चिंब
चिंब
जुलै महीना चांगलाच रंगात आला होता. सगळीकडे पावसाचे पाणीच पाणी आणी थंड बोचरी हवा वाहत होती. घरातुन बाहेर पडावं आणि काहीतरी कामधंदा करावा अशी इच्छा सुद्धा कुणाची होणार नाही इतकं चिंब वातावरण बाहेर झालं होतं. जीकडं पहावं तीकडं पाणीचं पाणी दीसतं होतं थोडी उसंत घेत घेत पाऊस आपलं काम करत होता. दुपार झाली आणी पावसानं थोडी उसंत घेतली आणी वरूण घराबाहेर पडला. हातात छत्री घेवून तो शेताकडे चालला. पाऊस थांबल्यावर थोडं पीक कसं उगवलं हे पहावं व परत यावं या उद्देशानं तो आता घराबाहेर पडणार तेवढ्यात मागुन हाक आली.
“आहो ऐकलं का?”
“काय ग ? वरूण आत जात म्हणाला”
काही नाही थोडं निवांत जावा लगेच नका निघू आभाळ स्वच्छ होवू दे मग जावा. आंगावर स्वेटर पण घाला
नको जातो असाच छत्री आहे बरोबर, बाहेर वातावरण पण स्वच्छ व्हायला लागलयं .असं म्हणतचं वरून वळला तोच सरीता ने मागून हात ओढला व कचकन वरूणला आपल्या बाहूत ओढलं ... बाहेर बोचणारी थंडी आणी रीमझीम पडणारा पाऊस अंग थंडगार करत असतानाचं धो धो बरसणा-या सरी प्रमाणे सरीता वरूणवर बरसली . तसा वरूण शहारून गेला... अंगावर अचानक काटा उभा राहीला
प्रेमाच्या चिंब सरीत सरीता न्हावून गेली होती तीच्या प्रत्येक स्पर्शातून ते वरूणला जाणवत होतं. तीची नजर वरूणला घायाळ करत होती.... ही अनपेक्षीत प्रेमाची सर इतकी बरसेल याची वरूणराजाला तरी कुठं माहीत होतं. पण वळवाच्या पावसागत ती झरझर बरसत राहीली आणी वरूणाला चिंब चिंब करू लागली ...
दुपारच्या प्रहरी ओल्या चिंब वातावरणाला तप्तता आणण्याचं काम आज सरीता करत होती... बाहेरची सरीता वातावरण ओलं चिंब करत असताना आतील सरीता मात्र वातावरण तप्त करत होती....वरूण बाहेर पडत होता पण त्याला बाहेरच्या वरूण राजानं बाहेर पडायची मुभा दीली होती पण आतली सरीता त्या क्षणी प्रेमसरीनं ओथंबली होती त्यामुळं अशा द्विधा मनस्थितीतुन आतील वरूण जात होता.... काही क्षणात पाऊस थांबला बाहेर आकाश शुभ्र झालं व आतील प्रेमसरी ही वर्षावातुन तृप्त झाल्या.... त्या तृप्ततेचा आनंद घेत वरूण काही क्षणात बाहेर पडला.... हातात काठी छत्री खंद्यावर टाँवेल घेत पायवाटेने तो शेताच्या दीशेने वाटचाल करू लागला . आता बरीच लोकं शेताकडे पीकाची पाहणी करण्यासाठी शेतात जाता येता दीसत होती.... वरूण पुढं जात होता तेवढ्याच मागुन हाक आली.
“लवकर....”
“जावूया की शेतात चक्कर मारायला वरूण म्हणाला”
“नविन काय मग ? काही नाही मी पण त्यासाठीचं चाललोय नविन म्हणाला”
दोघेही बोलत बोलत पुढं जात होती पावसाच्या पाण्यातुन वाट काढत काढत पुढ जात होती. आता पाऊस थांबला होता आजुबाजुची पीकं जमीनीतुन डोकं वर काढतं सुर्याच्या दर्शनासाठी व्याकुळ झाली होती .... जमीनीवर पाणी वाहत होतं शेतातुन नाल्यातुन पाणी ओढ्याला मिळतं होतं व ओढे आवाज करत करत वाहत होते.... शेतात आता पीकं डोलताना पाहून मन मोहरून जात होतं .
‘नविन पेरणी पुर्ण झाली का ? वरूण म्हणाला’
झाली की; उगवण पण चांगली झालीय. आता बघू निसर्ग कसा साथ देतोय. बोलता बोलता शेत आलं, शेतात फेर फटका मारला आणी वरूण शेतातल्या घरात बसला. आता वातावरण शांत झालं होतं पीकं छान उगवली होती... पीक अगदी डौलानं डोलत होतं . शेतात फीरून वरूनने कुदळ फावड्याने साचलेलं पाणी काढलं पाण्याला वाट मोकळी केली व साहीत्य घरात ठेवायला घरात जाणार येवढ्यात सरीवर सरी बरसू लागल्या. वरून घरात पोहचणार तेवढ्यात शेजारची वर्षा पळतच घराकडे येवू लागली तेवढ्यात ती अगदी चिंब भिजली.
या या लवकर म्हणत वरूण तीला बोलावणार तेवढ्यात ती झपकन आत आली बाहेर व्हरांड्यात थांबली पण पावसाच्या सरी तीथ पर्यंत येवून तीला भीजवू लागल्या.. एका क्षणात असं वाटलं की त्या सरी फक्त तीच्यावर बरसण्यासाठीच की काय आल्या होत्या. तीचं सारं शरीर चिंब चिंब झालं होतं. पाय चिखलानं माकले होते...
“आत या की, वरूण म्हणाला”
‘तेवढ्यात तिने चिखलांनी माकलेले पाय वर करून दाखवले’
हे वरूणच्या लक्षात आले, त्याने बादली भरून पाणी दीले व पाय धुवायला सांगीतले
वर्षाने बादली हातात घेतली साडी कंबरेत खेचली आणी पायावर पाणी ओतुन घेतले ...
तेवढ्यात वरूणची नजर तीच्या पायाकडे गेली तीच्
या सुदर गोऱ्या पायावरून माती जसजशी दूर होत होती तश तीचं सौंदर्य त्याच्या डोळ्यात भरत होतं टाचेपासुन मांड्यापर्यंत दीसणारा तीच्या सुदरतेचा नजारा क्षणात मघाशी प्रेमसरीत भिजलेल्या क्षणांची आठवण करून गेला
वर्षा जरी शेजारीण असली तरी तीची आणी सरीताची मैत्री आगाध होती. त्यामुळे ती अगदी बिंधास्त वरूणसमोर वावरत होती.
वर्षाने घरात प्रवेश केला तशी ती त्याच्या अगदी जवळ आली त्या क्षणी तीची भिजलेली कामनीय शरीरयष्ठी त्याला सुन्न करून गेली .. वर्षा अगदी बाहेर पडणा-या वर्षे प्रमाणे बेधुंद होती तीच्या शरीराला घट्ट चिकटलेली साडी, तीच्या केसातुन वाहणा-या पाण्याच्या धारा तीच्या ओल्याचिंब ब्लाऊजला आणखी भिजवत होत्या. केसापासुन नखापर्यंत वर्षासरीने न्हावून निघालेली वर्षा अगदीच कामनीय दीसत होती शरीराचं एक अनं एक अंग अशा पद्धतीने डोळ्याना सुखावत होतं की त्या क्षणाला ते स्पशृन जावं असचं मनाला वाटतं होतं.
या वर्षा सरीतेत आज वरूण अगदी बेधुंद होवून गेला होता... वर्षाच्या आगमनाने धरणी जशी डोलू लागते तसचं अगदी तसचं या बाहेरील वर्षाच्या व घरातील वर्षाच्या आगमनाने वरूणचे मन तृप्त होत होते..
“वर्षा वरूणला म्हणाली भावूजी मला जरा केस पुसायला टाँवेल मीळेल का?”
‘हो देतो की’, म्हणत वरूण ने आपल्या खांद्यावरील टाँवेल तीच्या हातात दीला . तीने तो घेतला व आपल्या केसांचा आंबाडा सोडत एका कोप-यात जात ताने केस पुसायला सुरवात केली तीचे ते पाठीवरून फीरणारे केस, खांद्यावरून सुटलेला पदर , .......आणी समोरून दीसणारं अफलातुन सौंदर्य मनाला अगदी कीर्र करून गेलं .....एका क्षणात सकाळची सरीता आठवली .....सरीता काय अनं वर्षा काय समानआर्थी एकच. क्षणात वरूण प्रेमरसात न्हावून गेला एक क्षण अनं क्षण तीला न्याहळत पावसाच्या सरींचे आभार मानु लागला .. हा क्षण अलगद टीपत टीपत भानावर आला, तेवढ्यात वर्षाने त्याच्या हातात टाँवेल ठेवला.
“थॅक्स भाऊजी आता थोडं रीलॅक्स वाटलं. वर्षा म्हणाली”
‘चेहऱ्यावर परमोच्च आनंदाचा क्षण घेवून वरूण म्हणाला, असुदे’
तीचं ते कामनीय हास्य मनाला भुलवुन गेलं पण मनावर नियंत्रण ठेवण्यापलीकडं पर्याय नव्हता........
बाहेरच्या वर्षासरी जशा थांबल्या तशी आतील वर्षा स्मित हास्य देत निघुन गेली...
वरूण मात्र अजुनही तिथेच होता ...सरीतेतुन वर्षात प्रवेश करीत व वर्षातुन सरीतेत प्रवेश करीत... प्रत्येक क्षण अनं क्षण दोघींत रमला होता.. त्यांना एकत्र करत होता....
तेवढ्या बाहेरून हाक आली. काय करताय ?
बाहेर पाहतोय तर काय ‘रूपा’ हाक मारत पुढ निघुन गेली...तीच्या मागोमाग ‘गीता’ ही गेली...
तसा वरूण भानावर आला वर्षाच्या सौंदर्यातुन बाहेर पडत तो शेतातील घरातुन बाहेर पडला व घरी जायला निघाला. बाहेरील बोचरी थंडी आला त्याला बोचत नव्हती. तो अजुनही त्या मोहनीय क्षणातुन बाहेर पडला नव्हता त्याला अजुनही तीच वर्षा दीसत होती अगदी मदमस्त.. क्षणात मनात विचार आला इतकं विलोभनिय सोंदर्य देवानं निर्माण केलं की, ते पाहताना मोहं आवरत नाही. त्याची ही जिवंत मुर्तिमंत कला म्हणजे पृथ्वीतलावरचं आश्चर्यच म्हणावं लागेल ते सौंदर्य आज मी याची देही याची डोळा पाहीले. पण त्यातुन मला बाहेर पडता येईना... ईतकं आगाध सोंदर्य होतं ते .... आज दोन दोन सौंदर्ये याची देही याची डोळा पाहीली त्यातील एक हक्काचं होतं एक परकं होतं .....
या धुंदीतच चालता चालता वाटेत ओढा लागला आणी त्याचा आवाज कानावर जसा आला तसा वरूण जागा झाला.... ओढ्याला आता भरपुर पाणी आलं होतं पाण्यातुन वाट काढत काढत पुढे जायला लागत होतं त्यामुळे जरा रीस्कीच होतं .
वरूणने हातातील काठी टेकीत छत्री मिटवली व पाण्यातुन मार्ग काढत पुढे जावू लागला .. निसर्गाचं सौंदर्य आज काही वेगळंच होतं सगळीकडे पाणीच पाणी हीरवीगार पिके.. अधुन मधुन येणाऱ्या पावसाच्या सरी मनाला मोहीत करत होत्या त्यातच पाहीलेलं वर्षासुख अंगावर काटा मारून गेलं......
घरी पोहचतातं प्रेमसरीतेनं स्वागत केलं आणी गरम गरम चहाचा अस्वाद घेत पुन्हा ...सरीतेतुन वर्षात प्रवेश करीत व वर्षातुन सरीतेत प्रवेश करीत... वरूण दोघींच्या सोबतच्या त्या क्षणांत रमला.........