साथ दे तू मला (भाग 9)
साथ दे तू मला (भाग 9)
आर्या ची सोबत अजून थोडा वेळ मिळणार म्हणून मितेश मनातून खुश झाला होता.आणि निखिल ला ही हेच हवे होते.मितेश च्या आयुष्यात जर प्रेमाचं माणूस येणार असेल तर त्याला आनंदच होणार होता .जुई नंतर मितेश एकटा एकाकी झाला होता.त्याच्या मनाच्या उजाड माळ राना वर प्रेमाचं,मायेचं फुल फुलायला हवे होते.
निखिल चा निरोप घेवून ते दोघे निघाले..
आर्या म्हणाली,मितेश तुला मागे बसायला ऑड नाही ना वाटणार? कारण इथले रस्ते मला माहीत आहेत सो तू मागे बसशील का?
अरे हो चालेल मला,तू चालव गाडी पण ठोकू नको कुठे.मितेश हसत म्हणाला.
अच्छा बघच मग माझी ड्राईविंग आर्या ने गाडी सुरू केली.
मितेश तिच्या मागे बसला.हात कुठे ठेवायचा याचा विचार करत होता, तोच आर्या म्हणाली,माझ्या खांद्यावर हात ठेवून बसू शकतोस.आय डोन्ट माईंड.
ओके म्हणत मितेश ने आपले हात तिच्या खांद्यावर ठेवले.तसे त्याच्या शरीरातून करंट पास झाला.पण ती अनुभूती सुखद होती.तो मस्त बसून राहिला,आर्या गप्पा मारत गाडी व्यवस्थित चालवत होती.तीच लाघवी बोलण,तिचा पुसटसा स्पर्श ,त्याच्या मनात फुलपाखरे उडू लागली होती.हा प्रवास संपूच नये असे त्याला वाटत होते.कधी हॉटेल जवळ ते आले त्याला समजलेच नाही.गाडी वरून उतरून मितेश म्हणाला, " थंकस आर्या,चल एक एक कॉफी घेवू.
नको रे आता,इच्छा पण नाही.पण उद्या घेवू कॉफी चालेल..
ओके .मी मेसेज करेन तुला,भेटू उद्या.
हो बाय गुड नाईट..आर्या निघून गेली.
मितेश रूम मध्ये आला. मेहतांना हवी असलेलया कथे वर विचार करत बसला. पुण्या मध्ये असलेला त्याचा नाव लौकिक,त्याच्या अनोख्या हटके कथा,यामुळेच मेहतांना त्याच्या कडून कादंबरी हवी होती,त्यासाठी त्याला बऱ्या पैकी ते पेड करणार होते.सो तो विचार करू लागला, की कशी हटके कथा लिहिता येईल.पण राहून राहून त्याला रंकाळया वरची रम्य संध्याकाळ आठवत होती. अर्थात आर्या सुद्धा.तीच हसण,बोलण सगळच छान होत.खरच आपण तिच्यात गुंतत चाललो आहोत का? असा प्रश्न त्याला पडला.त्याचा फोन वाजला,त्याने पाहिले व्हॉटसअप वर मेसेज आला होता,आर्या ने त्याचे रंकाळया वरचे फोटो सेंड केले होते.खूप छान आले होते सर्व फोटो.त्याने आर्या ला ,"थंकयू आर्या " असा रिप्लाय दिला.
ती ऑनलाईन होतीच तिने विचारले ," जेवण झाले का?
हो तुझे..? .मितेश.
जस्ट झाले.
उद्या नक्की भेटूया ना आपण?
तसा माझा काही प्लॅन नाही दुसरा काही..मी मेसेज करते तुला.
ओके मी उद्या फ्रीच आहे.
बाय गुड नाईट..आर्या इतकं बोलून ऑफ लाईन गेली.
मितेश ही बेड वर पडला.पण आर्या चा विचार त्याला बैचेन करत राहिला.आता त्याला खात्रीच झाली की तो आर्याला लाईक करू लागला होता.पण आर्या चे काय? जे मितेश च्या मनात आहे,तेच तिच्या ही मनात असेल का? का फक्त आपल्याला तसे वाटते आहे.पण उगाच परत विषाची परीक्षा नको असे त्याला वाटू लागले.बास आता आर्या चा विचार नाही करायचा.असे मनाला सांगत मितेश झोपी गेला.
क्रमशः. #Author.of the year २०२२

