Ujwala Rahane

Inspirational

3  

Ujwala Rahane

Inspirational

रंगाची महती आईच्या नजरेतून!

रंगाची महती आईच्या नजरेतून!

2 mins
215


   ऐका रंगदेवा तूमची कहाणी!लहाणपणापासून मनावर ठसा उमटून राह्यलेली. आटपाट नगर होतं, तिथे रंग नावाची एक वसाहत होती.सगळे मिळून मिसळून राहत होते. अगदी सुखासमाधाने पण त्यांच्या सुखाला ग्रहण लागले. मग प्रत्येक जण मीच कसा शाहणा हे समजू लागला. प्रत्येकात "मी" चा अहंकार भरला.मग आपले वेगळेपण तो शोधू लागला जा ता, ना, हि, पा, नि, पि. असे सांगणारा सप्तरंगी इंद्रधनुष्य पा, पि. राक्षसाच्या जाळ्यात गुरफटला गेला. अटीतटीचा खेळ सुरू झाला. मग पांढऱ्या रंगाने सुवर्णमध्य साधला. मग सुरू झाली प्रत्येकाची एक वेगळीच कहाणी. आई हि गोष्ट खुप रंगुन सांगायची रंगाच्या रूपात प्रत्येकाच्या स्वभावातील कंगोरे उमटवायची.


   तेव्हा ती आटपाट नगरीची गोष्ट वाटायची, उगाच रंग आपल्याशी संवादीत होत आहेत याचे भास व्हायचे. वय वाढले मग परिस्थिती बदलली आणि अनुभवाची पोतडी भरू लागली. मग कधीकाळी आईने सांगितलेली रंगाची कहाणी ऊमगू लागली. हे रंग माझ्या आईच्या नजरेतले.मला आताशी उमगलेले!. आईच्या नजरेतून सांगितलेले हे रंग सुखी संसाराचे! ती म्हणायची ऐक, सासर किंवा संसार हे सूबक रांगोळी सारखे सजवायचे,ठिपके कितीही असले तरी,सूबकता मात्र असायला हावी, रंग कल्पकतेने भरायचे, रंगसंगतीत सूबकता आणि मनाची समरसता यात असायला हावी. 


   प्रत्येक रंगाची जीवनात ओळख वेगळी, पतीपत्नीच्या नात्यात आंबटगोड चवीबरोबर, गुलाबी रंगाची उधळण. मैत्रीच्या नात्याला सप्तरंगाची किनार. प्रेमाचा रंग थोडा हटके असायला हवा. प्रत्येकाच्या मनाच्या कप्प्यात स्वकल्पनेतून साकारणारा पण पक्का आणि टिकाऊ. हि रंगरंगाची उधळण आगळी वेगळी.रंगाची सुध्दा मनमानी असते बरका! कोणता रंग कोणत्या रंगात मिसळून रंगसंगती साधायची,ह्याची जागरुकता मात्र आपण ठेवायची.


  पहिले प्रत्येक रंगाचा गुण व दोष पक्का मनात जपायचा अगदी या कानाचा त्या कानाला पत्ता नको हं! आता ओळख करून देते रंगाची कायम ध्यानात ठेव. कारण पारदर्शक रंग स्वच्छ मनाचा.ही जान कधीच नाही विसरायची. मग तो बाजूला ठेवायचा वेळेनुसार रंगसंगतीत मिसळायचा. मग संसार हा असाच विविध रंगाने सजवायचा. रंगाची उधळण मात्र सावधगिरीने करायची. प्रेमाच्या रंगाची उधळण केली तर, तो कायम मनात मिसळवून घेईल. ह्रदयात कायम घर करेल. 


  मग मध्ये, मध्ये फसवे रंग म्हणजेच तोंडावर स्तुती यांचा लालिमा नको. कारण फसवे रंग अगदी त्या रासायनिक रंगा सारखेच असतात बघ! आज उधळण केली आणि उद्या धुतले कि उतरणार. ही रंगाची किमया वेगळी जादुई स्वभावदर्शन दर्शवणारी, मनाच्या रंगात हरवून जाणारी. खुप काही शिकवणारी रंग कोणतेही आसो फक्त रंगसंगती सुसह्य होणे महत्वाचे, मग नात्याची आसो वा रांगोळीचे. आता तूच ठरवायचं रंगाचे हे गुपित उलगडायचं कि, आठवणीच्या कप्प्यात जपून ठेवायचं कि, वेळेनुसार उपयोगात आणायचे? 


 आईने सांगितलेली रंगाची ही कहाणी आजूनही स्मरणात आहे. आचरणातही आणते. फक्त आता अनुभवाने गुपिते उलगडते. या अप्रतिम रंगाची कहाणी रंग रंगी सूफळ संपूर्ण!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational