शब्दसखी सुनिता

Romance Inspirational Others

3  

शब्दसखी सुनिता

Romance Inspirational Others

रंग बरसे... रंग माझा वेगळा...

रंग बरसे... रंग माझा वेगळा...

7 mins
273


लग्न ठरवताना...

आपल्या समाजात लग्न ठरवताना बर्‍याच गोष्टी महत्वाच्या मानतात. ते ठीक आहे. पण या समाजात आजही मुलगी शिकलेली, नोकरी करणारी असली, दिसायला पण चांगली दिसते फक्त तिचा रंग सावळा असला तिला नाकरलं जातं. सगळेच असं करतात असं अजिबात म्हणत नाही पण असं चित्र दिसतंय. लग्न ठरवताना फक्त रंगाला महत्व आहे का? हा प्रश्न पडतो.


निशा हुशार, नोकरी करणारी, दिसायला छान होती. लहानपणापासून संस्कारात वाढलेली, स्वभावाने मनमिळावू. रंगाने सावळी होती पण ती छान दिसे. घरी आणि ऑफीसमध्ये सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी. कायम सगळ्यांना मदत करणारी...

कामात ती प्रामाणिक होती. घरी आई- वडील, लहान भाऊ असं चौकोनी कुटुंब. तिचे बाबा आनंदराव हे एक शिक्षक होते. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय कुटुंब.


आज रविवार, निशा उठ गं लवकर तयारी करायची आहे. सात वाजलेत बघ.


थांब गं आई, झोपू दे ना गं, आज सुट्टी आहे...


हो..हो...निशा मला माहीत आहे, रविवार आहे. गं निशा आज पाहुणे येणार आहेत बघायला तुला विसरली की काय?


बरं बरं उठते आई, विसरले होते.  निशा पटकन उठते आणि तयारी करायला जाते. इकडे निशाची आई आशा आणि भाऊ निल, आनंदराव सगळे तयारी करतात. तेवढ्यात आनंदराव पेपर वाचायला घेतात...


हो पेपर काय वाचताय, नंतर वाचा आधी तयारी करा. आता येतील हो पाहुणे... असं म्हणत आई काम करते. अहो, मुलाकडची मंडळी येतील तर घर कस टापटिप असायला नको का?


हो तर, आनंदराव आणि निल तिला हसत बोलतात.


तेवढ्यात आनंदराव म्हणतात, अगं आशा, चहा तर घेऊ दे मला, करतो मी सगळं काही. निलने दाराला तोरण लावलं. घर व्यवस्थित आवरलं, सर्व वस्तू जागच्या जागी ठेवल्या. तेवढ्यात निशा तयारी करून आली. साडीमध्ये तिचा लुक खूलून दिसत होता. सगळे बघत राहीले.


व्वा! निशा छान दिसते, आई म्हणाली. सगळेजण पाहुण्यांची वाट बघत होते. तेवढ्यात घरासमोर पाहुण्यांची गाडी येते, निशाचे आई-बाबा पाहुण्यांचं स्वागत करतात. पाहुणे येतात, बाबा त्यांना बसायला सांगतात. नवरा मुलगा विशाल आणि त्याचे आईबाबा आणि त्याचा भाऊ असे सगळे बसतात. बोलणं सुरू होतं. ओळख करून देतात.


निशाचे बाबा पण कुटुंबाविषयी सांगतात. विशालचे बाबा मुलीला बोलवायला सांगतात. निशाला आई घेऊन येते. विशालच्या आईबाबांना निशा नमस्कार करते व सगळ्यांना चहा देते. ते तिला बसायला सांगतात. विशालचे बाबा त्याच्याविषयी सांगतात. विशाल इंजिनिअर आहे. पुण्यात जाॅब करतो. तो रंगाने गोरा, दिसायला हँडसम होता. निशाही आज खूप छान दिसत होती. विशालने एकदा दोनदा तिच्याकडे बघितलं. त्याच्या आईबाबांनी निशाला नाव, जन्मदिनांक व नाव विचारले. स्वयंपाकाबद्दल आईने विचारलं. तिने स्वयंपाक येतो असं सांगितलं. निशाविषयी सगळं ऐकून विशालच्या आई-बाबांना निशा खूप आवडली. त्यांनी ती नोकरी करते आणि आईलाही मदत करते हे ऐकून तिचं फार कौतुक केलं. निशाचे आईबाबाही भारावून गेले. पण विशाल तेवढा आनंदी दिसत नव्हता.


निशाच्या आईने सगळ्यांना पोहे दिले. विशालचे आईबाबा त्याला निशाविषयी विचारत होते. आवडली का तुला निशा. तो काही बोलला नाही. फक्त म्हणाला, मला एक जरूरी काम आलंय, निरोप फोन करून कळवतो. तेवढ्यात विशालचे बाबा सांगतात की एक विशालचं महत्वाचं काम आहे, आम्ही तुम्हाला कळवतो. फोनवर.


निशाचे आई- बाबा म्हणतात, काही हरकत नाही. इकडे निशाच्या आईबाबांना वाटत होतं, की विशालने होकार दिला तर बरं होईल. निशाचं चांगलं होईल, माणसं चांगली आहेत, फक्त विशाल काही जास्त बोलला नाही. आईला पण हेच वाटत होतं.पण निशाला विशालचा नकार असणार हे त्याचा चेहरा सांगत होता.


विशाल घरी आला व शांत बसला. काय झालं विशाल? आई म्हणाली, तुला मुलगी आवडली नाही का? निशा खरंच छान आहे. नोकरी करते, उत्तम स्वयंपाक करते. सुस्वभावी आणि संस्कारी मुलगी आहे. आम्हाला दोघांना आवडली फक्त तू तुझा निर्णय सांग मी लगेच त्यांना फोन करते.


आई थांब जरा...किती घाई करतेस, विशाल म्हणाला. तो बोलू लागला, निशा हुशार, चांगली मुलगी आहे. स्वभाव पण चांगला आहे पण मला नाही करायचं तिच्याशी लग्न.


आई, का ? काय कमी आहे तिच्यात, सर्वगुणसंपन्न आहे.


हो आहे ना. पण मला निशाशी लग्न नाही करायचं...


आई, का ?


ती सावळी आहे गं?


मग काय झालं?


तसं नाही गं आई, मला माझे friends काय म्हणतील. मला माझ्यासारखीच life partner पाहीजे. मनासारखी.


अरे विशाल पण जरा विचार कर. ती सावळी जरी असली तरी छान दिसते.


पण मला नाही आवडली निशा, माझं हे फायनल मत सांगतो बाकी तू बघ त्यांना काय सांगायचं ते.


विशालचे आई - बाबा त्याच्या निर्णयापुढे काय बोलणार ? विशालच्या आईला विशालचं मत समजलं तिने दुसर्‍या दिवशी निशाच्या आईला फोन केला व सांगितलं की विशालला नोकरी करणारी मुलगी नको आहे. त्याच्या आईला काय बोलावं हे सुचत नव्हतं.


शेवटी निशाच्या आईला त्यांना काय म्हणायचं हे समजलं होतं. तिने हो का बरं म्हणून फोन ठेवला. निशाच्या आईला खूप वाईट वाटलं. या आधीपण केवळ मुलीचा सावळा रंग आहे म्हणून दोन मुलांनी तिला नकार दिला होता. पण शेवटी आईचं काळीज! मुलीचं चांगलं व्हावं हेच स्वप्न प्रत्येक आईचं असतं. निशा आणि बाबा संध्याकाळी घरी आले तर दोघांना आई काहीतरी विचारात आहे असं दिसलं पण तिने मी चहा आणते तुम्हाला असं म्हणून किचनमध्ये गेली. चहा घेत असताना आईने बाबांना सांगितलं की विशालचा नकार आहे, त्यांच्या आईने फोन करून सांगितलं, बाबांना खूप वाईट वाटलं.


निशाने सगळं ऐकलं. तिला समजलं आई - बाबा चिंतेत आहेत नकारामुळे. ती समजदार होती. ती त्यांना हसवण्याचा प्रयत्न करत होती. आई बाबा दोघेही निशाला म्हणाले, बेटा तू टेन्शन नको घेऊ. दुसरा मुलगा बघू.... तू काही कमी नाहीस. अरे, लाखात

एक आहे माझी मुलगी. बाबा निशाचं कौतुक करत होते.


हो आई - बाबा, तुम्हीपण नका घेऊ टेन्शन. माझा रंग सावळा आहे, विशाल सुंदर आणि रंगाने गोरा आहे मग त्याला त्याच्यासारखी मुलगी शोभून दिसेल. असं म्हणत तिने समजून सांगितलं. पण आता या स्थळांच्या प्रकारावरून तिला

मनस्ताप होत होता. पण काय करणार शेवटी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती समाजात असतात. ज्याची त्याची आवड वेगळी असते असं ती मनाची समजूत काढायची.


निशा कामात व्यस्त राहत असे, जेणेकरून या सगळ्याचा त्रास नको म्हणून. असेच दिवस जात होते, बरेच दिवस स्थळांची माहीती नाही निरोप नाही. निशा एका कंपनीत काम करत होती. निलेश एकदा कंपनीत काही कामानिमित्त मुंबईत आला.त्याने निशाला कॅबीनमध्ये पाहील आणि तो पाहतच राहीला.त्याला निशा खूप आवडली होती. निलेशने त्याच ऑफीसमधून निशाविषयी माहिती करून घेतली. त्याचं काम झाल्यावर तो पुण्यात आला पण त्याला निशाचा चेहरा समोर दिसायचा. काम करण्याची पध्दत. खूप दिवस तिचाच विचार करत होता. योगायोगाने निशाच्या बाॅसने निशाला कंपनीच्या कामासाठी पुण्याला पाठविले. निलेश कंपनीत मॅनेजर होता, त्यामुळे त्याच्या सहकार्‍याने सांगितलं की निशा मॅडम आल्यात त्यांना आत पाठवू का?


हो पाठव. निशाला समोर पाहताच निलेशला फार आनंद झाला.


बसा ना प्लीज, म्हणत निशाला बसायला सांगितलं.


त्याने निशाला जी माहिती हवी ती सगळी दिली.


निशाचं काम झालं, ती थँक्यु सर म्हणून ऑफीसच्या बाहेर दिली. आता त्यांची ओळख झाली होती... निलेश आज खूप आनंदात होता. त्याने निशाचा पत्ता ऑफीसमधून मिळवला होता. घरी आल्यावर आपल्या आईवडीलांना त्याने निशाविषयी सांगितलं. तिला पाहील्यापासून ती खूप आवडत असल्याचं सांगितलं. त्यांना ऐकून खूप आनंद झाला. ऑफीसमध्ये मुली काम करत पण कामाशिवाय तो बोलत नसे. निलेशने सांगताच आईवडीलांनी निशाला आपल्या निलेशसाठी तिच्या घरी मुंबईला जायला निघाले.


रविवार असल्यामुळे निशाच्या घरी सगळे होते. तेवढ्यात निशाच्या घरी निलेश आणि आई बाबा पोहोचले. निशाच्या आईबाबांना आश्चर्य वाटलं, अचानक कोणते पाहुणे आले असतील. पण बाबाने निलेशच्या घरच्यांना आत बोलवलं. त्यांना बसण्याची विनंती केली. निलेश पण बसला होता तो निशा दिसते का हे बघत होता. त्याच्या आई वडीलांनी निलेशला निशा आवडते. त्याने तिला ऑफीसमध्ये पाहिल्याचे सांगितले. त्याच्या वडीलांनी निलेशचा परीचय करून दिला. निशाविषयी तिच्या बाबांनी सगळं सांगितलं.


निशाला खाली बोलवलं आईने, तिला येताना पाहून निलेश बघत होता. निशाला आश्चर्य वाटलं, पुण्यात या सरांना पाहिलं होतं मग हे इथे कसे? निलेशच्या आईबाबांना निशाने नमस्कार केला. दोघांना निशा आवडली. त्यांनी निशा आणि निलेशला एकमेकांना बोलण्यासाठी बागेत पाठवलं. दोघेही बागेकडे गेले.


छान फुलझाडे लावलीत, निलेश म्हणाला.


निशाने हो म्हटलं.


तुम्ही बसा ना सर म्हणून खुर्चीवर बसायला सांगितले.


निशा सर नको म्हणू मला. ती हसली.


निशाला तर सगळं स्वप्नच वाटत होतं...काही क्षणांचं.


निलेश म्हणाला, निशा तू मला खूप आवडतेस... मी तुला तुझ्याच ऑफीसमध्ये बघितलं तेव्हाच आवडली होतीस.


निशा म्हणाली, कधी बघितलं.


एक महीना होऊन गेला. परत कामानिमित्त पुण्याला आमच्या कंपनीत आली होतीस हे तर तुला माहीत आहे.


हो पण.... पत्ता कोणी सांगितला.


तो मीच शोधून काढला आणि आईवडीलांना सांगितलं. तू खूप छान आहेस. मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल. तू तुझा निर्णय सांग मला.... मला राग येणार नाही तुझा निर्णय काही असला तरी. निशाला खूप आनंद होतो.


एवढा हँडसम मुलगा, त्यात दोनदा भेट झालेली, तो मॅनेजर होता. तिला खूप आवडला होता. निशा म्हणते, मी दिसायला ही अशी तरीपण तुम्हांला कशी आवडली... म्हणजे मी सावळी आहे... आणि तुम्ही एवढे हँडसम आहात, तुम्हाला कुणीही मुलगी लग्नासाठी हो म्हणेल....


ओ हो निशा.... तू पण ना खरंच! म्हणून तो हसायला लागला. का अशी स्वतःला म्हणत आहेस. तू खुप सुंदर आहेस निशा... नुसतं दिसणं महत्वाचं नाही गं, आणि कुठलाही माणूस परीपूर्ण नसतो. माणूस मनानेही सुंदर पाहिजे... जे मला तुझ्यात दिसलं. लग्न करायचं म्हटलं तर मनही जुळायला हवीत ना... बाह्यसौंदर्य कालांतराने नष्ट होऊ शकते परंतु मनाचं सौंदर्य चिरकालीन टिकणारं असतं. हा आता तू म्हणतेस ना काय बघितलं माझ्यात... मी तुझं सुंदर मन, तुझा सर्वांना समजून घेण्याचा मनमिळावू स्वभाव, तुझं हसणं बघून मी तुझ्या प्रेमात पडलो. काय मग करशील का माझ्याशी लग्न.... ? देशील का मला आयुष्यभरासाठी साथ ? तू विचार करून आणि वेळ घेऊन तुझा निर्णय सांगशील... तुझा नकार जरी असला तरी तुझ्यासारखी एक चांगली मैत्रिण मिळाली याचा मला आनंदच असेल....!


निशाला इतकं सगळं त्याचं बोलण ऐकून भरून आलं... खरंच हा किती वेगळा आहे आणि मनाची कदर करणारा आणि गुणांना महत्व देणारा आहे. निलेशसारखा जोडीदार मला शोधुनही नाही सापडणार... ती त्याच्यातच क्षणभर हरवते.


तो तिला काय झालं विचारतो.


ती भानावर येते. आणि निलेशला सांगते... आता हा मैत्रीचा तुम्ही पुढे केलेला हात असाच आयुष्यभर असेल... निशाने त्याला थोडस लाजतच हो म्हणते.


माणसाने सुंदर मन पण बघितलं पाहिजे. निलेशला खूप आनंद होतो... तिच्या होकाराने त्याच्या चेहर्‍यावर आनंदाचा रंग खुलला...


दोघेही घरच्यांना आपला होकार सांगतात. दोघांच्या घरचेही आनंदाच्या रंगात न्हाऊन जातात. पुढची लग्नाची बोलणी करतात. लग्नाची तयारी सुरू होते. दोघेही खूप आनंदात ते दिवस घालवतात... एकमेकांना भेटतात...त्यांच्यात बोलणं सुरू होतं... असेच आनंदात दिवस जातात...चांगला शुभमुहूर्त बघून दोघांचा विवाह संपन्न होतो.


निशा आणि निलेश आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करून नवीन संसाराला सुरूवात करतात. निशा तर खूप आनंदात होती. तिला मनासारखा जोडीदार मिळाला होता. निशाला तिचं बेरंगी वाटणारं आयुष्य निलेशमुळे रंगीबेरंगी झालं.... निलेशने निशाच्या सावळ्या रंगाचा विचार नाही केला, त्याने तिच्या गुणांचा, स्वभाव, कामात हुशार आहे, हे बघितलं तिच्यात म्हणून

त्यांनी निशाशी लग्न केल. ते दोघेही आपल्या संसारात सुखी जीवन जगत आहेत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance