STORYMIRROR

उमेश तोडकर

Inspirational

3  

उमेश तोडकर

Inspirational

गावातुन शहरापर्यंत, प्रवास शिक

गावातुन शहरापर्यंत, प्रवास शिक

2 mins
123

ग्रामीण भागात खेड्या-पाड्यात शिक्षण व्यवस्था सुधारत असली तरी ती मागील दहा पंधरा वर्षापेक्षा बरीच म्हणावी लागेल कारण खेड्यात राहणा-या मुलांना शिक्षणाच्या निमित्ताने छोट्या मोठ्या शहरात जावचं लागतं.

          मिठारवाडी या ६०० ते ७०० लोकवस्ती असणा-या डोगराळ ग्रामीण भागात जिथे जायला व्यवस्थित रस्ता नाही, प्यायला पाणी नाही. अश्या ठिकाणी मी माझं प्राथमिक शिक्षण घेतलं. व माध्यमीक शिक्षणासाठी  वारणा कोडोली या ठिकाणी कोडोली हायस्कुल कोडोली येथे जावं लागलं. सुरवातीपासुन गावातचं शिक्षण घेतले असल्यामुळे बाहेरील वातावरणाची कोणतीही माहीती नव्हती त्यामुळे तेथे गेल्यानंतर फक्त मनामध्ये फक्त भीतीचं होती. गावापासुन १० कीमी अंतरावर असणारं हे गाव व तेथिल शाळेचा प्रवास हा रोज जाणे येणे २० कीलो मीटर सायकलने करत होतो. त्यातचं टेक्नीकल विषय, एन.सी.सी, त्यामुळे पहाटे पाच वाजता उठून आटोपुन प्रवास सुरू व्हायचा व शाळा सुटल्यानंतर सांध्याकाळी ७ वाजता घरी पोहचुन  तो संपायचा अशी सलग न चुकता तीन वर्षे गेली. इतक्या कष्टातुन शाळा शिकलो पण गाव सोडुन बाहेरील मोठ्या शहरी भागात शिक्षण घेताना आपला ग्रामिण भागातील वावर तेथिल बोलण्याची भाषा याची खिल्ली उडायची आणी आमच्या मनात अगोदरचं असणारी भिती आणखीनचं वाढायची. पण या भीतीबरोबरचं जगण्याची नविन कला पण आत्मसात व्हायची. आमच्यातील लाजाळू, कावरा-बावरा स्वभाव, मुलींच्या पासुन चार हात लांब राहण्याची सवय , एकटेपणा, हे सर्व थोडसं का होईना कमी करण्यात या या मोठ्या गावाणे व तेथील मोठ्या शाळेने मदतचं केली आहे.

          दहावी पर्यंतचा हा खडतर प्रवास करून कॅालेज शिक्षणासाठी कोल्हापुर येथील शहाजी छत्रपती महाविद्यालयात प्रवेश घेतला. कोल्हापुर शहरातील वातावरण तर वारणा कोडोली पेक्षाही वेगळ्या पद्धतीचं होतं. आमच्या नजरेतुन असणारं हे भलं मोठ्ठ शहर त्यातील हे भलं मोठ्ठ कॅालेज तेथील स्टायलीश मुले मुली, रस्त्याकडून,बागेतुन, हातात हात घालुन फिरणारी,  बसलेली जोडपी हे पाहीलं की मनाला सुन्न व्हायचं. कॅालेज मधिल मुला मुलींचा एकत्र वावर, मीत्र मैत्रिणींचा दंगा, एकमेकांना खेटुन बसनं, एकमेकात सामवुन जाणारी ती दृश्ये पाहुन पोटात गोळा व्हायचा. हे असं आपण कधी केलंच नाही याचाही न्युनगंड मनात निर्माण व्हायचा. आणि कोणी मुलगी आपल्या बरोबर बोलण्याचा प्रयत्न करू लागलीच तर आंगाला दरदरून घाम सुटायचा,छातीचे ठोके वाढायचे. आम्हाला हे कधी जमलंच नाही. पण याही वातावरणानं काही काळानं आम्हाला आपल्यात सामावुन घेतलं. बी.ए, एम.ए, बी.जे (पत्रकारीता पदवी)  इथपर्यतचे शिक्षण या कोल्हापूर शहरात झालं. कीती फ्रेंडशिप डे, रोज डे, चॅाकलेट डे, व्हॅलेंटाईन डे, प्रपोज डे, असे अनेक डे अनेकांनी आपल्या डोळ्यासमोर साजरे केले. पण आम्हाला यातील एकही डे साजरा करणे जमले नाही. कारण ती हीम्मत, धाडस, आमच्यात आलीचं नाही. पण एक धा़डसं आम्हाला या शहरानं शिकवलं ते या सर्वांहुन मोठं होतं. ते म्हणजे आपलं चालणं, बोलणं, परीस्थिताची जाणिव ठेवून राहणं, योग्य अयोग्याची निवड करणं, धिटपणा, निटनेटकेपणा, या सर्व सवयी स्विकारण्यास मदत केली.

          शिक्षणाच्या अनेक दिशांपैकी योग्य निवड व त्यात असणारी आपली भुमीका व त्यासाठी लागणारे मार्गदर्शन जर कोणी केले असेल तर याचं शहराणं आणि त्यातील माझ्यासारख्या खेडवळ भोळ्या भाबड्या मुलाला मदत करणा-या मित्रांनीच म्हणावं लागेल. कारण हीचं शहरं आपल्याला नाविन्याचा ध्यास घेण्यास शिकवत असतात. व नवनविन बदलांची जाणिव करून देत असतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational