Umakant Kale

Tragedy

2  

Umakant Kale

Tragedy

शोध..एक प्रवास..भाग २

शोध..एक प्रवास..भाग २

3 mins
9.5K


रस्त्यावर अनेक लोक येत जात होते पण कुणीही मदतीला येईना ! सगळे फक्त तमाशा पहात उभे होते. तो इवलासा जीव वेदनेच्या आकांताने कण्हत होता. त्यावेळी त्याच्यासाठी कृष्ण धावून यावा असेच आश्चर्य घडले. वारकरी संप्रदायाचा एक समुह त्याच मार्गावरुन "पांडुरंग हरी , पुंडलिक वरदे विठ्ठल" असे घोषवाक्य म्हणत जात असताना तो त्यांना दिसतो. अनेक जण आपापल्या आशा पुर्ततेसाठी विठ्ठलाच्या दरबारी चालले होते. 'माऊली' म्हणजे 'आई' त्या वारीमधील असंख्य आया त्याच्या मदतीला धावून आल्या. जवळच्या दवाखान्यात त्याला भरती करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी तपासले. यांच्या जीवाला खूप धोका निर्माण झाला आहे. डोक्यावर गंभीर मार लागला आहे. तात्काळ ऑपरेशन करावे लागेल. कोण आहे हा मुलगा ? यांच्या घराच्यांना माहिती आहे का ? कुठे असतात ? डॉक्टराच्या प्रश्नांची उत्तरे कुणाकडे नव्हती. सगळे स्तब्ध उभे होते. डॉक्टर म्हणाले, मला पोलिसांना कळवावे लागले. तरच पुढे काही करता येईल.

बालूची तब्येत खालावत चालली होती. क्षणाचा विलंब त्याच्या जीवावर बेतणार होता. वारकरी संप्रदायात काही महिला त्यांना मुल व्हावे यासाठी काही वर्षापासून वारी नित्य नियमाने करत होत्या. एक निरागस मुल रक्तबंबाळ अवस्थेत पाहून काही माऊलींच्या काळजाचे पाणी झाले. अलका, सुनंदा, यशोदा, राधा पुढे आल्या. त्याला आपल्या मांडीवर घेतले. आपल्या मायेचा पदर त्याच्यावर घातला. त्याला पाहून त्या सगळ्यांच्या मनात ममता जागी झाली. पोलीस अधिक्षक आणि त्याचा ताफा आला. सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला. पुढील प्रक्रिया सुरू झाली.

बालूला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. रक्तस्त्राव जास्त प्रमाणात झाल्यामुळे रक्ताची आवश्यकता होती. अचानक धावपळ सुरू झाली. काय चालले आहे कुणाला कळेनासे झाले होते. अलका ते पाहून खूप घाबरून गेली होती. "काय झाले नर्स ?" नर्स म्हणाली "रक्त हवे आहे. रक्त देणे गरजेचे आहे." तर लगेच क्षणाचा विलंब न करता अलका, सुनंदा, यशोदा, राधा पुढे आल्या, रक्त द्यायला तयार झाल्या. त्याच्या नवऱ्यांनी रक्त देण्यासाठी परवानगी दिली. त्यांना कळले होते, की त्यांच्यातील आई जागी झाली आहे. ज्या सुखासाठी किती वर्षे ते तरसत होते ते क्षणिक सुख त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागले. सगळ्यांनी ठरवले तो कुठे राहतो? कोण आहे? सगळे माहिती मिळवायची. त्याला आपले कुणीही या जगात नसेल तर त्याला आपल्या जवळ ठेवून घ्यायचे. सगळ्यांनी मिळून पालनपोषण करायचे.

पोलिसांनी तपास सुरू केला त्यांना खूप माहिती मिळाली आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला कुणीच नव्हते. सगळ्यांना आनंद झाला. त्याच्या ऑपरेशनाचा खर्च कसा करायचा. हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा अलका-रमेश, सुनंदा-राजेश, राधा-विनायक, यशोदा-सखाराम, सगळ्यांना ठरवले जो पण खर्च होणार तो करुया. त्यासाठी सगळे आपल्या घरदार गहाण ठेवायला तयार झाले. आयुष्य पण कधी कुणाला कुठे घेऊन जाईल कुणाला काही सांगता येणार नाही. तरीही आज लोकांना देवावर श्रद्धा आहे. आस आहे. या आशेवर जग कायम आहे. म्हणतात ना ! जिसका कोई नाही उसका खुदा है यारो ! त्याचे दर्शन येथे घडते. कोण कुठले ते वारकरी संप्रदाय, हा बालू ! देवाची लिला देव जाणे.

ऑपरेशन करायला डॉक्टरांनी सुरुवात केली. ऑपरेशन कठीण असल्याने सगळ्यांसाठी एक अग्निपरीक्षा होती. सगळे डॉक्टर आपापले ज्ञान अनुभव पणाला लावून काम करत होते. जराही कुठे गडबड झाली तर बालूच्या जिवाला धोकाही होऊ शकतो किंवा तो कोमात पण जाण्याची शक्यता होती. सगळे देवाकडे त्या अनोळखी मुलासाठी साकडे घालायला लागले. देवा त्या मुलाला लवकर बर कर ! जेव्हा अनेक प्रार्थना एक साथ साद घालायला लागतात. तेव्हा मग चक्क इंद्राचे सिंहासन डगमगायला लागले. तिन्ही लोकात एकच कंपन निर्माण होतो. सगळे देवीदेवतांना हादरून सोडल्याविना राहत नाही असा प्रार्थनेचा नाद तयार होतो.

अलका-रमेश, सुनंदा-राजेश, राधा-विनायक, यशोदा-सखाराम, सगळी मंडळी धनाढ्य होती असे नाही. उदरनिर्वाह करण्यासाठी वडीलोपार्जित शेत जमीन मशागत करून पोट भरायचे. पण माणुसकीच्या नात्याने ती धनाढ्य होती. हिच तर शिकवण संत संप्रदायाची ते अनुसरत होते. घरात जरी एक पोळी असेल जर दारात कोणी मागायला आले तर ती आपण न खाता त्याला अर्पण करायची ही आपली संस्कृती मग तर हा साक्षात इश्वराचा अवतार अशी समज असलेले ते मुल त्याला मरते सोडून वारीला जाऊन कुठे पुण्य मिळणार होते. उलट नरकातही जागा नाही मिळणार. आपल्या धर्मात शास्त्रात म्हटलं आहे. ते वारकरी असलेल्यानी केले. त्यात मग आश्चर्य कसले.

क्रमशः........


Rate this content
Log in