Umakant Kale

Others

3  

Umakant Kale

Others

तिला लिहलेले पत्र

तिला लिहलेले पत्र

4 mins
9.1K


पत्र प्रिय सरीता xxxxx ( लग्नाच्या नंतरचे तुझे सरनेम नाही माहिती),

Savitaxxxxx45@gmail. com पत्ता: कधी विचारले नाही. म्हणून आज मेलच करतो.

विश्वे या आठवणीच्या तुला आठवतो!

जिथेतिथे आजपण तुला बघतो,

सुरुवात काव्यातून करतो कारण तुला नेहमीच माझ्या कविता, चारोळ्या आवडायच्या म्हणून मुद्दामच आज पुन्हा तुला आवडावी तशीच सुरुवात केली. जुन्या त्या मैत्रीच्या दिवसाची आठवण यावी म्हणजे लिहणे सार्थक. पण सुरुवातीला मनात एक प्रश्न उद्धभवला, "प्रिय" लिहावे की नाही? कारण तो अधिकार यू मला कधीच दिला नव्हता. पण उद्धट पणाने मी सुरुवात केली त्यासाठी माफी पण मागतो तुझी. आजच्या या धावपळीत तू जरी व्यस्त झाली असशील तरीपण काय माहिती मी अजूनही माझ्या आयुष्याच्या वाटेवर तेथेच तसा उभा आहे. जशी तू मला सोडून पुढे गेलीस. काही बंधने तू तोडून गेलीस, काही बंधने माझ्यावर लादून गेलीस. तुला दिलेली वचने मी आजपण पूर्ण ईमानाने निभावतो.आठवते तू काय वचने मागितलीस? मी माझी काळजी घ्यावी, उपवास सकाळी न सोडता संध्याकाळी सोड, तू दिवसभर काही खात नाही पण थोडे फराळाचे करत जा. तुझे ते शब्द आज पण कानात घुमतात आणि आज उपवासाच्या दिवस जणू तू मला सांगत असतेस, दूर आसल्याचे भासत नाही. तुला आठवून मी दु:खी नको व्हायला तसेच आजपण तुझ्या दिलेल्या शब्दास पाळतो. हो! एक शब्द नाही पाळू शकलो तुझ्या जागी कुणालातरी स्थान मनात आजपण देता नाही आले. सगळे सांगून तुला त्रास देण्याची माझी मनिषा नाही पण मनात खूप साचले म्हणून मनाची काच साफ करण्यासाठी मी आज तुला लिहतोय. तुझ्यावर मला आज कुठलाही अधिकार दाखवयचा मुळीच नाही. सगळ्यात पहिले आपले नाते मैत्रीने सुरु झाले पुढे आपल्यात संवाद वाढला. सुरुवात तुझ्या good morning असा सुंदर massage ने व्हायचा अन् रात्र तुझ्या गोड massage नी रोज व्हायची. माझे जग त्यावेळी तुझा भोवती गुंतले होते. दिवसभर तुझ्यासी गप्पा मारताना मला खूप बरं वाटायचं. सतत तुझ्याशी बोलत राहवेसे वाटायचे. आठवते तू मला Misscall द्यायची अन् मला परत कोल करायला थोडा जरी उशीर झाला तर शामत माझी यायची. मग तुला समजावण्यात खूप वेळ जायचा पण तरीही तू राग सोडायची नाहीस. मग तुझ्यावर कविता करावी अन् चटकन तू मला माफ करायची. आठवते तू म्हणाली होतीस की मी तुला घरच्या इतकाच महत्त्वाचा आहे. तू कधीच मला नाही विसरणार. पण आज विसरलीस मला. कधी काळी तुझ्यासाठी मी Godgift होतो असे तू म्हणायची पण असे आपले Godgift कुणी भले वाऱ्यावर सोडते का? तुला मी call पण करु शकलो असतो पण इतक्या वर्षांनी तुझा आवाज ऐकून कदाचित मला बोलणे जमले नसते म्हणून मेल करण्याचे ठरवले. २१ च्या शतकातील Working Women आहे. तुला नेटवर्कीग चांगले जमते. सोशलनेटवर्क साईटवर तुझे Account आहेच. कधीतरी तरी तू मेल बघशील याची खात्री आहे. पण बघून तू मनाला फारसे लावून नको घेऊ बर का? ज्याला कमी वयात आई-वडील या जगात एकट्याला सोडून गेले, लहान बहीण-भावाची जवाबदारी माझ्यावर आली. कधी मनातले सांगवे असे कुणी भेटले नव्हते पण तू माझ्या आयुष्यात आली, बघता बघता माझं तू जगणं कधी बनली मला कळले नाही. माझ्या बहीण-भावाना कधी कुठला नातेवाईक बोलत की विचारात नव्हता. त्याच्यासाठी माझ्या व्यतिरिक्त बोलणार अस कुणीच नव्हते ग! पण तुझ्या येण्याने माझ्या आयुष्यातील ती पोकळी भरून निघाली. तू त्यांना हक्काने बोलायाचीस,  एक भावनिक नाते तुमच्यात बनले होते. कधी मला दु:खी बघता तुला त्रास व्हायचा. कधी कधी तू इतकी माझ्यात एकरुप व्हायची माझ्या वर येणाऱ्या संकाटासाठी, दु:खासाठी चक्क विश्वविधाता परमेश्वराशी भांडायचीस. मला तेव्हा स्वतःचा खूप नाज/अभिमान वाटायचा की नशीबाने तू भेटलीस. मग अशा परिस्थितीत माझ्या जागी कुणी पण असते तर तो नक्कीच तुझ्या प्रेमात पडला असता. आशा वेळी माझ्या मनात तुझ्या विषयी प्रेम निर्माण झाले मग माझा काय ग दोष? तुला कदाचित माहिती नसेल तुझ्या मैत्रीणीने मला तुझ्या मनातले सांगितले तुला पण माझ्या विषयी थोडेतरी प्रेम होते. ते प्रेम मानाच्या एका कोपऱ्यात आज पण बंद आहे. तरी माझी तुझ्याबद्दल कुठलीही तक्रार नाही. आई-वडिलांच्या विरोधात जाऊन काही मला तुला मिळवायचे होते नाही. तुला पण प्रेम करायचे होते. तुझ्या निर्णयाचे मी तेव्हा ही स्वागत केले आजही त्यावर मी ठाम आहे. माझ्याविषयी नको वाईट वाटून घेऊ. ती एक वेळ होती जी आपल्या आयुष्यात येऊन गेली. तू नेहमी सुखात रहा या व्यतिरिक्त मला काहीच नको. बस ऐवढेच देवाकडे मागतो. खूप काही लिहिले तसे लिहायला खूप काही आहे. ते मी माझ्या कांदबरीत लिहेल तेव्हा तू कांदबरी तेवढ्याच प्रेमाने वाच जेवढ्या उत्सुकतेने डेलीसोप जसे तू न विसरता बघतेस. छान हसलीस तू हे ऐकून म्हणजेच सगळे ठीक. मला कुठे शोधण्याचा प्रयत्न करु नकोस,  ना ही माझ्या मित्राना विचारण्याचा प्रयत्न, फक्त कधी नाव ऐकू आले किंवा वर्तमानपत्रात कुठे दिसले; तेव्हा मात्र, होता एक वेडा, तुझे जुने आणि फेमस वाक्य म्हण "यु के "खरचं तू वेडा होतास." बर चल निघतो.

    आयुष्याच्या पुढच्या प्रवासवर निघालेला, तुझाच वेडा लेखक/कवी  (U K)


Rate this content
Log in