सांग कधी कळणार तुला - भाग दोन
सांग कधी कळणार तुला - भाग दोन
अंजली आज वेगळ्याच मुड मध्ये होती. आजी- आजोबांनी एक गुड न्युज दिली की तुला बघायला आजोबांच्या मित्राच्या ओळखीतला मुलगायेणार आहे, तू उद्या घरी रहा अंजू. आजी म्हणाली. अग पण तु त्याच्याविषयी मला काहीच सांगितल नाही, तेवढ्यात बाबा म्हणाले ,सांगतो अंजू आम्हांला कालच समजल. मुलगा चांगला शिकलेला , मोठ्या कंपनीत जाॅबला आहे,दिसायला हँडसम आहे,घरदार चांगल आहे.तुला अगदी सुखात ठेवेल हो... ओके बाबा. तुम्हाला वाटतंय ना ते स्थळ माझ्यासाठी चांगल आहे. तर ठीक आहे. आम्ही दोघे तरी कधीपर्यंत तुझ्यासोबत राहू. गप्प ग आजी... अस नको बोलूस म्हणून तिने आजीला मिठी मारली.गप्पांत खूप वेळ गेला. ते दोघे खूप खुश होते.अंजलीला त्यांच मन दुखवायच नव्हत, मग कससांगू यांना प्रविण विषयी. ते ऐकतील का माझं? आईबाबा गेल्यावर त्यांनीच आपल्यासाठी सगळ केल तेच आपल सर्वस्व आहे. त्यांच खर आहे. खरंतर तिची द्विधा मनस्थिती झाली. आपण नकळत प्रविणच्या प्रेमात पडलो. खरंच मी त्याला सांगायला पाहीजे होत. आता कसं विचारू त्याला ? काय करू काही समजत नव्हत. जाऊ दे आजी- आजोबांचे खूप उपकार आहेत. असं म्हणून ती स्वतःची समजूत काढत होती.तिच मन कशात लागत नव्हत.
तिचे ऑफिसला जाणे चालू होते. पण बाहेर फिरायला जाण बंद केलं, कारण तिकडे गेल्यावर प्रविण दिसणार.परत त्रास होणार, त्यापेक्षा नकोच. जेवढ तिकडेजायच टाळता येईल तेवढ अंजली टाळत होती.चार पाच दिवस अंजली कामावरून फिरायला न जाता घरी जात असे. ती प्रविणच्या स्टाॅलकडे गेलीच नाही. प्रविणला मॅडमची येण्याची वेळ पाठ झाली होती. तो कामात बिझी असला तरी त्या मॅडमची एक झलक पाहण्यासाठी आतुर असे.तो पण नकळत अंजलीच्या प्रेमात पडला होता. ती त्याला आवडू लागली होती.पण मनातच ठेवल होत. काहीही केल तरी त्या किती श्रीमंत अन् मी कुठे हाच विचार करून तो गप्प बसत असे. जाऊ दे. बिचार्या मॅडम कुठेहीअसो सुखात राहू दे, हीच देवाला प्रार्थना. असेच चार- पाच दिवस होऊन गेले पण मॅडम आल्या नाहीत म्हणून प्रविण खूप अस्वस्थ होतो. ठीक असतील ना , काही झाल तर नसेल ना ? नाही मी जरा काळजीपोटी जरा जास्तच विचार करतो.त्याच कामात मन लागत नव्हत. आज रात्री प्रविणनेलवकर स्टाॅल बंद केला आणि तो घरी आला. त्याच्या चेहर्यावर कसल तरी टेन्शन बघून आईनेत्याला काय झाल म्हणून विचारल ? काय रे प्रविण,कसली एवढी चिंता करतोस? काही नाही ग आई.अस म्हणून त्याने विषय बदलला. काही केल्या त्याला आज झोप येईना. तो त्या मॅडमचाच विचार करत होता...
आज रविवार सुट्टी असल्याने पाहुणे येणार म्हणून नोकर मंडळी व आजी - आजोबा सगळी तयारी करत होते. देव अंजलीला बघायला येणारा मुलगा. त्याला तिच्याबद्यल माहीती होती आणि त्याला ति आवडत होती. तो आणि त्याचे आई - वडील आले. त्यांच छान स्वागत केल... अंजलीचे आजी बाबा आणि देवचे आई वडील चर्चा करू लागले.अंजली वरती तयारी करून बसली होती. ती सगळ विसरून यासाठी मनापासुन तयारी करुन बसलेली..तिला आजी बाबांना दुखवायच नव्हत. अंजलीचेआजी बाबा आणि प्रवीणचे आई बाबा बोलत होते.प्रविणही अंजलीला पाहण्यासाठी आतुर झालाहोता. तो ही ति कधी खाली येईल याची वाट बघतहोता. तेवढ्यात तिचे बाबांनी आजीला तिलाबोलवायला सांगितल.अंजलीला खाली बोलवण्यात आल. अंजली दिसायला तर छान होती पण साडीमध्ये तर आणखी सुंदर दिसत होती.देव तिच्याकडे बघतच होता.अंजलीला सगळी माहीती होती आणि शिवाय देवबद्दल सगळी माहीती आजी-बाबाने दिली होती म्हणून तिने होकार दिला.देव तर जाम खुश झाला.आज साडीच्या लुकमध्ये अंजली खुप सुंदर दिसतहोती. त्याला ती खुप आवडली. तस त्याने तिलापाहील होत.त्याच्या आईबाबांनाही ती आवडली.आजी आजोबांच्या चेहर्यावरचा आनंद तिच्यासाठीखुप महत्वाचा. त्यांनी होकार देताच त्यांना खूपआनंद झाला... तिलाही काही हरकत नव्हती.सगळ्यांना खूप आनंद झाला.लवकर लवकर अँगेजमेंट करून पुढची बोलणी करू असे देवचे घरचे म्हणाले.अंजलीला आणि घरच्यांना काही हरकत नव्हती. तशी दोन्ही कुटुंबे अगोदरच परिचयाची होती.पाहुणे गेले, अंजलीला थोड बर वाटल. आजी- आजोबांची तर तयारी कशी करायची याची चर्चा सुरू झाली. आज तिला पुन्हा प्रविणची आठवण आली. पण ती त्याला विसरायच ठरवते आणि एकदात्याला भेटायच ठरवते आणि तेही शेवटच...
ती प्रविणच्या स्टाॅलकडे गेली, प्रविणला तिलायेताना पाहुन खूप आनंद झाला, अंजली येताच त्याने विचारल , काय मॅडम कशा आहात ? कुठे गेला होता आला नाही इकडे म्हणून विचारल.अंजली खोट हसु चेहर्यावर आणत काम होतबिझी होते अस सांगते. प्रविणच या उत्तराने समाधान झाल नाही पण तो काय बोलणार. तिने आईसक्रीम घेतल अन् तिथेच खात बसली.खूप वेळ झाला तरी विचार करत ती तिथेच बसली.तिला वाटत होते आपल लग्न ठरलेय हे सांगू का नको. नको याच्या चेहर्यावरची स्माईल हरवू द्यायची नाही. तिने हसत प्रविणचा निरोप घेतला.प्रविणचा आनंद गगनात मावत नव्हता, अंजलीला पाहून. लग्न ठरलेय याचा आनंद म्हणावा तेवढा झाला नव्हता. पण आपण इथून पुढे प्रविणकडे कधीच जायच नाही,आजपासून तिने त्यालाविसरायच ठरवल तसेपण त्याने कुठे प्रेम आहे अस म्हटलय. फक्त माझच प्रेम होत जे मि व्यक्तकरू शकले नाही. तेच बर झाल नाहीतर आजकाय झाल असत आणि आता तर मी लग्नालादेवने हो म्हटलय तर त्याचाच विचार करेन. त्याच्याशी नविन नात जोडायच... तर ते नात मनापासुन तिने स्वीकारायच ठरवल होत...आता आपण फक्त नि फक्त देवचा विचार करायचा. ती दुसर्या दिवशी ऑफिस सुटल्यावर देवला भेटायला जात असे.
आज ती ऑफिसमधून लवकर येऊन देवला भेटायला जायच म्हणून छान तयारी करून ती कॉफीशाॅप मध्ये गेली.देव तिच्याआधी येऊन बसला होता. अंजली साॅरी म्हणाली. देव, इट्स ओके अंजली. त्यांनी एकमेकांसोबत कॉफी घेत गप्पा मारल्या.सगळ एकमेकांबद्दल जाणून घेत होते.गप्पामध्ये खूप वेळ झाला by म्हणून अंजली जायला निघते. देव पण तिथून निघतो. देव आणि अंजली भेट होत होती. अंजलीही त्याला वेळ देऊन त्याच्याबद्यल जाणून घेत होती.पण एकच गोष्ट अंजलीला खटकत होती, देवचे जे मित्र होते ते काही बरे वाटत नव्हते. पैसेवाले मुले ती वाटेल तस वागत.देव अशा मुलांच्या ग्रुपमध्ये राहत असे.अंजली दुर्लक्ष करत असे. ती खूप आनंदात आपल्या भावी आयुष्याच स्वप्न पाहत होती.देव पण चांगला आहे आपल्याला समजून घेतो. अंजली देवला फोनवरवेळ भेटला की बोलत असे. त्यांचा साखरपुडा पण लवकरच होणार होता. त्याच आनंदात होती.अंजलीला देवने एका ठिकाणी भेटायला बोलवल.ती वेळेच्या एक तास अगोदर जाऊन त्याला सरप्राइज द्याव म्हणून लवकर निघाली....
समोर बघते तर काय देव अघोदरच आपल्या मित्रांसोबत एका बेंचवर बसून बोलत होता. ती पाठीमागून जाऊ लागली.पण जवळ गेली तेव्हा देव त्याच्या मित्रांना जे काही सांगत होता, ते एकल्यावर पावले तिथेच स्थिरावली.त्यांच लक्ष पुढे होत. तो म्हणत होता, मला अंजलीशीलग्न करायच नव्हत पण आई बाबा आहेत नात्यांना ती खूप आवडली. अरे पण तु कसा तयारझाला ? काव्याच काय ? पण तु अंजलीला काव्याबद्यल सांगितल नाही का? नाही रे सांगितल.मी तिलाही आणि आई वडीलांनाही नाही सांगितल." अरे वेड्यांनो , अंजली वेल एज्युकेटेड आहे,जाॅब करते, शिवाय तिच्या आजी बाबांनंतर सगळी प्राॅपर्टी तिचीच ना. म्हणून मी होकार दिलाय. तिला काही यातल कळणार नाही. ओके. त्या काव्याच बघू नंतर काय ते.अस देवच बोलण ऐकून अंजलीची पायाखालची जमीन सरकली. ती तिथून पाठीमागे आली. ती बाहेर येऊन खूप रडू लागली.आपण कोणाच वाईट केल ? आपण आता ज्या देवशी नवीन नात जोडायला चाललोय तो असा बोलेल, असा असेल हे तिला माहितही नव्हत. तरी तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. देव करो नि हे सगळ खोट ठरो. आजी बाबांना लग्न नाही झाल तर वाईट वाटेलआधीच ते माझी खुप काळजी करतात म्हणुनती गप्प राहायच ठरवते. पण जे मी देवच्या डातुन ऐकलय त्याच्याकडे दुर्लक्ष तरी कस करू ?का अस माझ्याबाबतीत झाल. कसा आहे ना देव.
मला नावापुरतं लग्न करून, याला फक्त प्राॅपर्टी हवी आहे. किती लालची माणस असतात ना.अंजलीने स्वतःला सावरल. विचार केलाबर झाल, लवकर समजल. नाहीतर काय झाल असत. ती घरी येऊन आजी - बाबांना सगळ सांगणार होती. तिला त्याच्या बोलण्यामुळे धक्काच बसला होता. तिने त्याची माहीती आणि चौकशीकरायची ठरवली होती पण अश्या माणसासोबतआयुष्य कस सूरू करू ? एक मन असही म्हणत होत... कुणाला सांगु ? नि काय करू ? अशी तिच्या मनाची अवस्था झाली होती.आपण नवीन नात जोडायच म्हणूनज्याच्यावर विश्वास ठेवला... कुठेतरी ज्याच्यासोबतआयुष्याची स्वप्ने रंगवायला रेखाटु लागले पण त्या देवला तर फक्त माझा पैसा आणि प्राॅपर्टी हवी आहे. बर झाल माझ नशीब लवकर काय तेसमजल.... ती त्याला न भेटताच तिथुन निघालीदूर येऊन रडत बसली होती... खूप वाईट वाटतहोत मनाला... देव मात्र तिची वाट बघत होता.चिडला होता, रागावला होता फोन करून त्रासलाहोता... पण तिने मात्र फोन बंदच करून टाकला." तिने भावी आयुष्याच देवसोबत सुंदर चित्र रेखाटल होत पण कुणीतरी याव नि ते चित्रावरपाणी सांडाव आणि ते चित्र खराब व्हाव !!तसच झाल होत तिच... अंजली देवने तिच्याविषयी असं बोलल्यामुळे ती दुखावली तर गेली होती पण तिला धक्का बसला होता. हा देव असा असेल अशी कल्पनाही तिने केली नव्हती...
(क्रमशः)

