सर्व करणं क्रमप्राप्त होतं त्यासाठी समाजकार्याबरोबर राजकारण करणं क्रमप्राप्त होतं.
त्यावेळी म्हणजे 1980 च्या दशकात आंबवडे ग्रामपंचायत मध्ये आमचं गाव होतं. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नव्हती त्यामुळे आण्णांनी ग्रामपंचायत सदस्यत्व स्विकारलं. ते सदस्य झाले आणि त्यानंतर गटारे बांधणे, लाईट गावात आणणे, ही कामे आपल्या सहका-यांच्या जोरावर केली. गावात लाईट आली आणि दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशातुन लखलखत्या स्वच्छ प्रकाशात गावातील लोक राहू लागले. पिण्याच्या पाण्यासाठी गावात बोर मारलं त्यावर पाईपलाईन टाकुन पाणी भरण्याची व्यवस्था केली. सर्वांना एकत्र करून गावात ग्रामदैवत हनुमानाचे मंदीर बांधण्याचा संकल्प केला. व सहका-यांसोबत वर्गणी गोळा करण्यास सुरवात केली. व एक प्रण केला की मंदीर पुर्ण होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही. या प्रयत्नांनायश आलं मंदीर बांधकामासाठी निधि जमु लागला, काम चालू झालं व ते पुर्ण ही झालं. काहींनीयामध्ये दगा देण्याचं बदनामी करण्याचं राजकारण केलं पण हनुमंताच्या कृपेनंत्यांना त्यात यश मिळालं नाही काही दिवसानंतर गावातयात्रा भरू लागली यात्रातील कार्यक्रम होवू लागले. लोकांच्या मनोरंजनाचं साधन गावातचं उपलब्ध झालं. आणि गावाला गावपण येऊ लागलं. हे होता होता 1980 च दशक उलटुन 1990 च्या दशकाला सुरवात झाली होती. आता साक्षरतेचं महत्व लोकांना कळू लागलं होतं. यासाठीच गावातील शाळेला चांगलं वैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी कसोटीचे प्रयत्न केले. व चांगल्या शिक्षकांची नियुक्ती प्राथमिक शाळेसाठी करून घेतली. गावात एक सार्वजनिक वाचनालय सुरू केलं. त्याचं नामकरण हनुमान सार्वजनिक वाचनालय असं केलं. पण समाजातील अशिक्षिततेमुळे ते जास्त दिवस चाललं नाही व ते बंद पडलं. या काळातचं गावात स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली. निवडणुका गावातचं होवू लागल्या नवनवे नेते निर्माण होवू लागले. नवे युवा कार्यकर्ते निर्माण होवू लागले. त्यातील विचारांची तफावत जाणुन घेत आण्णांनी राजकीय संन्यास घेतला पण त्यांच कार्य सर्वांच्या लक्षात राहिल असचं होतं. पण त्यांची एक इच्छा त्यांच्या हातुन पुर्ण होऊ शकली नाही. ते सतत बोलुन दाखवू लागले कि, गावात एक वाचनालय सुरू करावं व तेही आम्ही मोठं झाल्यावर सुरू केलं त्याचं नाव बदलुन आम्ही ज्ञानभारती ग्रंथालय असं ठेवलं व ते जोमानं चालू लागलं, त्यानंतर जुनं देऊळ पाडून गावातील लोकांनी एकत्र येवून नविन आर.सी.सी देऊळ बांधलं त्यातही आम्ही सक्रिय सहभाग घेतला. याचं श्रेय फक्त आण्णांनाच द्यावं लागेल कारण त्यांनी ते करण्याचे जनु बाळकडूचं आम्हाला दिले होते. म्हणुनच कदाचीत मी या आक्टोंबरच्या सुगित उतरलो होतो. ग्रामपंचायत सदस्य म्हणुन मी काम करायचं ठरवलं व त्याला लोकांनी पाठींबा ही दिला. व मी बिनविरेध निवडूण आलो व कामाला सुरवात केली त्यामध्ये अनेकांचे सहकार्य मिळाले व अनेकांनी नाहक त्रासही दिला समाजात वावरताना अनेक प्रवृत्तीची लोकं भेटली त्यातुनच ख-या अर्थाने जगण्याचा धडा शिकण्यास मिळाला. मानसांच्या प्रवृत्तीचा परिपुर्ण अभ्यास करावयाचा असेल तर एक वेळ राजकारणाचा गंध घ्यावाचं असं मी म्हणेन, कारण मानवाच्या विविध प्रवृत्तीचं दर्शन हे राजकारण घडवून देत असतं. यापुढे जावून मी कामाला सुरवात केली आणि गावाच्या विविध विकासकामात सक्रिय सहभाग नोंदवुन आपला वेगळा ठसा उमटविला. मी M.A,MLib,B.J एवढ शिक्षण घेतलं समाजकारण राजकारण करत विविध पदे भुषविलीत पण कायम पाय जमिनीवरच राहिले. कारण ही शिकवन आण्णांनी (वडील) दीली. त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. कारण जे काही मिळालं ते काही प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष पण लाख मोलाचं होतं कारण मी घडलो ते फक्त त्यांच्यामुळेच.
