सांग कधी कळणार तुला - भाग 1
सांग कधी कळणार तुला - भाग 1
अंजली मुंबईत राहणारी स्मार्ट आणि हुशार मुलगी होती. दिसायला तर अगदी नक्षत्रासारखी. कोणीही बघताक्षणी तिच्या प्रेमात पडाव इतकी सुंदर होती. ती एका आयटी कंपनीत जाॅबला होती. ती आजी - आजोबांसोबत एका बंगल्यात राहत होती. घरी नोकर माणस कामाला होती. एवढी श्रीमंत असून तिला ego नव्हताच. अगदी रस्त्यावर कुणाला काही झाल तर धावत जायची, मदत करणे तिला आवडायचे. दिवसभर ती ऑफीसला जायची अन् वेळ भेटला की ती कधी बिचवर तर कधी समुद्रकिनारी. तिला फिरणे आणि निरनिरळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायची खूप आवडे. तिच्या आजी- बाबांसाठी ती जीव की प्राण होती. तेच तिची काळजी घ्यायचे.ती एकुलती एक होती. आजी - बाबा थकले होते. एवढी सगळी प्राॅपर्टीत्यांच्या नावावर होती ती सगळी अंजलीलीच मिळणार होती. घरी काम करणारे नोकर असल्यामुळे अंजली निर्धास्त होती.
एके दिवशी ऑफीस सुटल्यावर अंजली बीच कडे जाणार्या रस्त्यावर असणार्या स्टाॅलवर गेली. तिथे विचारल काय पाहीजे, तिने पावभाजीची ऑर्डर दिली. तिच लक्ष त्या स्टाॅलमध्ये काम करणार्या मुलाकडे गेल... तो कामात खूप व्यस्त होता. त्याच्यासोबत कामासाठी दोन माणसे होती. खूप गर्दी होती.त्याला कुणाकडे बघायला वेळच नव्हता.अंजली पावभाजी खाते. बापरे ! आजची पावभाजीची चव कमाल आहे. तीला सगळीकडच्या पेक्षा ही पावभाजी खूप टेस्टी लागली होती. शेवटी अंजली बिल देण्यासाठी पुढे गेली वम्हाणाली खूप छान टेस्ट होती पावभाजी,तो मुलगा थँक्यु मॅडम म्हटला, अन् त्याने तिच्याकडे बघून स्माईल दिली. तिला खूप बर वाटल.अंजली तिथून निघाली. आपल्या गाडीत बसताना तिने परत त्याच्याकडे बघितले त्याच मात्र लक्षच नव्हत. खरच अंजली घरी आली पण तिच लक्षच नव्हत. तिला तो खूप आवडला होता..खुप मेहनती वाटतो, त्याच्याकडे बघताक्षणी कळत. काही असो पण दिसायला हँडसम असून एवढ्या मुली येतात पण बघत सुध्दा नाही. पण मी त्याचा एवढा विचार का करते? अरे यार ...त्याच नावाच विचारायच राहून गेल. काय स्माइल आहे त्याची... तेवढ्यात आजी हाक मारते अंजली ध्यानावर येते. रात्री झोपतानाही त्याचा चेहरा समोर दिसत होता... पहिल्यांदा कोणीतरी मनापासून आवडल... तो मुलगा. खूप दमल्यामुळे ती झोपीजाते.
सकाळी बेल वाजली. ती उठली अन् तिने तयारी करून माॅर्निंगवाॅकला गेली. आजची सकाळखूप फ्रेश वाटत होती. ती घरी आल्यानंतर ऑफीसची तयारी केली, नाश्ता केला व आजी- बाबांना byम्हणून ती ऑफीसला गेली. अंजली ऑफीसमध्ये आली. आज तिचा मुड खूप चांगला वाटत होत.चेहर्यावर हसूही होत. कोणीतरी भेटल्याच.दिव्या सगळ बघत होती. काम होती ना म्हणून.अंजली कामात होती पण लक्ष लागत नव्हत...क्या करू यार .... सामने उसका ही चेहरा आता है... तेवढ्यात तिची मैत्रिण दिव्या हळच तिच्यापुढे येऊन म्हणते... क्या मॅम आज तो आप बहुत ही खुश नजर आ रही है... क्या बात है...अंजू.अंजली काही नाही ग म्हणून लाजते. जरूर कुछतो होगा... प्यार किया तो डरना क्या... ये फिल्मीतु समजतेस तस काही नाही. ब्रेक संपला काम पडलीत अन् तुला गाणी सुचताय..., दोघीही काम करू लागल्या.ऑफीस सुटल की अंजली बीचवर फिरायला जात असे. कधी वेळ असला तर मैत्रिंणींसोबत जायची. आज रविवार ..... सुट्टी असल्याने आज जास्त वेळ घालवता येईल म्हणून ती लवकर जायला निघाली.
ती प्रविणच्या स्टॉलकडे गेली. ती थोडा वेळ बसून राहीली आज प्रविणच लक्ष तिच्याकडे गेल. ती खूप छान दिसत होती. स्काय ब्ल्यु कलरचा पंजाबी ड्रेसतिच्यावर उठून दिसत होता. ती बसलेली बघून तो तिच्याजवळ आला नि म्हणाला मॅडम, काही हव आहे का? ती लगेच भानावर येते. ओ सोरी.काही नाही, जरा विचारात होते. तिला आजपहिल्यांदा त्याच नाव प्रविण आहे हे समजल.ती खूप खुश झाली. तिने आईसक्रिम घेतल अन् तिथेच बसली. ती अधून मधून प्रविणकडे बघत होती. तोही बघत होता पण तिने पाहील्यावर तो दुसरीकडे बघत होता.अंजली आता नेहमी तिकडे जात होती. ती स्टाॅलवर नेहमी जात, प्रविणला बघत पण तो मात्र कामातच असायचा.त्याच लक्ष पण जात नव्हत.ती नेहमी जात म्हणून तो तिला मॅडम म्हणायचा. तिच्या दिसण्यावरून त्याला ती श्रीमंत आहे हे समजलहोत. प्रविणला त्या मॅडम आवडू लागल्या पण त्याला पण त्यांना पाहण्याची सवय झालीहोती. पण कस शक्य आहे राव ? त्या कुठ नि मी कुठ ? म्हणून त्याने मनाला समजावल ही चुक नाही करायची. आपण बर नि आपल काम बर. म्हणून तो अंजली नेहमी येतहोती तरी बघत नव्हता. अंजलीला खूप वाईट वाटल. एकतर तिला त्याच्याशी बोलायला वेळ नव्हता. अन् तो मात्र अस वागतो.अंजलीला त्याच्याविषयी काही माहीती नव्हती. जाऊ दे.नंतर बघू. जे काही चाललय ना खूप छान वाटतय मला. तिला सारखे प्रविणचे विचार यायचे.अन् नकळत ती त्याच्या प्रेमात पडली होती फक्त त्याला सांगायचय बाकी होत.
ध्यानी मनी नसताना...
योगाने घडत गेले
हळूहळू माझे मन
तुझ्यात गुंतत गेले
ती मस्त मला वेड लागले प्रेमाचे...हे गाणं गुणगुणत झोपी गेली.

