STORYMIRROR

पुन्हा एकदा नव्याने

पुन्हा एकदा नव्याने

4 mins
268

   मिरा एक स्मार्ट, सुंदर आणि शांत स्वभावाची तरुणी होती. ती श्रेयसच्या ऑफीसच्या बाजुच्या बिल्डींगमध्येच तिचही ऑफीस होत. कधीतरी दोघांची नजरानजर व्हायची. श्रेयसला तिची स्माईल पाहुन त्याला खुप छान वाटायच. तो या एक स्माईलसाठी सकाळी जरा लवकरच यायचा. एक दिवस त्याचा मित्र रविने त्याला तिच्याकडे बघताना पाहील. मग त्याने श्रेयसला विचारल... " शिरू तु त्या मुलीकडे रोजच का पाहतोय... ? " तिला समजल तर मार खाशील ती शांत आहे पण फार कुणाशी बोलत नाही. " तुला तर फारच माहीती आहे बाबा " अस म्हणतात श्रेयसने दोघेही हसायला लागतात. मिराही रोज छान पंजाबी ड्रेस घालायची. आधीच ती सुंदर दिसायची आणि तो हलकासा मेकअप अजूनच सुंदर दिसायची. आणि तिची ती गोड स्माईल पाहुन श्रेयसच्या काळजाच पाणी व्हायच. ती त्याला आवडत होती. एक दिवस मिरा स्वतःहून श्रेयसला बोलली. " तुम्हांला मी रोज बघते, इथेच जाॅब करता का ? कुठल्या डिपार्टमेंटला आहात ? " तेव्हा श्रेयसने तिला सगळ सांगितल. त्यानेही तिला विचारल. दोघेही पहील्यांदा बोलले. त्यांच्यात आता रोजच ऑफीस सुटल्यानंतर बोलण होत होत. त्यांची छान मैत्री झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. श्रेयसने मिराला प्रपोझ केला. तिलाही समजदार, प्रेमळ आणि काळजी करणारा श्रेयस खुप आवडत होता. दोघांच्या प्रेमाला बहर आला होता. दोघेही खुप बोलायचे, एकमेकांची काळजी घ्यायचे. श्रेयसच तिच्यावर मनापासुन प्रेम होत.     


मिरा आणि श्रेयस ऑफीसममुळे एकमेकांना बोलायचे, भेटायचे. तेवढच या दोघांना काय तो एकमेकांसोबत वेळ भेटायचा. दोघेही तो क्षण मनापासून जगायचे. रोजचा दिवस छान जात होता. मध्येच कोरोनाची पहीली लाट आली. त्यात रूग्णसंख्या वाढु लागली. त्यांच्या ऑफीसला घरूनच  ' वर्क टु होम ' करण्यात आल. दोघेही घरूनच ऑफीसच काम करायचे. कामाचा भार वाढला होता. दोघेही बिझी असायचे. कधी मिटींग्स असायच्या. तर बोलायला वेळ भेटत नव्हता. मग चीडचीड, राग आणि भांडण व्हायची. पण नंतर दोघांनीही समजुन घेतल. ऑफीसच काम तर महत्वाच होत. जेव्हा वेळ भेटायचा. तेव्हा ते दोघे बोलू लागले. मेसेज करू लालगे. श्रेयस जास्त समजुन घ्यायचा. पण भेट होत नसल्यामुळे मिरा जास्त श्रेयसवर चिडायची. तर श्रेयस तिला समजुन सांगायचा. " ही परिस्थिती आज ना उद्या बदलेल, सगळ ठीक होईल तेव्हा आपण भेटु... पण आता तु आणि घरचे खुप काळजी घ्यायची आहे. " तेव्हा कुठे ती शांत व्हायची. पण कामाच टेन्शन आणी त्यात ही असली परिस्थिती त्यामुळे तिची या परीस्थितीशी जुळवून घ्यायला चिडचीड व्हायची. तिला बाहर फिरायला जाण्याची खुप आवड होती. मैत्रीणींना आणी श्रेयसला भेटताच येत नव्हतु म्हणून तिला वाईट वाटायच. ऑफीसला तरी सगळे भेटायचे, सर्वांचे रोज चेहरे नजरेला पडायचे हे अस कोरोनामुळे घरूनच काम कराव लागत यामुळे तिला छान वाटत नव्हत. पण तिने याची सवय करून घेतली यात तिला श्रेयसने सपोर्ट केला. तो रोजच तिला वेळ भेटेल तेव्हा काॅल, मेसेज करायचा तिला छान वाटापच. जवळ असल्यासारख वाटायच. या परिस्थितीत तिने स्वतःला ॲडजेस्ट केल.         


ऑफिसच ऑनलाईन वर्क सूरू होत. आणी वेळ भेटेल तेव्हा श्रेयसला मदत करायची. घरी आईलाही कामात मदत करायची. तिला श्रेयसमुळे छान सवय लागली होती. आईबाबांच थोड वय असल्याने ती त्यांना बाहेर पाठवत नव्हती. मिरा स्वतःच आठवड्यातुन एकदा जे घरात आवश्यक आहे ते सगळच किराणा, भाजीपाला, मेडीसीन व इतर उपयोगी वस्तु आणुन ठेवायची. त्यामुळे काळजी नसायची. घरी कामालाही बाई येत नव्हती. आईलाही ती आपल काम सांभाळून मदत करायची. मीरा आणि श्रेयस लाॅकडाउन असुनही मनाने एकमेकांच्या खुप जवळ होते. कधी श्रैयसने काॅल केला नाही, उशीरा केला कींवा मेसेजला रीसप्लाय नाही केला तर ती समजुन न घेता त्याच्यावर चिडायची, रागवायची तो मात्र शांतपणे तिच्याशी बोलायच पुन्हा नव्याने बोलायला लागायचे. तिला कळतच नव्हत की श्रेयस नेमका कसा आहे, त्याला ती इतक बोलली तरी समजून घ्यायचा. तिला एखाद छान गाण म्हणायचा. त्याला गाण म्हणता यायच किंवा तिचा राग घालवण्यासाठी व्हीडीओ काॅल करून, काॅमेडी करून तिला हसवायचा. ती ही हसायची आणि पुन्हा दोघे एकत्र यायचे.        


एक दिवस मिराची आई आजारी पडली. तिला अचानक काय झाल काही कळेना, तेव्हा आईची कोरोना टेस्ट केली पण ती निगेटीव्ह आली. आईला आरामाची गरज होती. तेव्हा मिरा आईला बर नसल्यामुळे आईच काम ती करायची. तिला आराम मिळावा म्हणून, वडीलही हातभार लावायचे. तेव्हा पाच सहा दिवस ती श्रैयसला बोलत नव्हती फार पण त्याला सांगीतल्यामुळे त्याने समजुन घेतल. तेव्हा मिराला श्रेयस किती समजदार आणि त्याच तिच्यावर किती प्रेम आहे याची तिला जाणीव झाली आणि तिला त्याच प्रेम समजल. तेव्हा मनाने खचलेल्या, आईची काळजी  वाटणारी मिराला त्याने ती स्ट्राँग असल्याची जाणीव करून दिली. तिला सकारात्मक विचास रोज सांगायचा. मिराही त्याच सगळ ऐकायची. त्याच्या प्रेमाची ताकद म्हणा ती सगळ मॅनेज करत होती. आईही बरी झाली होती. तिच ऑनलाईन वर्क सुरू होत.     


मिराला श्रेयसच प्रेम आणि त्याची समजुन घेण्याची वृत्ती समजली होती. तो तिला आणि आईला भेटायला येऊ शकला नाही पण मिराच्या सोबत होता. रोजच तिला शाब्दीक आधार द्यायचा. तिलाही बर वाटायच. त्याच्या शब्दांमुळे आणि प्रेमामुळे तिने सगळी परिस्थिती व्यवस्थित निभावली होती. तेव्हा पाच सहा दिवसानंतर सुट्टीच्या दिवशी तिने त्याला फोन करून एकदा सर्व चुकलेल्या आणि ती खुप त्याच्यावर रागवायची, चिडायची त्यासाठी तिने साॅरी म्हटल... तेव्हा श्रेयसने तिला म्हटल... "अग वेडे मिरा, माझही तुझ्यावर खुप प्रैम आहे पण यार ही कोरोनाची परिस्थिती भयंकर आहे. "आपल्या माणसांना समजून घेतल पाहिजे ना. तिलाही ते पटल. मिरा श्रेयसला म्हटली, "मला माहिती आहे किंवा तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे तुला अस शब्दांत सांगायची गरज नाही, श्रेयस ते मला या दिवसांत दिसल... आणि समजलही." तेव्हा श्रेयस मिराला म्हणतो... "आपण आपल्या प्रेमाची पुन्हा एकदा नव्याने सुरूवात करू या..."   मिरा 'हो' म्हणते.... तिच्या चेहर्‍यावर गोड स्माईल येते. दोघेही आपल्या प्रेमात नव्याने जगायला सुरूवात करतात.   


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance