साथ दे तू मला (भाग 10)
साथ दे तू मला (भाग 10)
जे मितेश च्या मनात आहे,तेच तिच्या ही मनात असेल का? का फक्त आपल्याला तसे वाटते आहे.पण उगाच परत विषाची परीक्षा नको असे त्याला वाटू लागले.बास आता आर्या चा विचार नाही करायचा.असे मनाला सांगत मितेश झोपी गेला.
नेहमीच्या वेळेला तो सकाळी उठला.त्याने फोन पहिला, सात वाजले होते.आज आर्या ला भेटायचे की नाही ? हा विचार त्याच्या मनात आला.इतक्यात त्याला आर्या चा "गुड मॉर्निंग " असा मेसेज आला. मग त्याला ही रिप्लाय देणे भाग होते
आर्या -- काय करतो आहेस.?
मितेश -- जस्ट उठलो आहे ..तू?
आर्या --- मी वॉक ला आलेय, म्हंटले तुला विश करावे.
मितेश --- नाइस मॉर्निंग वॉक.
मितेश आज लंच ला येतोस का? आर्या ने विचारले.
मी थोड्या वेळात कळवतो तुला.मितेश म्हणाला.
ओके बाय आर्या ने मेसेज केला.
आर्या ला मितेश आवडला होता.त्याची पर्सनालिटी सुपर्ब होती.कोणी ही त्याच्या प्रेमात पडेल असाच होता तो .त्यात तो एक फेमस बेस्ट सेलर रायटर होता..इतकी जबरदस्त पर्सनालिटी असून ही चेहऱ्यावर एक शांत भाव,खोल डोळ्या मध्ये काही लपलेले गूढ, असा काहीसा.तेच त्याच्या लुक ला एकदम स्मार्ट बनवत होते.तिला ही समजत नव्हते की ती का मितेश मध्ये गुंतत चालली आहे? तिला पुन्हा कशात अडकायचे नव्हते कोणत्या नात्यात ना बंधनात!
तिला आयुष्य स्वतः च्या टर्म्स आणि कंडीशन वर जगायचे होते.म्हणून तर ती समीर ला सोडून आली होती .तिच्या लग्नाला वर्ष झाले होते .खर तर तिला लग्न ही कन्सेप्ट आवडतच नव्हती.त्या पेक्षा मस्त "लिव्ह इन "मध्ये रहा,नो जबाबदारी,नो टेन्शन.पण आई वडिलांनी दबाव आणला म्हणून तिने लग्न केले. समीर ला ती लग्ना आधी बोलली होती की तिला लग्न नाही आवडत त्या पेक्षा लिव्ह इन बेस्ट .तेव्हा समीर म्हणाला होता,तू एकदा का माझी झालीस की बघ माझ्या प्रेमा पुढे तुझे हे लिव्ह इन चे भूत कुठल्या कुठे पळून जाईल.
पण तसे काही झाले नाही.रोजचे तेच तेच रूटीन आयुष्य,समीर त्याच्या बिझनेस मध्ये बिझी आणि घरात आर्या एकटी.समीर तिला म्हणाला होता की काही जॉब वैगेरे कर किंवा त्याच्या बिझनेस मध्ये लक्ष घाल.पण आर्या ला हे दोन्ही आवडत नव्हते.हे टिपिकल काम तिला फार बोरिंग वाटत असे .तिला खूप भटकायचे होते. बांधलेले आयुष्य नको होते तिला स्वच्छदी मुक्त जगायचे होते.म्हणूनच ती समीर मध्ये कधी गुंतलीच नाही.लग्न ही फक्त एक फॉर्मलिटी झाली होती तिच्या साठी.म्हणूनच ती समीर ला सोडून आई वडिला कडे परत आली होती.परत तिला कोणा मध्ये गुंतायचे नव्हते. पण, मितेश याला अपवाद होता.नाही म्हंटले तरी मन पुन्हा पुन्हा मितेश चा विचार करत होते.त्याचा गंभीर भारदस्त आवाज पुन्हा पुन्हा ऐकावा असा होता.आज मितेश भेटला तर ठीक नाहीतर तो त्याच्या मार्गा ने आणि मी माझ्या असा विचार तिने केला.
क्रमशः #Author of the year २०२२

