Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Jaya Godbole

Inspirational Others


3  

Jaya Godbole

Inspirational Others


असंही एक शुटींग

असंही एक शुटींग

3 mins 147 3 mins 147

अनेक छंदांपैकी ऑडीशन देणं हा माझा एक छंद आहे. छंद म्हटल्यावर कदाचित तुम्ही सगळेजण हसाल. पण छंद एवढ्याचसाठी म्हणत आहे कारण कुठुनतरी ऑडीशनची बातमी आपल्या कानावर पडते. लगबगीने आपली बाकीची कामे बाजूला ठेवून मोठ्या तयारीने आणि आशेने आपण ऑडीशनला जातो. खूप वेळ गेल्यानंतर आपला नंबर लागतो. ऑडीशन घेतल्यानंतर, "तुम्हाला आम्ही कळवू, तुमचा नंबर लिहून जा," असं सांगण्यात येतं, आणि आपल्या आशेला पालवी फुटते.


काही दिवस वाट बघितल्यानंतर आपण जेव्हा तो‌ सांभाळून ठेवलेला नंबर घेऊन त्यांना कॉल करतो तेव्हा एकच उत्तर जवळ जवळ सगळीकडे ऐकायला मिळतं की, "तुमचे फोटोज् पुढे पाठवले आहेत. तुम्हाला आम्ही कळवू." आता पुढे म्हणजे कुठे, हे समजून घेण्याचा अधिकार पण आपल्याला नसतो. आणि त्यावर विचार करूनसुद्धा काही फायदा नसतो. शेवटी आपण आपल्या नेहमीच्या कामात व्यस्त होऊन त्या ऑडीशनबद्दल विसरूनसुद्धा जातो. आणि मग नंतर कधीतरी समजतं की, ऑडीशन हे केवळ एक नाटक होतं, त्यांचं सिलेक्शन हे आधीच झालं होतं.


त्यामुळे आणि केवळ त्यामुळेच एखाद्या ऑडीशनला गेल्यानंतर खूप काही शिकायला मिळालं हा सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन आणि दुसरी कोणतीही आशा न ठेवता आनंदाने परत फिरायचं हे मी माझ्या अनुभवातून शिकले होते. तरीही शुटींग हे माझ्यासाठी नवीन नव्हते.

असं असताना त्यादिवशी एक अजबच घटना घडली. आता त्या घटनेला मी अजब का म्हटलं असेन हे तुम्हाला नक्कीच समजेल.


काही कौटुंबिक जिव्हाळ्याचे क्षण अनुभवत असताना अचानक मला कॉल आला,"आपण जया गोडबोले का?," मी म्हणाले, "हो.'' मग तिकडून आवाज आला , " मी लीना देशमुख", आपण ठाण्याला एका पिक्चरच्या ऑडीशनसाठी आला होतात. त्यात तुमची निवड झाली आहे.. १० तारखेला शुट आहे. तुम्ही फ्री आहात का?


एका पाठोपाठ एक सुखद धक्के मला बसत होते. कोणत्या ऑडीशनला मी गेले होते तेच मला आठवत नव्हते. पण त्यातून स्वत:ला सावरुन मी म्हणाले,"थॅंक यु मॅडम. मी फ्री आहे." तिने फोन ठेवला. थोडावेळ विचार केल्यानंतर मला मी दिलेलं ते ऑडीशन आठवलं.


शुट मढला होतं. सकाळी ४ ला उठून ५.१२ ची बोरीवली ट्रेन पकडून त्या पत्त्यावर मी बरोबर ६.३० ला पोहोचले.


तिथे गेल्यानंतर कोणीतरी म्हणाले,"मॅडम, पहिला नाश्ता करून घ्या.", नाश्त्याकडे मी वळले. आणि पाहातच राहीले. काय नव्हतं त्या नाश्त्यामधे.... ईडली, डोसा, पोहे, उपमा,फ्रुट सलाड, वेज सलाड, बॉइल्ड अंडी.सगळ्यात विशेष म्हणजे ज्युनिअर आर्टिस्टनासुद्धा सारखाच नाश्ता होता.


नाश्ता झाल्यावर लक्षात यायला लागलं की त्यांची पूर्ण टिम ही तरुण, सुशिक्षित मुला-मुलींची होती. ते आपापसात इंग्रजीमध्ये बोलत होते. आणि आर्टीस्टशी बोलताना अतिशय सभ्यतेने आणि विनम्रतेने मराठीत बोलत होते. कुठेही असभ्य भाषेचा किंवा अपशब्दांचा प्रयोग होत नव्हता. नंतर प्रत्येक आर्टीस्टकडे जातीने लक्ष देऊन त्यांचा कॉस्च्युम , मेकअप आणी केशरचना ठीक आहेना हे पडताळून पाहण्यात येत होतं.


आयुष्यात कधीही स्वत:ला स्वत:साठी वेळ न‌ देता आलेले आर्टिस्ट आपल्याला कोणीतरी इतकं छान सजवत आहे या भावनेने भारावून जात होते. मेकअप मेन आणि हेअर ड्रेसर त्यांच्याशी अतिशय आपुलकीने वागत होते. याआधी शुटींग मी खूप वेळा बघितली होती. पण 'A' ग्रेड/ 'बी' ग्रेड आर्टीस्ट असा भेद त्यात पाहायला मिळतो. आणि त्याप्रमाणेच त्या कलाकारांना वागणूक पण मिळते. जेवणातच इतका फरक असतो की मग हेअर ड्रेसर, मेकअप हे दुरच राहीलं.


शुटींग सुरू झाले. शुटींग चालू असताना खूप रीटेक्स होत होते. पण प्रत्येक वेळी अतिशय शांतपणे आणि सभ्यतेने सगळ्यांना समजावून सांगण्यात येत होते. कुठेही चीडचीड नव्हती. शुटींग चालू असताना अचानक एका ज्युनिअर आर्टीस्टला खोकल्याची उबळ आली, आणि शुटींग थांबवावं लागलं. शुटींग मधेच थांबवावं लागल्यामुळे नुकसान होतं. आता त्या ज्युनिअर आर्टिस्टवर सगळे चिडतील असं वाटलं. पण काहीतरी वेगळंच घडत होतं. त्या आर्टिस्टला शांतपणे बाहेर नेलं. त्याला प्यायला पाणी दिलं. त्याची विचारपूस केली. त्याला पूर्ण बरे वाटेपर्यंत शुट थांबवले होते. जेव्हा तो आर्टीस्ट सेटवर परत आला तेव्हाच पुढील चित्रिकरणाला सुरुवात झाली.


काहीवेळाने लंच ब्रेक झाला‌. दुपारच्या जेवणामधे खूप व्हेज/नॉनव्हेज पदार्थ होते. सर्व आर्टीस्टसाठी बुफे सोय होती

जेवणानंतर काही तास एडीटींग, डबींग, तसेच इतर कलाकारांचं शुट संपल्यानंतर परत पुढील चित्रिकरणाला सुरुवात झाली. हे चित्रिकरण बरोबर ६.३० ला म्हणजेच १२ तासांची शिफ्ट झाल्यानंतर लगेच थांबवले‌. आर्टीस्टना त्यांच्या कामाचा मोबदला ताबडतोब देण्यात आला. 

निघताना मी मनापासून दिग्दर्शकांचे आभार मानले. अतिशय सुंदर पद्धतीने आर्टीस्टच्या भावनांचा विचार करत एक छान वातावरण आम्हाला दिल्याबद्दल नक्कीच माझ्या ब्लॉगवर याविषयी लिहिणार आहे असे सांगितले. दिग्दर्शकांनी कुठेही आपल्या तसंच पिक्चरच्या नावाचा उल्लेख त्यात करू नये अशी विनंती केली.


आनंदाने आणि समाधानाने प्रत्येक आर्टीस्ट मनात छान अनुभव आणि आठवणी सांभाळत मार्गस्थ झाले. 

त्यातलीच एक मीसुद्धा होते.


Rate this content
Log in

More marathi story from Jaya Godbole

Similar marathi story from Inspirational