लाचारी
लाचारी
१६ व्या लोकसभेची रणधुमाळी सर्वत्र मोठया उत्साहात चालू होती. अनेक गावे, अनेक तालुके, जिल्हे, राज्ये, या रणधुमाळीची मजा क्रमाक्रमाने घेत होती. आपला उमेदवार म्हणून मिरवणारे कार्यकर्ते गल्लोगल्ली गावोगावी फिरून प्रचार करत होते. गावांच्या कट्ट्या कट्ट्यांवर तरुण, वृद्ध राजकीय चर्चेत भाग घेत होते. घरचा कारभार ज्यांना नीट चालवता येत नव्हता ते राज्यांच्या व देशाच्या कारभाराची सूत्रे आपल्या हातात घेताना गल्लोगल्ली गावोगावी पहायला मिळत होते. लोकांना ; जसा न्युमोनिया तापाचा ज्वर चढतो तसा निवडणुकीचा ज्वर चढलेला प्रत्येक ठिकाणी पहायला मिळत होता. मतांची समीकरणं जुळवण्यात राजकीय पुढारी व्यस्थ होते आणी आर्थिक समीकरणं जुळवण्यात मंडळं ग्रामस्थ व्यस्थ होते. ही बाब प्रकर्षाने गावोगावी पहायला मिळत होती. आणी मिळत राहणार आहे. कारण काळ बदलला, वर्षे बदलली, तशीच माणसाची प्रवृत्ती बदलली तर मग राजकारण का बदलू नये. आर्थिक प्राप्ती आणी येणारे दिवस मौज मजा, दारू मटन, ऐश, यात घालवणारी पिढी वाढत जाताना पाहिली तर दुःखं मानून घेऊ नये, कारण ती काळाची गरज आहे. आणि ती भागवली नाही तर उमेदवार उभा राहूचं शकत नाही. आणि राहिलाच तर तग धरू शकणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. याची जाणीव जनमाणसांनाही आहे. असाच निवडणुकीच्या रणधुमाळीचा काळ आमच्याही मिठारवाडी गावात होता.सर्वत्र स्मशान शांतता जाणवत होती पण या स्मशान शांततेतही रात्रकिड्यांचा आवाज व्हावा तशी पुटपुटणारी माणसं ही दिसत होती.आपल्या राजकीय अंदाजाची समीक्षा करत होती. पण उघड उघड काहीच घडताना दिसत नव्हतं. रात्रीच्या स्मशान शांततेत वाऱ्याच्या हळुवार थंड झुळूकेबरोबर कुत्र्यांच्या भुंकण्याचा जोरदार आवाज कानी पडावा कीवां शांत निरामय क्षणी एखाद्या पालापाचोळ्यातून खसखस असा एकदम आवाज यावा आणी अंगावर शहारे येउन झटकन जाणीव व्हावी; तशी जाणीव होताना पहावयास मिळत होती. कोण कोणाला मतदान करणार हे तर सोडाच कोण विजयी होणार याचीही उत्सुकता म्हणावी इतकी पहावयास मिळत नव्हती आमचा मतदार संघ तसा बागायत शेतीमध्ये मोडणारा शेतीमध्ये ऊस हे प्रथम पीक असल्याने या पिकावर आंदोलन करणारे आणि बळीराजाच्या पदरात जास्त भाव पडावा म्हणून प्रयत्न करणारे राजू शेट्टी हे उमेदवार एका बाजूला तर सहकार क्षेत्रात क्रांती करून विविध उद्योग समूह, संस्था, मिर्माण करून लोकांना रोजगार देऊन आर्थिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्न करणारे काल्लापांणा आवाडे हे दुसर्या बाजूला असे जबरदस्त पैलवान राजकीय कुस्तीच्या आखाड्यात संपूर्ण प्रयत्नांती उतरले होते. आणी आपापल्या परीने आपल्या मतांची भिक्षा आमच्या पदरात टाका असे विनवत होते. आता मतदान करणारा मतदार "मतदार राजा " झाला होता. आणी या राजाच्या अंगणात हे उमेदवार आपली झोळी फ़ैलाउन भीक मागताना दिसत होते. आता राजाला मान सन्मान मिळत होता पण या सन्मानाची कोणालाच फिकीर नव्हती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मतदार राजा या सन्मानाला कंटाळला होता. राजा आता राजा राहिला नव्हता तो प्रजेत सामाऊन गेला होता. " आम्ही तुम्हाला मताचा जोगवा देणार तुम्ही त्या बदल्यात आम्हाला काय देणार ?"ही व्यवहाराची भाषा आता पहावयास मिळत होती. मताला २५० ते ३०० रु मिळताना दिसत होते. ते मिळत नव्हते तर मागितले जात होते. ही झाली लाचारी. आणि काही ठिकाणी आम्ही आपणास मतांची भिक्षा देऊ त्याच बरोबर बक्षीस म्हणून काही रक्कम ही देऊ अशी स्थिती सुद्धा पहावयास मिळत होती. एकंदरीतच काय ; जनता देणाऱ्याकडून घेत ही होती आणी मागणाऱ्याला भरभरून देत ही होती . मागणारा तरी याचा योग्य विनियोग क्जेल की ? आणखी काय करेल. याची प्रत्येकाच्या मनात हुरहूर लागत असेलच .पण ……… पण ………" आपल्या बहुमुल्य मताचा जोगवा कोणाच्या पदरात टाकायचा ? "हा प्रश्न मात्र सतत सतावत होता कारण आपण ज्यांच्या पदरात दान टाकतोय ते योग्य त्या पदरातच पडतंय की ; दान पाडून घेण्यासाठी खोटं नाट नाटक करतोय ? हा प्रश्ना कायम सतावत होता दान देताना सुद्धा त्याचा वापर योग्य कारणांसाठी होणार का ? हा प्रश्ना कायमच सतावत राहतोय . तरीही मतदार राजानं आपल्या मताचा जोगवा योग्य त्या उमेदवाराला देऊन टाकला . आम्ही ही आमचं दान ( मतदान ) देण्यासाठी मतदान केंद्रावर निघालो जाता जाताच मोबाईल फोन हातात गेटला व बहिणीला ( मीनाक्षी ) ला फोन लावला भाचा ( दिव्यराज ) आजारी आहे असं कळालं होत. आज सुट्टी ही होती . त्यामुळे मतदान करून तिकडे जायचं प्लानिंग करून फोन केला. प्रकृतीची विचारपूस करतच मतदान केंद्रावर गेलो कोल्हापूरात कोमल हॉस्पिटल मध्ये तो अडमीट आहे. असं ती म्हणाली भेटायला येतोय असं सांगून फोन बंद केला . मतदान केलं दान तर दिलंच पण दिलेल्या दानाचं सार्थक व्हावं अशी मनोमनी अपेक्षा करून बाहेर पडलो. आणि कोल्हापूरला निघालो दवाखान्यात पोहचताच सर्व परिस्थिती पाहिली दिव्य शांत झोपला होता डोळे बंद होते शरीराची हालचाल चालू होती ,जस नाव तसाच तो भव्य दिव्य शरीर यस्ठी असणारा, दणकट, कधीही न आजारी पडणारा, सतत हसत खेळत असणारा, कोणताही त्रास न देणारा, विशेष म्हणजे एक वर्ष वय असणारा हा दिव्य पोलिस मम्माला नोकरीला जाताना टाटा करणारा आणी ती जाताना गालातल्या गालात खुदकन हसणारा आणी परत येईपर्यंत तब्बल दहा ते बारा तास घरच्यांना कोणताही त्रास न देणारा हा प्रतिभावंत बालक आज अचानक आजारी पडला तर फक्त आजारीच नव्हे तर बेशुद्ध पडला तोही तब्बल बारा तासाहूनही अधिक काळ , शरीरावर रोमांच उभा राहिला ;मन कासावीस होऊन गेलं त्याची ती अवस्था पाहून मन बेचैन झालं मनात अनेक विचार आले आणी येऊनही गेले आणी येतही राहिले . त्यामध्ये चांगले कमी वाईट अधिक ; हीच तर मानवाची खरी ओळख नाही का ! चांगल्या विचारापेक्षा वाईट विचारांचा अंमल मनावर अधिक प्रकर्षाने होतो तो माझ्या मनावरही झाला . सर्व टेस्ट करून झाल्या होत्या रिपोर्ट येणे बाकी होते त्याची वात पाहत हॉस्पिटलच्या बाहेरच्या बाकावर बसलो होतो . वेळ जसजशी पुढे जात होती तशी मनात अनेक विचारांची बीजे रुजत होती अंकुरत होती आणी नष्टही होत होती. हे विचारांचे बीजचक्र चालूच होते. दुपारची वेळ होती डॉक्टर केबिनमध्ये आले त्यांनी बेल वाजवली नर्स आत गेल्या . आतून आवाज आला . ' दिव्यराज पाटील ' ' हो म्हणत आम्ही आत गेलो ' ' सर्वांना बोलाऊन घ्या ! डॉक्टर म्हणाले ' मी सर्वाना आत बोलाऊन घेतलं ; सर्वजन एकत्र जमलो डॉक्टर आपल्या भाषेत समजाऊ लागले बाळाच्या शरीरात प्लास्मा ल्याकटिक , व ब्लड अमोनिया याचं प्रमाण अतीप्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळं मेंदूला सूज आलेली आहे. व डोळ्यांवर झापड आलेली आहे. हे प्रमाण का वाढलं याचं निदान करण्यासाठी आपल्याला युरीन व ब्लड ची एक टेस्ट करावी लागेल आणि ती फक्त हैद्राबाद येथेच होते बाकी कोणत्याही ठिकाणी ती होत नाही. त्यासाठी ब्लड युरीन कुरियर ने पाठवावे लागेल. व त्याचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील औषध उपचार करावे लागतील याला साधारणता तीन आठवड्यांचा कालावधी लागेल. हे ऐकताच मन पूर्ण खचून गेलं त्यात शनिवार , रविवार जोडून सोमवारी शासकीय सुट्टी होती . प्रत्यक्ष जाऊन स्वतःहा ते घेऊन येऊ शकत नव्हतो . कारण आठवडा ते पंधरा दिवसातून एकदाच ती टेस्ट केली जाते आणि मेल करून रिपोर्ट दवाखान्यास पाठवले जातात असं डॉक्टर आम्हास म्हणाले . त्यामुळे पुढे कोणताही उपाय चालेना. प्रतीक्षा करण्याशिवाय मार्गच नव्हता. डॉक्टर म्हणाले याअगोदर आपणास अमोनियाचं प्रमाण कमी करण्याच औषध चालू कारावं लागेल. पण या औषधामुले प्रमाण कमी होईल पण संपूर्ण नष्ट होणार नाही. ते पूर्णता बंद होण्यासाठी तो कशामुळे झाला वअमोनियाचा कोणता प्रकार आहे. याचं निदान आपणास पुढील तीन आठवड्यानंतरच कळेल. असं म्हणताच ' मी डॉक्टर ना म्हणालो ' ' हे सर्व ठीक आहे . पण यातून बाळ सुखरूप व्यवस्थित होईल ना ? 'आम्ही प्रयत्न करतो आहोत पण असं काही सांगू शकत नाही. तुम्हाला वाटतोय तितका सोपा प्रोब्लेम नाही खूपच गुंतागुंतीची केस आहे ही. डॉक्टर म्हणाले. त्यांचे शब्द कानावर पडताच सर्वांच्या अंतःकरणातून भीतीचे प्रचंड मोठे कंपन बाहेर पडले. सर्वांचे चेहरे भीतीने सुन्न होऊन गेले. मनाची घालमेल , पोटातून भितीचा गोळा उठला पायातून पाणी साठले ,पाय थरथर कापू लागले.आता काहीच उरलं नाही हि भावना मनात चटकन येउन गेली. अक्षरशः डोळ्यातून पाणीच फक्त यायचं राहिलं होतं याच अवस्थेतून डॉक्टरांनी दिलेली औषधांची लिस्ट घेऊन केबिन बाहेर पडलो सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळू लागले. पण सार्वजन न बोलताच व अश्रू लपून जणू काही धीरच देत होते. मीनाची अवस्था तर बघवत नव्हती देवाकड एकच प्रार्थना होती; की यातून सुखरूप बाहेर पाड काहीही कर पण आमच्या आयुष्यात असला दुःखयेऊ देऊ नकोस. एकीकडे हे डॉक्टरांचे शब्द कानावर आदळल्यानंतर मनावर सतत आघात करत होते. आणि दुसरीकडे मला आदर्श ग्रंथपाल पुरस्कार मिळाल्याबद्दलचे अभिनंदनाचे फोन येत होते. एकीकडे आनंद व दुसरीकडे हुरहूर अशा अवस्थेत दिवस मावळत चालला होता. दवाखान्यात येताना माणसांचा खिसा भरलेला असतो पण बाहेर पडताना त्यात काहीच उरत नसतं पेशंट बारा झालेला असेल तर हलक्या झालेल्या खिश्याबरोबर मनही हलकं होतं. असंच आमचं ही मन हलकं व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. थोडं बाहेर फिरून यावं म्हणून दवाखान्याबाहेर पडलो आणि सायंकाळच्या वातावरणात फिरत शतपावली करून मन हलकं कराव म्हणून थोडं अंतर फिरत गेलो तो पर्यंत मिनाचा फोन आला." कुठ आहेस ? "' आहे बाहेरच ' मी म्हणालो" लवकर ये औषध आणायचं आहे "' आलोच मी म्हणालो ' घाईगडबडीत दवाखान्याच्या दरवाजाजवळ आलो आत पाउल टाकणार तो पर्यंत मागून आवाज आला. " ओ दवाखान्यात आलाय का ? " ' हो मी म्हणालो ' " पेशंट आहे काय, ?" ' होय लहान मुल आहे ' " कोणतं गावं .?" " मिठारवाडी " मी म्हणालो. ' माझं नेबापूर गाव ' तो म्हनाला. अहो काय सांगू माझीही मुलगी या दवाखान्यात अडमीट होती . हसत खेळत असणारी मुलगी अचानक आजारी पडली इथ आणली डॉक्टर बोलले होते ठीक होईल पाण्यासारखा पैसा खर्च केला पण काही उपयोग झाला नाही खूप खूप वाईट वाटलं तीसऱ्या दिवशी ती वारली नियतीपुढं कोणाच काय चालणार म्हणा . पण झालं ते झालं. खूप महागडा दवाखाना आहे. हा पण काय पर्याय नसतो अशा वेळी असं तो म्हणताच माझ्या डोक्यात वेगळाच विचार आला तो म्हणजे तुम्ही इथून पेशंट हलवा अस त्याला सागायचं असेल पण थोड्यांच वेळात माझा भ्रमनिरास झाला . ' तो म्हणाला ' 'माझं एक महत्वाच काम आहे तुम्ही ते करा नाही म्हणू नका. प्लीज ' कोणतं ? " मला एक पन्नास रुपये द्या ? माझ्या गाडीतील पेट्रोल पूर्ण संपलं आहे. ' माझ्याकडे नाहीत हो आत्ता ' अस म्हणालोप्लीज नाही म्हणू नका मी तुमचे पैसे उध्या परत करतो वाटल्यास पन्नास ला शंभर परत करतो. माझा फोन न.घ्या पत्ता घ्या , उद्याच्या उध्या तुम्हाला इथे दवाखान्यात आणून देतो आणि काय सांगू सांगा. मला घरी जायचा खूप प्रोब्लेम झालाय हो. असं तुमच्याकडे पैसे मागायची लाज वाटते हो पण काय करणार सांगा " मी दोन मिनिटे शांत उभा राहिलो विचार केला इकडे दवाखान्यात पेशंटवर पैसा खर्च करून खिसा रिकामा झालाय आणि हा तर दवाखान्याच्या दारात पैसा मागतोय काय कारावं ? दयावेत की नको दिले तर याचा योग्य वापर करेल का ? की ? …………… नाही दयावे तर खरच अडचण असेल तर मदत केली पाहिजे . नाहीतर याला घरी जाण खूप अडचणीच होऊन जाइल रात्रीची वेळ आहे. मलाही दोन वेळा माझ्या गाडीतील पेट्रोल संपले होते तेव्हा आपल्या गाडीतील पेट्रोल काढून देणारे मित्र भेटले होते. मी ही अनेक जणांना माझ्या गाडीतील पेट्रोल काढून देऊन मदत केली होती . अडणाऱ्याला सहकार्य करणे हा मानवी स्वभाव धर्म आहे. आणि तो आपण पूर्ण केला पाहिजे असं म्हणत मी खिशातून वीस रुपये काढत त्याच्या हातावर ठेवले. ' वीसच रुपये आणखी तीस द्या ' असं म्हणालाइकडे खिशात फोन सतत वाजत होता . मन तिकडे सैरभैर होत होते आणि हा इकडे विनवत होता . मनाची द्विधा अवस्था झाली होती .
' आणखी तीस द्या ' असं म्हणाला ' " जातंय तेवढ्यात " असं मी म्हणालो ' बुलेट गाडी आहे नाही जाणार हो ' असं तो म्हणालातेवढ्यात माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली . हा नक्कीच खरं बोलत नसावा जो बुलेट वरून फिरतो आहे तो नक्कीच असं लाचार होऊन पैसे मागणार नाही. दिलेले पैसे परत मागू शकत नव्हतो. फोन तर सतत वाजत होता.दुनियादारिच्या नादात आपण आपलं अतिशय महत्वाच काम विसरत चाललोय याची जाणीव होताच तसाच आत निघून गेलो. औषधाची घेऊन परत बाहेर आलो अंधार पडला होता रस्त्यावरून येणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईटच्या प्रकाशात रस्ता पार करू लागलो . बरोबर मामा ( मीनाचे सासरे ) होते. गाडीवरून मागे वळून पाहिलं तर तोच माणूस दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे उकळत होता. मनाला खूप वाईट वाटलं. मी झालेली सर्व हकीकत मामांना सांगितली मनात राग निर्माण झाला. आजच्या युगातील ही इनड्रेस मधील पॉश कपड्यातील लाचारी व्यक्ती आपण कोणाला लुबाडतोय आणी कोणत्या ठिकाणी लुबाडतोय याची जाणीव सुद्धा नसलेली हरामखोर व्यक्ती हेच पैसे गोळा करून मदिरेच्या आधीन होऊन कोठेतरी गटारगंगेत स्नान तरी करेल नाहीतर घरात जाउन कुटुंबात कलह तरी निर्माण करेल यात काहीच शंका नाही. लाचार पणे भीक मागावी पण हॉस्पिटल समोर तरी नको कारण येथे येणारी प्रत्येक व्यक्ती हॉस्पिटलच्या बिलाने हैराण झालेली असते. पेशंटच्या सुखदाई भविष्यासाठी रात्रंदिवस धडपडत असते कर्ज काढून बील भरत असते. आणि अशा चिंताग्रस्त लोकांना हेच लाचारी आपल्या शब्दांच्या जाळ्यात अडकून भावनाविवश करून लुबाडत असतात हे खूपच लाजिरवाणे आहे.
औषध घेऊन दावाखान्यापाशी पोहोचलो तर तो माणूस तिथंच होता. गाडी लाऊन येईपर्यंत तो आत गेला मामा त्याचा सुगावा घेत मागोमाग गेले पण माझ्याकडे पाहत जाता जाता नकळत तो दिसेनासा झाला त्याच्या या लाचारीची मला अतिशय कीव आली आणि तितकाच रागही आला . आणी एका क्षणासाठी माझं मन लोकसभेच्या रणधुमाळीकडे गेले. आणि मनातल्या मनात म्हणालो " दान देताना सुद्धा त्याचा वापर योग्य त्या कारणासाठी होणार का ? " हा प्रश्न सदैव सतावत राहतोय आणी राहणार . " मग ते दान असो वा मतदान ! "
