संघर्षातून वाटचाल
संघर्षातून वाटचाल
प्रत्येकाच्या आयुष्यात “ ती ” चा सहवास कोणत्या ना कोणत्या रूपाने येत असतो. “ ती ” ची रूप अनेक आहेत पण कार्य मात्र एकच आहे. आपल्यांना भरभरून प्रेम देणं मग आपण कीतीही दुःखात असो.
अशीच “ ती ” या पृथ्वीतलावर जन्मली ती तीन बहीणींच्या पाठीवर. मग काय ? आहाकार माजला तीच्या घरात, कारण घरच्यांना हवा होता मुलगा पण झाली “ ती ”. चेह-यावर राग, डोळ्यात पाणी, तोंडात हुंदका देत आईनं आदेश दीला; पुरून टाका तीला; साधं तोंड सुद्धा पहायची ईच्छा नाही तीचं; असे कटू उद्गार तीच्या मुखातुन आले. जन्मताच तीला झिडकारली. साधं बारसं सुद्धा घातलं नाही. मोठ्या बहीणीनं आपल्या पदरात घेतलं आणि जिजाऊ प्रमानं सांभाळ केला. आईची दृष्टी पडलीच नाही. पण आई होऊन बहीणीनं सांभाळ केला. आणि बिन बारशाचं नाव ठेवलं “ सीमा ” जिच्या कतृत्वाला कोणतीच सीमा नाही. जिच्या व्यक्तीमत्वाला कोणतीच मर्यादा नाही. अशिच ती अमर्याद, असीम, कर्तव्यदक्ष मुलगी बगता बगता मोठी झाली. शाळेत जावू लागली. तीनं कधीही पहिला क्रमांक सोडला नाही. सदैव ७५ % च्या वर मार्क मिळवुन पास होऊ लागली. पुरूषी स्वभाव व त्याच पद्धतीचं वागणं हा तीचा स्थायीभाव होता. आईनं नाकारलं पण वडीलांनी स्विकारलं. पोरं मोठी झाली. दिवस भरभर जावू लागले नकोशी वाटणारी सीमा आता सर्वांना हवीहवीशी वाटू लागली. सर्वकाही “मंगल”मय (आई प्रमाणेच) होऊ लागले. सीमा मोठी झाली दहावी प्रथम श्रेणीत पास झाली. बारावी ही प्रथम श्रेणीत पास झाली. व शिक्षकी पेशा स्विकारण्यास सज्ज झाली. डी.एड ला अॅडमीशन मिळालं. गाव तळबीड कराड तालुका; अॅडमीशन अशोकराव माने डी.एड काँलेज अंबप, जिल्हा कोल्हापूर येथे मिळालं. पण म डगमगता तीथ जावून ती राहीली. व शिक्षण पुर्ण केलं. व ते ही प्रथम श्रेणीत. अपल्या वक्तृत्व शैलीतुन व सुंदर सुत्रसंचालक/ निवेदक म्हणुन तीथेही अपली स्वतंत्र छाप तीने निर्माण केली.
पावने सहा फुट उंची, रंग सावळा, ओघवतं वक्तृत्व कौशल्य, सुंदर सुत्रसंचालक/ निवेदक या गुणांमुळे तीने अनेक व्यासपीठं गाजविली. आणि आई वडीलांना समाजात आदराचं स्थान निर्मान करून दिलं. आता ती आईची सर्वात लाडकी लेक झाली होती. आणि मास्तरीन पोरगीचं आता आई सर्व एैकु लागली. तीच्याशिवाय आईचं पान सुद्धा हालेना. असेच दिवस जात होते. वयानुसार मुलीचं लग्न करावं असं आई वडीलांना वाटू लागलं. लग्नाची जुळवाजुळव सुरू झाली. एक दिवस असा उजाडला की आम्ही तीला पहायला गेलो. व साखरपुड्याची तारीख धरूनच आलो. आता ती सीमा मारुती चव्हाण ची सीमा उमेश तोडकर होणार होती. साखरपुड्याची सर्व तयारी झाली. पण तीच्या घरच्यांना इतक्या लांब मुलगी जाणार हे काही केल्या पटेना पदरी मुलगा नाही हाच एक आपला मुलगा म्हातारपणाची काठी असं आई वडीलांना वाटू लागलं. तळबीड, सातारा हुन मिठारवाडी कोल्हापूर १०० कीमी लांब मुलगी द्यायला नकोच या व्दिधा मनस्थितीत त्यांनी लग्न मोडलं. आता आमच्या दोघांच्याही आयुष्याला वेगळी कलाटनी बसली काही दिवसांची पाहीलेली स्वप्ने तुटून गेली. आता मन नव्या स्वप्नांकडे धाव घेवू लागले पण स्वप्ने काही सत्यांत उतरेणात.
तब्बल एक वर्षानंतर तेच स्वप्न सत्यात उतरलं; तो पर्यंत ब-याच घटना घडून गेल्या तीचे वडील त्याना सोडून देवाघरी गेले त्या दुःखातुन सावरतच नव्या आयुष्याची गणीतं मांडत ती पुढ जाऊ लागली. आणि पुन्हा एकदा सीम ही तोडकर व्हायला तयार झाली. तळबीडची कन्या ताराबाई कोल्हापूरची महाराणी ताराबाई झाली. तशीच ही माझ्या आयुष्याची महाराणी झाली. संसार सुखाचा सुरू झाला पण त्यातही संघर्ष सुरूच राहीला. तीला शिक्षकी पेशामध्दे नाकरी करायची हेती व त्यासाठी तीचे प्रयत्न ही सूरूच होते. त्याचबरोबर पुढील शिक्षण सुद्धा सुरू ठेवले. बी.ए केलं एम.ए ला प्रवेश घेतला व नोकरीचा ही शोध चालुच ठेवला. इकडं एकत्र कुटुंबात संसार करताना अनेक समस्या, कामाचा व्याप वाढू लागला. नोकरी, शिक्षण यासाठी वेळ मिळेना त्यामुळं दोघात भांडणं होऊ लागली. एकदा तर ती चक्क म्हणाली काय म्हणुन मी या डोंगरात लग्न करून आले; माझं भवितव्य काही खरं नाही. असं म्हणताचं माझ्या काळजाचा ठोका चुकला. पण यातुनही ती सावरली आता ती प्रेग्नंट राहीली होती २०१२ चा सप्टेंबर महीना उजाडला आम्हाला एक गोंडस मुलगा झाला. पण अवघ्या तेरा दिवसातच तो आम्हाला सोडून गेला. त्याचा तीला इतका मोठा धसका बसला की ती वेड्यासारखी करू लागली. काहीही बडबडू लागली तीला या सदम्यातुन बाहेर काढण्यासाठी तीन महीने गेले त्यानंतर एम.ए ची परीक्षा तीला द्यायला लावली. तीने नकार दिला पण नकार होकारात बदलुन अभ्यासात गुतवत परिक्षा द्यावयास लावली, एम.ए पास झाली. गावात क्लासेस घेवू लागली. व तेथेही तीनं आपलं अधिराज्य गाजवलं. खरच मला तीचं कौतुक वाटतं कारण तीनं जन्मापासुन खुपचं संघर्ष केला आणि माझ्या घरी आल्यानंतरही तो कायम राहीला पण प्रत्येक संघर्षावर मात करत आपल्या कर्तृत्वानं जनमानसात आपली प्रतीमा उंचावण्यात अग्रेसर राहीली. याहूनही जास्त कौतुक वाटतं ते तीच्या मोठ्या बहिणीचं; कीरण तीचं नावच मुळी जिजाबाई आहे. त्यामुळे तीने तीचा सांभाळ शिवबा प्रमानेच केला. तीनं मोठं होवून आईच्या नावाप्रमाने सर्व “मंगलं”मय केलं अशी कतृत्वशालीनी माझ्या आयुष्यात आली खरचं मी भाग्यवान आहे.
