Jaya Godbole

Inspirational Others

4.5  

Jaya Godbole

Inspirational Others

*पुढचं पाऊल* ##########

*पुढचं पाऊल* ##########

3 mins
248


खुप दिवसांनी आज अंगणात नवीन कपडे घालुन मुलं पकडापकडी खेळत होती. घरात मोठ्या माणसांची लगबग चालू होती. मधेच काहीतरी विनोद होत होते आणी हास्याचे कारंजे फुटत होते. सगळ्यांच्या चेहर्यावर एक असीम आनंद आणी समाधान दिसत होते. आणी का नसावे... सगळ्यांच्या लाडक्या अमीतचं  लग्न ठरलं होतं. अमीत म्हणजे विनयचा मुलगा. विनय हा सगळ्या नातेवाईकांचे केंद्रस्थान. कोणताही कार्यक्रम असो त्यात विनयचा उत्साहाने सहभाग असायचाच. त्याच घर मोठं असल्यामुळे सगळे कार्यक्रमही त्याच्याच घरी उत्साहाने पार पडायचे. हे कार्यक्रम म्हणजे सगळ्या नातेवाईकांना एकत्र येण्याची एक नामी संधीच असायची‌ . अशा ह्या विनयच्या अमितचं लग्न ठरल्यामुळे सगळ्या नातेवाईकांनी उत्साहाने पुढाकार घेऊन त्याच केळवण एकत्र साजरं करण्याचा घाट घातला. 

लग्नात कोणकोण काय-काय करणार ह्याचा तपशील घेतला जात होता. मधेच कुणीतरी अमितला विचारत होते, "अरे पार्लर अपॉइंटमेंट घेतलीस ना...नाहीतर आयत्यावेळी पंचईत होईल". वहीनी, तुम्ही विहीणबाई. तुमच्या एकुलत्या एका मुलाचे लग्न आहे. तुम्ही सुद्धा छान मेकअप केला पाहिजे हा... असा लाडीक आग्रह केला जात होता.

विनय आणी वीणाने ठरवलं होतं की आजच सगळ्यांना लग्न आमंत्रण पत्रिका द्यायच्या. देवासमोर पत्रिका ठेउन आमंत्रणाची सुरुवात मीरा आणी तीच्या मिस्टरांपासुन करायची.

राहुन राहुन सगळ्यांचे लक्ष दरवाजाकडे जात होते. दुसर्यांदा लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच मीरा घरी येणार होती. इतक्यात मुलांचा गोंगाट एकु आला , मीरा काकु आली..मीरा मामी आली....इतका वेळ हास्यविनोदाने भरलेलं घर अचानक शांत होत गेलं. दारात मीरा तीच्या मिस्टरा़बरोबर उभी होती. व्यवस्थित, निटनेटक रहाणीमान, शांत-समाधानी पण काहीसा बैचेन चेहरा...

तशी ती वाईट कधीच नव्हती. 

हसर्या चेहर्याने तीने कारखानीसा़च्या घरात प्रवेश केला होता. आमचा विकासच हुम्या होता. कधीही कुणातही मिसळत नव्हता. कामावर गेला तर गेला. नाहीतर घरातच बसून दिवस काढायचा. नाती सांभाळायचं काम ती मात्र अचुक करत होती. घरखर्चाला हातभार लावण्यासाठी तीने एका फायनान्स कंपनीत नोकरी पत्करली. ती समंजस, प्रेमळ आणी गरजेला धाउन येणारी होती. घरातील कुठल्याही कार्यक्रमात आवर्जुन जबाबदार्या उचलत होती. लग्नाला वर्ष झाले तरी तीची कुस काही उजवत नव्हती् म्हणुन विचारणा केल्यावर समजले की विकास तिच्याजवळ कधी गेलाच नाही. घरातल्या वडीलधाऱ्या माणसांनी त्याला समजवल्यानंतर जगव्यवहार म्हणुन त्याने दोन-तीन वेळा तिच्याशी जवळीक केली. तीला दिवस गेले आणी शुभमचा जल्म झाला. सगळ्यांना वाटलं, चला... गंगेत घोडं नाहीलं. आतातरी सगळंकाही सुधारेल. पण कसलं काय...तो कोरडा ठणठणीतच राहीला. ना कधी त्याने शुभमकडे प्रेमाने पाहीले ना कधी तीची चौकशी केली. संसाराची सगळी जबाबदारी मीरावर टाकुन तो अलिप्तच राहीला. घराची , मुलांची आणी ऑफीसची जबाबदारी मीरा एकटीच रेटत होती. अमितचा तर जास्तीत जास्त वेळ आपल्या लाडक्या काकुबरोबर आणी शुभम बरोबर जात होता. मीरा सुद्धा शुभम इतकंच प्रेम अमितवर करत होती. 

हळूहळू मुलं मोठी होत गेली. शुभम उच्च शिक्षणासाठी फॉरेनला गेला आणी तिकडचाच झाला‌. पुढेपुढे तर मीराला येणारे त्याचे फोन सुद्धा कमी होत गेले. 

एक दिवस अचानक बातमी आली की मीराने विकासशी घटस्पोट घेतला आणी वयाच्या ५२व्या वर्षी ऑफीसमधल्याच कुणा शेखरशी लग्न केलं. 

ह्या सगळ्या घटना डोळ्यांसमोरून तरळुन जात असतानाच "मी आत येऊ का" ह्या मीराच्या प्रश्णाने सगळेजण भानावर आले. 

अगं हा काय प्रश्ण झाला का? हे घर तुझसुद्धा आहे. तुमचीच इतका वेळ आम्ही वाट बघत होतो. असं म्हणत वीणाने तीच्या हाताला धरुन तीला घरात आणले.

जेवणं झाल्यानंतर इतकावेळ शांत असलेल्या मीराने बोलायला सुरुवात केली. खरं तर शुभम लहान असतानाच शेखरने तीला लग्नाबद्दल विचारले होते. त्यावेळी शुभमच्या डोक्यावरचं त्याच्या खर्या वडीलांच छत्र काढुन तीला त्याच्यावर अन्याय करायचा नव्हता. पण आता शुभमनेच तीला समजावलं होतं की तो तीला हवा तसा वेळ देऊ शकणार नाही. आयुष्यभर तीने फक्त सोसल, जबाबदार्या उचलत रहीली ज्या तीच्या एकटीच्या कधीच नव्हत्या. पण आता आयुष्याचा उर्वरीत काळ तरी तीने स्वत:साठी जगावे असं त्याला वाटत होतं. आयुष्याच्या संध्याकाळी तीलाही आधाराची गरज आहे. हे लग्न तीने केल तर त्याच्याही मनावरचं ओझं थोडं कमी होणार होतं. 

त्याच्या बोलण्यावर खुप विचार करुनच तीने हे पुढचं पाऊल उचललं होतं. 

काही वेळ स्तब्ध राहुन तीने थरथरत्या आवाजात सगळ्यांना विचारलं, माझं काही चुकलं का? 

सगळ्यांनी एकमताने तीला सांगितले की ती कधीच चुकीची नव्हती. तीने योग्य तेच केलं.  

समाजाच्या विरूद्ध जाऊन हे बंडखोर पाऊल उचलल्यानंतर समाजाआधी कुटुंबाकडून मिळालेल्या मान्यतेने तीच्या मनावरचं मणांच ओझं दुर झालं.

इतक्यात पुढे येऊन विनय आणी वीणाने अमितच्या लग्नाची पहिली पत्रिका मीरा आणी शेखर ह्यांच्या हातात देऊन चार दिवस आधीपासूनच आग्रहाचे आमंत्रण केले. मीराच्या डोळ्यात अश्रु तरळले.

"हे काय गं काकु, माझं आता लग्न होणार आहे आणी तु रडत का आहेस? तु रडलीस ना तर मी लग्नच नाही करणार जा....असं म्हणत अमितने रुसण्याचं नाटक केलं. त्याचं रुसणं बघुन मीरासकट सगळेच जण खो-खो हसायला लागले. आणी घर परत एकदा हास्यविनोदाने भारुन गेलं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational