आदर्श राजा प्रभू श्री राम
आदर्श राजा प्रभू श्री राम
चैत्र शुद्ध नवमी हा चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस या तिथीस भगवान विष्णू चा सातवा अवतार असणा-या प्रभू श्री रामचंद्राचा जन्म झाला. व सर्व आयोध्या नगरी आनंदाने न्हाउन निघाली. अयोद्या नगरीला नवा युवराज मिळाला जो भविष्यात मर्यादा पुरषोत्तम, धर्मरक्षक, कर्तव्यदक्ष, प्रजापालक, म्हणुण सर्व भारतवर्षात ओळखला गेला. त्याच्या जन्मप्रित्यर्थ श्री रामनवमी साजरी केली जाते. या दिवशी दुपारी १२ वाजता रामजन्म सोहळा सर्व भारतभर व परदेशातही हींदू बांधव साजरा करतात.
प्रभू श्री रामचंद्र हे हींदू बांधवांचे अराध्य दैवत आहे. जय श्री राम चा जयघोष करत प्रत्येक हींदू बांधव त्यांच्या विचारांची ज्योत सदैव तेवत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जय श्री राम या जयघोषात जी चेतना निर्माण होते ती प्रभूंच्या अंगी असणा-या गुणवैशिष्यांमुळेच.
मर्यादा पुरूषोत्तम ही प्रभू श्री रामचंद्रांना मीळालेली एक विषेश उपाधी आहे. प्रभू श्री रामांचे जिवन त्यांची कर्तव्यनिष्ठा, संयम, शौर्य, औदार्य, हे वंदनीय व आचरनिय आहे. भगवान श्रीरामचंद्रांचा जन्म सुर्यवंशी इक्ष्वाकु वंशामध्ये त्रेतायुगात अयोध्यानरेश राजा दशरथ व महाराणी कौशल्या यांच्या पोटी चैत्र शुद्ध नवमी दीवशी झाला. व आयोध्या नगरीला नवा युवराज मिळाला. त्यांनी पुढे जनकल्यानासाठी अविरत काम केले.
मार्गशिर्ष महीन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला अयोध्यानरेश राजा दशरथ यांचे पुत्र प्रभु श्रीराम व मिथीलानरेश राजा जनक याची कंन्या जानकी (सीतामाई) याचा विवाह शिवधनुष्य उचलुन स्वयंवराने झाला. हा दिवस विवाह पंचमी म्हणुन आजही साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये राम सीता यांना आदर्श पती पत्नी मानले जाते. कारण त्यांच्यातील परस्पर प्रेम, दृढ विश्वास, मर्यादा, आपुलकी, संस्कार, त्याग, प्रचंड इच्छाशक्ती, असीम धैर्य, पराक्रम यांचा उत्तम संगम त्यांच्यामध्ये अढळून येतो म्हणुनच त्यांचा आदर्श पती पत्नी म्हणुन उल्लेख केला जातो. पुढे अंजनीपुत्र श्री हनुमान यांचा सहवास त्याना लाभला व त्याच्या व वानर सेनेच्या मदतीने सीतामाईना लंकेतुन सहीसलामत आनण्याचे व लंकाधीश रावण यांचा सर्वनाश करण्याचे कार्य श्री हनुमंतांच्या सहकार्याने केले.
संपुर्ण भारतवर्षाचं आराध्य दैवत म्हणुन प्रभु श्री रामचंद्रांना जगभर ओळखलं जातं. ज्या आयोध्या नगरीत त्यांचा जन्म झाला त्या नगरीत शरयू नदी कीनारी आजही भव्य दीव्य प्रमाणात रामजन्मोत्सव साजरा केला जातो.
राम या शब्दाचा अर्थच मुळी स्वयंप्रकाश, अंत:प्रकाश, स्वतच्या आतील प्रकाश असा होतो. त्यांच्या कार्याचे व गुणवैशिष्ट्यांचे आचरण सर्व हींदू बांधव करतात. प्रभू श्री राम हे आदर्श पुत्र, पती, बंधु, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष, प्रजापालक, पितृवचन पालक, मातृभक्त, एकवचनी, आदर्श व्यक्तीमत्व आहेत. आई वडीलांची आज्ञा माणून चौदा वर्ष वनवास भोगणारा राजा म्हणजे प्रभु श्री राम, रावणाने आपल्या पत्नीचे हरण केले म्हणुन लंकेत जावून रावणाचा वध करून पत्नीला परत आणनारा आदर्श कर्तव्यदक्ष धर्मरक्षक पती, प्रजेच्या रक्षणासाठी सर्व दृष्टांचे निर्दालन करणारा प्रजापालक कर्तव्यदक्ष राजा, मातेचा आदेश अंतीम माणुन राजगादीचा त्याग करणारा आदर्श मातृभक्त राजा, पितृवचन पाळुण सर्वस्वाचा त्याग करून वनवासी होणारा आदर्श पुत्र, आपल्या पश्चात आपला हक्क सोडून आपल्या लहान भावाला राजगादीवर बसवणारा आदर्श बंधू, सर्व महात्वाच्या जबाबदा-या हाती देवुन हनुमंतावर विश्वास दाखवणारा श्रेष्ठ स्वामी, दिलेल्या वचनाला जागणारा एकवचनी एकपत्नी राजा, अशा अनेक गोष्टींमुळे प्रभुंचे गुणगाण गायले जाते.
प्रभु श्री राम हे हींदू धर्मीयांचे आदर्श अनं लाडके दैवत आहे कारण जनकल्याणासाठी, धर्मरक्षणासाठी, दृष्टनिर्दालनासाठी, भगवान विष्णूनी जे दशावतार घेतले त्यातील सातवा अवतार म्हणजे प्रभू श्रीराम होय.
ह्या आदर्श देवावताराची आपल्याला सदैव आठवण रहावी ते आदर्श, ते गुण, ते वचन, ती कर्तव्यनिष्ठा, ते शौर्य, औदार्य, ते बंधुप्रेम, ते पत्नीप्रेम, ते पुत्रप्रेम, मातृप्रेम, पितृप्रेम, आणि व्यक्तीमत्व आपल्यात उतरावे म्हणुनच रामजन्मोत्सव साजरा केला जातो. मध्यानकाळी दुपारी बारा वाजता रामजन्माचा पाळणा म्हणुन सर्वत्र जन्मोत्सव साजरा करतात व सुंठवडा वाटप करतात. प्रभु श्री रामचंद्राचे अनुयायी म्हणुन , आपले दैवत म्हणुन प्रभुंच्या विचारांचे आचरण आपण करूया म्हणजे हा जन्मोत्सव ख-या अर्थाने साजरा होईल.
जय श्री राम !
