STORYMIRROR

Jaya Godbole

Inspirational

2  

Jaya Godbole

Inspirational

कलियुगातील हिरकणी

कलियुगातील हिरकणी

1 min
207


आज सकाळपासूनच तिला अंगात थोडी कणकण वाटत होती. डोकं पण जड झालं होतं. एकीकडे, "अगं वेळेवर घरी येत जा गं..."


आईंची भुणभुण कानावर पडत होती. तिला कळत होतं की आई काळजीपोटीच बोलत आहे. पण तिचाही नाईलाज होता. शहरातील बंदोबस्तात अजून कडक वाढ केली होती. तिने पटकन बुटांची लेस बांधली आणि उठणार इतक्यात बाळाने टाहो फोडला. ती कासावीस झाली. मनगटावरच्या घड्याळाकडे तिचं लक्ष गेलं. तिने पटकन कॅप डोक्यावर घातली आणि मागे न बघताच झपझप पावलं उचलत फटफटीला एक जोरदार किक मारली. तारेवरची ही कसरत रोज सांभा

ळत असताना तिची वर्दीच नेहमी जिंकत होती.


ऑफिसला पोहोचेपर्यंत तिला सडकून ताप भरला. डोकं फुटायचं बाकी होतं. तिला ज्या संकटाची भीती वाटत होती तेच झालं. रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले. तिच्या डोळ्यासमोर सारखं तान्हुलं येत होतं. डोळ्यांतून अश्रू खाली पडणार इतक्यात तिने त्यांना तिथेच थांबवलं आणि प्रतिज्ञा केली की या संकटातून सात दिवसांत बाहेर येईन.

 

बरोबर सातव्या दिवशी तिचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. त्यादिवशी तिच्या वर्दीबरोबरच तिच्यातील आईसुद्धा जिंकली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational