रेडिओ...!
रेडिओ...!
रेडिओ ...!
आज खूप दिवसांनी आमच्या रेडीओची मला आठवण झाली. आमच्या एवढ्याच साठी म्हंटल कारण त्या रेडिओच्या जमान्यात आम्ही लहान होतो.एकत्र मोठ्या कुटुंबाचा सदस्य होतो. त्या काळी कुटुंबाचा हिस्सा, सदस्य असणेच मोठे भाग्याचे.मताला ,हट्टाला किंमत शून्य.वरती आणि तू गप्प बैस ,तुला काय कळतंय,अक्कल शून्य आणि पुढे फुल्या फुल्या मारून वाक्य पूर्ण व्हायची.अस आमचं दोन दगडातल्या कपारीतल्या कपरीतल कपरिच जीवन.त्या वेळी हे तसच होत आणि आज ही तसच आहे.फक्त दगडांची बदला बदल झाली.पण कपरिचा कर्म योग काही गेला नाही.
मोठं कुटुंब ,छोटी शेती ,आवक मोजकी यामुळे प्रत्येकाच्या अंगात त्याग शिगोशीग भरलेला.अगदी थोरल्याची चड्डी सदराआल्टर न करताच वापरायचो.वेळ प्रसंगी परत दादाचेच कपडे पुन्हा दादाला लागले तर हा विचार मनात असायचा.पण कमी काही पडायचं नाही.फक्त समंजस पणा हळू हळू अंगी बाणत जायचा. चैन ही सदैव नैसर्गिक गोष्टीतच अनुभवायला मिळायची.फोडणीचा भात,भाकरीचा चुरा,चपतीचा लाडू,उप्पीट,शिरा,इडली,डोसा,भजी असे अनेक विधी पदार्थ घरीच आलटून पालटून व्हायचे.सणावाराला वेग वेगळे मेनू ठरायचे.हॉटेल हा सोपस्कार निषिद्ध असायचा.हॉटेलात चहा पिणे चैन असली तरी असभ्य वर्तन वाटायचे.तालुक्याला सिनेमा टॉकीज,टॉकीज जवळून जाणे गुन्हा वाटायचा.पिक्चर पाहणे हा तर मोठा अक्षम्य गुन्हा ठरायचा.हिंदी सिनेमातली गाणी दुरून कोठून तरी कानावर
यायची आणि मनात ठासून रुतून बसायची,हळूच मग विरंगूळयादाखल तोंडातून बाहेर पडायची.कान
बरेच टवकारले जायचे.एखादं दुसरा धप्पाटा पाठीव आपली मोहर उठवायचा.हे सारं हसत खेळत पार पडायचं.मी जसा मोठा होऊ लागली तशी मोठ्या भावांना सिंग फुटली,ताईला पण पालवी फुटली,आशा अपेक्षा डोकं वर काढू लागल्या.एक दिवस दिवाळीच्या आदल्या दिवशी आमच्या भावंडांची सभा भरली.
सभेचे अध्यक्ष स्थान अर्थातच ताई कडे,ती सगळ्यात मोठी,अनुभवी आणि एकटीच 50%भार लीलया उचलणारी,बाबांची लाडकी त्यामुळे आमचा मोर्चा मजबूत आणि पूर्णतया परावलंबी.सर्वानुमते घरी रेडिओ सारखी चैनीची वस्तू आणण्याचे फर्मान एकमताने पास झाले. जयंतदादा सर्वात मोठा,कमावता महिना बक्कळ 90 रुपये अगर वाला,त्यामुळे सर्व भार त्याच्या दातृत्वावर आणि मर्जीवर.दोन नंबरचा हेमंत दादा ,थोडा पुणेकर,पुण्याला शिक्षणाला हित त्यामुळे पुढारलेल्या विचार सरणीचा.सारी योग्य अयोग्य निर्णयाची जबाबदारी त्याच्यावर बाकी सगळे लुंगे सुंगे,मी तर लिंबू टिम्बु. झालं ठरलं रेडिओ आणायचं.पण बाबांच्या समोर कोंडी फोडणार कोण हा मोठा प्रश्न.
कुजबुज घुमत होती आणि तितक्यात' वय दादा लेदीओच काय झाले ,आमचे कळीचे नारद पचकले आणि कोंडी फुटली.
जशी कोंडी फुटली तशी ती चांगलीच घुमली,नागा हिरोशिमा म्हणजे काय हे प्रत्यक्ष अनुभवले.बाबा म्हणजे रुद्रावतार त्यात आईला जेवण कशी सणावारची आटोपतील ही काळजी.फटाकड्या उडाल्या पण आम्ही पण काही कमी नव्हतो.बंड मोठ्या ताकदीने रेटले आणि एकदा बिल पास झाले.
जसे बिल पास झाले तसे आमचे विफ बंधू जयंतदादा आणि हेमंत दादा सा
यकल काढून तालुक्याला जायला निघाले सुद्धा.रात्री आठ साडेआठच्या दरम्यान घरी
दोघेही रेडिओ घेऊनच आले.फिलिप्स चा रेडिओ,त्याची पूजा, त्याचे चांगले गुण याचे पारायण सार सार पार पडलं आणि रेडिओचा पहिला आवाज घरात घुमू लागला.
नाण्याच्या दुसऱ्या बाजूला माघारी कौतुक पण
तोंडावर राग ही जुनी परंपरा जवळ जवळ महिनाभर जोपासली गेली पण सकाळची सांगली आकाश वाणी,सातच्या बातम्या,बिनका गीत माला आणि बुधवारचे साडे आठचे टेकाडे भाऊजी काही कधी चकल नाहीत!रेडिओ लावला की घर प्रसन्न असायचं.नन्तर नन्तर मग आपली आवड पण चालू झाली,पहिला पहिला ती सर्वांची आवड होती पण कालांतराने जस जसे रेडिओ लावायचे कसब आत्मसात झाले तसा रेडिओ आपली जागा बदलू लागला.वेगवेगळे आवाज काढू लागला.मग मधून मधून कुर कुरु लागला,सेल साठी हट्ट ही करू लागला.नन्तर बॅटरी आली, लाईट आले आणि मग त्याचे वागणेही बदलत गेले.त्याच्या वरचा हक्क बदलत गेला,टाइम टेबल ठरले आणि मग एकाधिकार शाही उदयास आली.रात्री आवड निवड ठरू लागली आणि हळू हळू
हिंदी कार्यक्रमांनी आपले स्थान भक्कम केले.त्याला अमीन सयानी पासून ते लता मंगेशकर,भीमसेन जोशी,महंमद रफी,हेमंत कुमार,किशोर कुमार,आशाताई सारे सारे आपापले हक्क आणि जागा घेऊन वेळा पत्रकाच्या चिंध्या करू लागले.पण इतकं मात्र खर रेडिओने आमच्या खूप साथ दिली.नन्तर काळ बदलला तसे एक एक श्रवण, द्रुक क्षेत्रातले पहिलवान पुढे आले आणि केंव्हा टीव्हीतून निघून सारे हाताच्या बोटावर येऊन बसले ते कळालेच नाही.पण अंतरातली रेडिओची जागा अबाधित राहिली तिथे कोणी येऊ शकले नाही आसनी येणार ही नाही.शेवटी रेडिओ हा रेडिओच त्याला पर्याय नाही. आजही नुसतीआठवण जरी झाली तरी सारे बालपण ओल्या डोळ्या समोर तरळते आणि हायसे वाटते.सारी नाती अजूनही रेडिओनेच जशीच्या तशी जपली आहेत इतके मात्र खरे.
जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्ताने मी चार ओळी लिहिल्या होत्या त्याही इथे रेडिओच्या सन्मानार्थ प्रस्तुत कराव्या वाटतात कदाचित हाच माझ्या रेडिओला मानाचा मुजरा म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
जागतिक रेडिओ
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
जा ग यायची भूपाळीने
ग ती जीवनास मिळायची
ती पहाट किती सुंदर असायची
क राग्रे वसते लक्ष्मी म्हणून सुरू व्हायची
रे डकू गोठ्यात हंबरायच
डी वचून डीवचून पान्हा फुटायचा
ओ काऱ्या ऐकू यायच्या
दि वसाची सुरवात मंगलमय वाटायची
ना ना नानी आता आलं पूर्वी
च्या बरोबर पहाटं अज्जा अज्जी असायचं
हार्दिक प्रेमासाठी हवाला लागायचा नाही
शुभेच्छां च पीक पण काढाव लागयायच नाही
असा सुवर्ण काळ अनुभवला
याच मानसिक समाधान लाभत
रेडिओ म्हंटल की सार आठवत....!
©प्रशांत शिंदे,कोल्हापूर
prashants9606@gmail. com
मोबाईल नं:8007740679(30/4/2019)