STORYMIRROR

Pradnya Ghodke

Inspirational

4  

Pradnya Ghodke

Inspirational

रेशीमबंध

रेशीमबंध

4 mins
3

रेशीमबंध..!


             सायली माझी बालमैत्रीण! आता जवळ-जवळ छत्तीस वर्षांनी  म्हणजे तब्बल तीन तपानंतर भेटली. तरीही मला ती पूर्वीसार- खीच लाजाळू, संयमी, शांत वाटली.आम्ही दोघी मनमोकळ्या गप्पा मारता याव्या म्हणून फिरायला बाहेर गेलो तरी ती गप्पच! मी म्हणाले, अगं,एवढ्या वर्षांनी भेटतेस काहीतरी बोल! पण नावाचीच सायली...बोलायला लागली की उपदेश! नाही तर एकदम गप्पच.पण या तीन तपात ती इतकी का बदलली  होती?...

       बोलायला सुरुवात करण्या अगोदरच तिचे डोळे भरुन आले.क्षणातच ती चक्क रडायला लागली.मला काहीच समजेना.कारण तिचा संसार कोणाचीही दृष्ट लागेल असाच चालला आहे. पती मोठ्या हुद्द्यावर सरकारी अधिकारी, दोन गुणी मुले तीही काँन्व्हेंटला शिकलेली. आय.टी. इंजिनिअर झालेली.मोठ्या मुलाचे लग्नही सधन कुटुंबात झाले.ती स्वत:ही नोकरी करतेय.दिसतेय हसरी,चुणचुणीत मग...ही अशी निखळ, निरपेक्ष असणारी एकाकी मला  विचारते, 'रेखा (माझे माहेरचे टोपणनाव) मी खरंच तुला सुखी वाटते का?' जोडीदार योग्य मिळाला की संपलं असं होत नाही.आपण किंवा तो कितीही सुशिक्षित असलो तरीही त्याच्या अपेक्षा,बंधने ही असतातच. कोणीही निरपेक्ष नाही,नसतं.तडजोड, बंधनं,अपेक्षापूर्ती करणं हे फक्त स्त्रीच्याच हातात का? सगळ्यांचं सगळं करताना ती वास्तवात नाही तर काल्पनिक संपत आलेली असते.प्रत्येकाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो त्या क्षणी कुणीही कुणाचं नसतं या वास्तवतेची कल्पनाच जवळच्या  म्हणवणार्‍यालासुध्दा येत नाही. असे क्षण विधाता प्रत्येकाच्या आयुष्यात देतो. अनेक नाती विशेषत: तुझे व माझे मैत्रीचे नाते घट्ट होत असतानाच... तुझ्या लग्नातच माझे रेशीम जाळे तुटले! ते तुझ्या लक्षातही  आले नाही!..

       ती एवढंच बोलली...मात्र मला काय समजायचं ते मी समजले..! तिचं ज्याच्यावर प्रेम होतं तो माझा सहचर झाला होता आणि त्याचे व माझे हे रेशीमबंध तुटू नयेत म्हणून ती इतकी वर्ष मला बोलली नाही. भेटली नाही. इतकी संयमाने,धीराने, हसतमुख राहतेय! मनातलं प्रेम..मनातच ठेवून...! प्रत्येकाला ज्याचं त्याचं स्थान जिथल्या तिथं देत! खरंच तिचं हे प्रेमही निखळच असलं पाहिजे.तसेच तिला सद्यस्थितीत आधार देणाराही रेशीम बंध मजबूतच असला पाहिजे. तरीही सायलीचा वेल कोमेजायला लागलाय याची जाणीव कोणालाही होऊ न देता त्याच भक्कम विश्वासाने...तो रेशीमबंध घट्ट पकडून त्याच्या आधाराने राहणारी सायली पुढचं शिक्षण पूर्ण करून मध्यप्रदेशातल्या कुठल्याशा 'लटेरी' नावाच्या खेड्यात लग्न होऊन गेली.खरच ती श्रेष्ठच..! नाही का...?   

         ती पुढे म्हणाली,'रेखे,मी तुला आत्ता म्हटल्याप्रमाणे निरपेक्ष राहणं, तडजोड करणं, बंधनं पाळणं,अपेक्षापूर्ती करणं हे फक्त माझ्या  एकटीच्या हातात आहे का? अनेक नाती विशेषत: तुझे व माझे मैत्रीचे नाते घट्ट होत गेले.ते काही जात-पात पाहून का? अगं,तुझे आई-बाबा शिक्षक असल्याने तू सर्व जातीच्या लोकात मिसळली आहेस.तुला भेदभाव करता येत नाही. तुझ्याकडूनच मी सर्वधर्म समभावाची शिकवण घेतली पण आता माझा मुलगा साकेत २८ वर्षाचा झाला तरी लग्नाचे नाव घेईना म्हणून मी त्याला विश्वासात घेऊन विचारले तेव्हा त्याने सांगितले की त्याचे एका मुलीवर खूप प्रेम आहे व लग्न करीन तर तिच्याशीच.

पण ती खालच्या जातीची आहे.त्यामुळे आमच्या घरी मी सोडून त्याला कोणीच समजून घेत नाही.मग मी म्हणाले,

''अगं मग चांगलंय की दोघांचे स्वभाव जुळत असतील, ते खूश असतील तर संसारही चांगलाच करतील की!''.

हो गं,तुझं बरोबर आहे मला हे पटतंय पण आमच्या घरी यांना,सासुबाईंना कोण समजवणार? मुलगी खरच गुणी आहे.सालस आहे.मनमिळावुही आहे.

       ती एवढंच बोलली...मात्र मला काय समजायचं ते मी समजले..! 

म्हटले "जरा संयमाने,धीराने,घे.सगळं छान होईल.उद्याच भाऊजींना माझ्याकडे पाठव.मी सांगेन त्यांना. 


         दुसर्‍याच दिवशी तिला सांगितल्याप्रमाणे भाऊजी आले.चहा,नाष्टा झाल्यावर मी त्यांना  म्हटले,हे पहा "प्रत्येकाला जगण्याचा,प्रेम करण्याचा अधिकार आहे.मुल लहान असल्यावर आपण त्याला चांगले संस्कार मिळण्यासाठी शाळेत पाठवतो.ते कशासाठी? सर्वांत मिळून मिसळून वागावे.समानता,सर्वधर्म समभावाची शिकवण मिळावी म्हणूनच ना! ज्याचं त्याचं स्थान ज्याला त्याला द्यावं.आता मुले मोठी झाली की त्यांनाही त्यांचे स्वतंत्र विचार आहेत.तुम्ही केलेल्या चांगल्या संस्काराची शिदोरी आहे.मग आता ते कसे बिघडतील? त्यांचं प्रेमही निखळच असलं पाहिजे.आता त्याचं लग्नाचं वय आहे. त्यांना चांगली समज आहे.करू द्या की त्याला त्याच्या मनासारखं.तुम्ही किती दिवस पुरणार आहात? त्याला आधार देणारीही तशीच आहे ना! आणि हे पहा तुम्ही समजूतदार आहात याची मला खात्री आहे.जग बदलंलय तसं मुलांचे विचार बदलणारच ना! आजच्या बदलत्या युगात आपण फक्त जात,धर्म,प्रांत,वंश आणि आर्थिक स्थिती यावरून मोजतो.पण हे सगळं करताना एक गोष्ट विसरतो ती म्हणजे मुळात आपण माणूस आहोत.प्रत्येक धर्मग्रंथात माणुसकीचीच शिकवण दिली जाते.हे धर्मग्रंथ वाचूनही आपण त्यातले खरे तत्वच विसरतो.

         खर्‍या धर्माचा अनुभव आपल्याला दैनंदिन आयुष्यात येतो.एखाद्या अनोळखी व्यक्तीला मदत करणारा प्रवासी,  भुकेल्याला अन्न देणारे हात, किंवा संकटात सापडलेल्याला दिलासा हे काय तिची जात,धर्म,रंग पाहून करतो का? नाही ना! ही सारी माणुसकीचे दर्शन देणारी नुसती उदाहरणे नाहीत तर तिचे प्रत्यक्ष दर्शन घडवतात.माणुसकी हीच आपली खरी ओळख आहे.त्यासाठी आपण समाजात समानता,आदर आणि प्रेमाचा प्रचार केला पाहिजे.एकमेकांना समजून घेणे हेच धर्माचे तत्व आहे.जे आता साकेत पाळतोय.ते स्विकारणे हे तुमचं आदर्श वडिल म्हणून प्रथम कर्तव्य आहे.

       मला एवढंच म्हणायचंय आपण घराबाहेर जी माणुसकी दाखवतो तीच घरातील व्यक्तीबाबत,मुलाबाबत का नाही दाखवत? अंमलात आणू शकत? साकेत तर मुलगा आहे ना तुमचा!

हे  सर्व ऐकून ते गप्प राहिले.या सर्व बोलण्यात,

जेवणात दुपार कधी झाली ते कळलं नाही.मी म्हणाले थोडा वेळ आराम करा मग  संध्याकाळचा चहा घेऊनच जा.भाऊजींनी ऐकले.ते थांबले.जाताना सायली मला हळूच म्हणाली,

"रेखे,यांना पटलेलं दिसतंय.पटवण्यात तुझा हात कोण धरणार बाई?"

मी म्हटले,बघच तू घरी काय होतंय आणि कळव मला.आणि झालेही तसेच!

       दुसर्‍या दिवशी भाऊजी दारात हजर! म्हणाले निकीचे रजिस्टर लग्न करतोय उद्याच कोर्टात साक्ष द्यायला याल ना? आता चहा टाका.उद्या लग्नाला या.साकेतने सायलीपेक्षाही झक्कास साडी आणलीय तुम्हाला!

मी हसून म्हणाले आता खरा तुम्ही माणुसकीचा धर्म पाळला!


       हुश्श!आता माझे समाधान झाले.सायलीचा व माझा मैत्रीचा रेशमी बंध आत्ता अगदी घट्ट झाला होता पुन्हा एकदा....!! 



             प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे.©®


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational