STORYMIRROR

उमेश तोडकर

Romance

2  

उमेश तोडकर

Romance

चविष्ट खारट प्रेम

चविष्ट खारट प्रेम

4 mins
14

अगं ये जरा लवकर डबा कर उशीर होतोय कामावर जायला. असं म्हणत हातात टाँवेल घेवून वाँशरूम च्या दिशेने विकी निघाला. आज नेहमीपेक्षा जरा जास्तच वेळ झाला होता. कामावर जायचं म्हणजे वेळेचं बंधन असतं त्या बंधनात राहून दिनचर्या पुर्ण करावयाची असते. त्यामुळे दिवसभर बाहेर रहावं लागणार हे निश्चीत होतं. त्यामुळं थोडं खाऊन डबा बरोबर घेऊन जायंचं या तयारीत तो होता. वाँशरूम मधुन फ्रेश होऊन तो बाहेर आला व बायकोला हाक दीली.

     ‘अशु’ ये अशु झालं का जेवण ?

     “अगं जरा वाढ थोडं खाऊन घेतो.”

असं म्हणत बेडरूम मध्ये तो आवरायला गेला. तेवढ्यात आतुन आवाज आला.

     “आहो, या झालयं”

गडबडीत आवरून विकी किचनमध्ये आला, ताटावर बसला

जेवण छान झालयं हं अशु पण थोडं मीठ कमी पडलयं, थोडं ताटाला लाव. असं म्हणताच अशु म्हणाली ? आहो काय खारट जेवण खाताय की काय ? प्रमाण बरोबर आहे. मी चव बघीतली आहे.

असं ती म्हणताच तो म्हणाला, तु दे ग जरा थोडं कमीच आहे.

अशुने ताटाला मीठ लावलं व डबा भरू लागली तेवढ्यात विकी हसत म्हणाला

आपलं आयुष्य अगदी मीठासारखं आहे ना, जिवनाच्या मेजवाणीत चविला पुर्णत्व देणारं अगदी बरोबर तंतोतंतं. कमीही पडून चालत नाही आणी जास्त ही होऊन चालत नाही. एकदम परफेक्ट. तु तर माझ्या आयुष्यातील मीठासारखीच आहेस. जिवनाची चव वाढवणारी, जिवनाला स्वादीष्ट बनवणारी सखी, प्राणप्रिया.

     “पुरे आता महाराज कौतुक खुप झालं अशु म्हणाली”

आपल्या बायकोच्या स्तुतीमध्ये इतकं जास्त गुंग झालाय. 

काय विषेश सेवा करायची आहे का आपली.

     ‘नाही गं’

मिठावरून सहजच विषय निघाला म्हणुन

अगं जेवणात मिठाला कीती महत्व असतं बघ ना, जेवणाची चव त्याच्यावरचं अवलंबुन असते. आपल्या उत्तम आरोग्यासाठी, जेवणात स्वाद येण्यासाठी, मीठ खुप महत्वाची भुमीका बजावतं ना ? अगदी तशीच भुमीका तु माझ्या आयुष्यात निभावतेस त्यामुळे माझं आयुष्य एकदम स्वादीष्ट झालयं. याचं कारण तु आहेस.


     विकी साहेब खुप झालं बायकोचं कौतुक, आता उशिर होतोय ऑफिस ला जायला, निघा आता. डबा देत अशु म्हणाली.

विकी निघुन गेला तशी अशु विचार करू लागली. माणसानं आयुष्य जगताना मिठासारखं जगावं महाग नसावं पण महत्वाचं असावं. कारण महत्व मानसाच्या आयुष्यातील त्याची किंमत वाढवते. माणुस त्याच्या वागण्यामुळे त्याची स्वताची स्वतंत्र ईमेज तयार करत असतो. हाच विचार करत ती दिवसभराच्या कामात व्यस्त राहीली. राहून राहून तीला सकाळचं एकच वाक्य पुन्हा पुन्हा आठवू लागलं

     विकी तीला म्हणाला होता

तु माझ्या आयुष्यात मिठासारखी आहेस. जिवणाची चव वाढवणारी, जिवनाला स्वादीष्ट बनवणारी सखी प्राणप्रिया........

हे वाक्य तीला वारंवार आठवत होतं व चेह-यावर स्मीतहास्य उमटत होतं. खरचं आपण नव-याच्या आयुष्यात कीती महत्वाचे आहोत नाही का ? आपलं महत्व आपण आबाधीत राखलं पाहीजे कारण मिठ जसं जेवणाला स्वादीष्ट बणवतं तसचं ते जास्त प्रमाणात झालं तर जेवण खारट बणवतं. व खाण्या अयोग्य बनतं तसचं आपलं आयुष्य आहे. ते जगताना ही मिठासारखचं तंतोतंतं जगायला पाहीजे म्हणजे आयुष्य सुमधुर होईल.

     या विचारातचं सारा दिवस निघुन गेला. घराची बेल वाजली विकी एव्हाना परत आला होता. त्याने येताना अशुसाठी छान मोग-याचा गजरा आनला व गुपचुप बेडरूम मध्ये ठेवला.

फ्रेश होउन सोफ्यावर निवांत टाव्ही पाहत बसला तोच समोरून चहाचा कप आला. कप हातात घेत विकी म्हणाला

“आज स्वारी खुप खुशित दिसतेय ? अगदी गुलाबाच्या पाकळी प्रमाणे खुललीय की”.

“होय, आपल्या स्तुतीसुमनांचा परीनाम आहे हा”

“होय का? चांगलचं मनावर घेतलेलं दिसतयं”

आहो तुम्ही स्तुती करणार मग आम्ही मनावर घेणारचं की. तुमची अर्धांगीनी आहे मी, थोडी खारट असले तरी जिवनात महत्वाची आहे मी. मला तुम्ही ते स्थान दिलयं ना, मग त्याचा आनंद घ्यायला नको का ?

“हो हो आनंद दिसतोय की, चेह-यावर”

“असुदे असाच कायम, तो खुलुन दिसतोय तुझ्या चेह-यावर”

“होय का?”

दिसणारचं , मी आहेच मुळी सुंदर त्यात तुमचं प्रेम मग आनंद दिसणारचं.

बरं मग असं कर तुझ्यासारखचं काहीतरी खारट पण हवहवसं वाटणारं पदार्थ कर खायची ईच्छा झालीय.

“बणवूया की, साहेब, आपका हूकूम सरआंखोपर”

जेवण आटोपुण दोघोही आपल्या आवडत्या बेडवर गेले एकमेकांच्या जवळ बसुन थोड्या गप्पा मारत असतानाचं अचानक विकी ने बेडरूम मध्ये ठेवलेला सरप्राईझ गजरा काढुन तीच्या केसांत माळळा.. आता गज-याचा सुवास सर्व बेडरूमभर दरवळू लागला. त्या सुवासात सर्व रूम सुगंधीत व रोमांचीत झाली. विकीने तीच्या केसात मळलेल्या गज-याचा सुवास घेत तीला अलींगण देलं आणी तीच्याशी बिलगला व म्हणाला?

     “आता तु खुप सुंदर दीसतेस”.

‘अशु म्हणाली, मी सुंदर आहेच पण तु तरी कुठं कमी हॅन्डसम आहेस’. .

आपल्या दोघांची जोडी अगदी परफेक्ट मिठासारखीच आहे. अगदी महत्वाची.

     विकी हसु लागला कारण, हे शब्द पुन्हा फिरून आले होते परत त्याच्याकडेच. सकाळी आपण बायकोची स्तुती केली आता ती माझी करतेय एवढचं

     आहो पण जरी माझं महत्व मिठासारखं महत्वाचं असलं तरी चविनुसार वापर करून घेवू नका म्हणजे झालं.

नाही गं तु माझ्या आयुष्यातील महत्वाचा घटक आहेस. तुझा चवीनुसार उपयोग कसा करेन, तो तर चवीसाठी करणार संसाराला स्वादीष्टपणा येण्यासाठी. तु माझी आहेस, असशील आणि राहशील कायमस्वरूपी.

असं म्हणताच अशु पुन्हा खुलली चाफेकळी सीरखी, अगदी मोहरून आलेल्या झाडासारखी.

     “तेवढ्यात विकी म्हणाला.”

अशु अगं समुद्र जसा अथांग आहे तसं तुझ्यावर माझं प्रेंम आहे. पण समुद्र जसा खारट आहे तसं माझं प्रेम नाही. ते आहे त्याला येवून मिळणा-या नदीसारखं गोड, शितल,मन तृप्त करणारं.

समुद्रासारखं विशाल प्रेम तुझ्यावर करणारा मी प्रेमी, त्याला येवून मिळणा-या असंख्य नद्याच्या पाण्यासारखं प्रेम करतो. ज्या नद्या समुद्राला मिळताना त्याचा खारटपणा आपल्यात सामावून न घेता आपला गोडवा त्याला प्रदान करतात तसचं प्रेम मी तुझ्यावर करतोय. तुझ्या सर्व चांगल्या गुणांना जोडतं.

     ‘‘थँक्यू सो मच नवरोबा, तुमची मनापासुन आभारी आहे’’. तुमची आर्धांगीनी अशु !

असं म्हणतचं आपल्या बाहूपाशात तीनं विकीला ओढलं. विकीने तीच्या केसात माळलेल्या गज-याचा सुगंध घेत तीला घट्ट आलींगण दीलं

आणि दोघेही एकमेकात विलीन झाली. जशी नदी समुद्राला मिळते.

प्रेमाच्या पवित्र बंधनात.............


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance