Umakant Kale

Children

3  

Umakant Kale

Children

पत्र लेखन अवकाळी पाऊस

पत्र लेखन अवकाळी पाऊस

2 mins
129


प्रिय पावसा

पत्ता:- आई म्हणते तू देवा

     जवळ राहतो...


     काळे नभ येई रे दाटून

     थंड वारे लागे कुठे अडून 

     मग घेई तू सुड तुझा कसून

     बळीराजा जाई फार मरुन...


प्रिय पावसा सारखा आमच्या लहान मुलांना खूप सतावत आहे.. एरव्ही शाळेत शिकलेले आमच्या लक्षात राहत नाही

त्यात तुझी भर घालतो आता तर आम्हाला पहाटे हिवाळा अण् सकाळी ऊन्हाळा वाटतोय... तुझं तापमान सुरू होत की नाही तेच तू पावसाळ्यातील विक्राळ रूप घेऊन आमच्या चिल्या पाल्यान समोर येतो.हल्ली तुझ्या वागण्याने सगळी लोक आम्हाला धाऊन खायला येतात आणि चांगलाच समाचार घेतात.तू एवढा कसा गोंधळून जातो रे आमचं तर समजते पण तु ही असे वागणार कसं होणार रे...


काल तर शेजारच्या घरात काकांनी तुझ्यावर रागावून आत्महत्या केली म्हणे..पण ही आत्महत्या असते तरी काय हे आम्हाला कुणी ही सांगायला तयार नाही. काकांनी काय तुझं घोड मारलं होतं बरं... तुझ्या मुळे काकांच्या बालीच रडून रडून हाल बुरे झाले रे...तू तर देव तुल्य असतो असं माझी आजी म्हणायची मला नेहमी..मग देव अशी कशी चुका करेल मला अजून ही कळतच नाही...


उन्हाळ्यात म्हणे गावाकडे जाताना आणि रानमेवा चाखायला सोबत आंबे खायला मिळतात..हे पुस्तकात वाचले होते..ते खरे की आम्ही बघतो हे खरे समजत नाही... आईबाबा म्हणतात आंबा आला नाही अजून बाजारात...काल परवा आईसोबत बोलताना बाबा म्हणाले की आंबा बागायतदार यंदा पुरे मेले... असं असेल तर तू किती जणाचा जीव घेणार हे ही ठरवलं आहे...


परवा आमच्या धनीच्या गोठ्यावरील टिन उडून नेले बाप्पा तू... त्यामुळे धनीची सवू निरा थैयथैय उड्या मारत होती.

चिमणा चिमणी ताई रुसून आमच्या खोलीत जाऊन बसल्या आहे.माहित आहे का तुला.. नको बाबा असं करू... तुला हवं ते देईल अप्पांना सांगून.पण आता तर बंद कर तुझा हा खेळ..


                    तुझी प्यारी राणी

                       जान्हवी..,



Rate this content
Log in

Similar marathi story from Children