Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Shobha Wagle

Inspirational


4  

Shobha Wagle

Inspirational


सासू झाली आई

सासू झाली आई

1 min 389 1 min 389

माझं लग्न होऊन चार वर्षे झालेली. नातवंड नाही म्हणून सासूबाई पावलो पावली अपमान करून दुखवायच्या. लोक काय काय बोलतात,

*आजीबाई* नाही झालात अजून म्हणून त्यांना चिडवतात म्हणे. माझं आणि रमेशच अगोदरच ठरलं होतं. सगळं ठीक झाल्यावरच मुलाचा विचार करू. त्या चार वर्षात सासूबाईंनी एवढा सासूरवास केला की आता आठवलं तरी घाबरायला होते. सारखे त्या मला टोमणे मारत होत्या. कधीकधी मलाही खूप राग यायचा. पण रमेश मला समजवत होता. त्यामुळे मी मूग गिळून सगळे सहन करत होते. सासूरवासाचा छळ माझा शेजारीपाजारी लोकांनाही कळत होता. व त्याचे दीनवाणे चेहरे मला अजून घायाळ करत होते.


शेवटी आम्ही आमचं सगळं ठीक झाल्यावरच आता मुलाची जबाबदारी घ्यायला हरकत नाही, असे वाटल्यावरच त्याचा विचार केला आणि काही दिवसांनी त्या गोड बातमीची आम्हाला चाहूल लागली. नंतर एका शुभमुहूर्तावर आम्ही डॉक्टरकडे जाऊन आलो आणि आता नातवंडं येणार हे कळताच माझ्या सासूबाईचा आनंद गगनात मावेना असा झाला. त्यांच्यात एवढा बदल झाला की त्या माझ्या आईच झाल्या. माझं कोडकौतुक एवढं करायच्या माझ्या आईनेसुद्धा केलं नसतं. मला शंकाच यायची ह्याच का मला तुसडेपणाने वागवणाऱ्या आणि आता मला एवढा आराम द्यायच्या. खूप जपणूक करायच्या हे सगळं नातवंडाचा पायगुण असावा म्हणून मी सगळे लाड पुरवून घेतले. माझ्या सासूबाईसारख्या प्रेमळ सासू जगात कोणी असेल का अशी मला शंका येऊ लागली एवढ्या त्या माझ्याशी चांगल्या वागू लागल्या.


त्यांच्यातलं परिवर्तन हे नंतर तसेच कायम राहिले ही दुनियेतली अजबच गोष्ट म्हणावी वाटते.


Rate this content
Log in

More marathi story from Shobha Wagle

Similar marathi story from Inspirational