सागरी किनारा.. जगणं सांगून गेला
सागरी किनारा.. जगणं सांगून गेला
दोन तीन दिवस झाले पण मनिष कुठे सापडत नव्हता. त्यांच्या आईचा म्हणजे रेखाचा रडून रडून हाल बेकार झाला होता. वडील रमेश ही चिंताजनक स्थिती आज अडकले होते . एकीकडे बायको तर दुसरीकडे एकुलता एक मुलगा गायब होता. काय करावे काही सुचत नव्हते. हात पाय गळून पडले होते. आज ते इतके असह्य झाले होते की जणू आता थोडासं ही आवसान उरले नव्हते. एरव्ही असंख्य वादळाचा तडाखा बसलेला तो बेट आज जणू धाराशाही झाला होता. एक एक बुरुज आज धासळत होता. पण असे हिम्मत हारून कसं चालणार होते. त्याना मोठ्या हिमतीने समोर उभे राहयाच होत तेव्हा कुठे बाकीच्यांना बळ मिळणार होते हे ते जाणून होते.
सगळीकडे शोधून झाले होते. मित्रांकडे विचारुन झाले होते. पोलिसात तक्रार करून झाले होते पण सध्या तरी त्याचा उपयोग झाला नव्हता.आई देवघरात बसून होती. जणू ती देवाला ही आव्हाने देत म्हणत होती की इतक्या वर्षा मी भक्तीभावाने पूजा केली असेल तर त्याला सुपरुप घरी पोहचू दे किंवा तूच त्याला घरी घेऊन येशील नाही तर मी तुझे अस्तित्व मान्य करणार नाही. निर्जीव वस्तू मध्ये राहून तू ही चक्क दगडासारखा निर्जीव झाला आहे. बघते आज मी पण या आईच्या मायेनं तुझ्या अंतःकरणाला पाझर फुटते की नाही. आज जणू या हाकेने तिन्ही लोकांत हाहाकार माजला असेल त्याचं ही सिंहासन डगबगले असेल हे जाणवत होते.
इकडे मनिष मात्र आपल्या प्रेमाच्या आठवणी असा हरवला होता की त्याला स्वतःचे ही भान उरलं नव्हतं. तो त्या प्रत्येक जागी जाऊन तिला शोधत होता जि त्याला विसरून दुसऱ्याची झाली होती. स्वाती आणि मनिष लहान पणा पासून एकाच वर्गात होते. एकमेकांना समजून घेणारे होते. न बोलता एकमेकांच्या मनातलं ओळखणारे असे काहीसं नातं त्यांचं होतं. अगदी काॅलेज मध्ये तर "love birds' म्हणून प्रसिद्ध होते.एकमेकांंन सोबत आयुष्यभर राहू असे कितीतरी वेळा वचने दिली होती.
मनिष सर्व साधारण घरामधील होता. वडील दाल मिल मध्ये नोकरी करत होते. आई वडिलांना मदत होईल या उद्देशाने घरातूनच गृह उद्योग सांभाळायची. लोणचे, पापड, कुरडया, शेवया, फराळाचे पदार्थ आणि कुठे ऑर्डर मिळाली तर संपूर्ण खानाच्या व्यवस्था म्हणजे कॅटरिंग करत असे.आपल्या सारख्या गरिबीच्या तावडीत सापडलेल्या बायांना आपल्या परी रोजगार देऊन त्यांच्या आयुष्यातील थोडेसे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत असे. स्वाती मात्र एका उच्च शिक्षित घरातून होती. आई वडील उच्च पदावर कार्यरत होती. त्यामुळे गरीबीची झळ काय असते हे तिला कधी कळलंच नव्हतं.
काही दिवसांपूर्वी स्वातीच्या घरच्यांना या दोघा बदल कळलं तेव्हा त्यांनी यांचा विरोध केला. सुरुवातीला स्वातीला ही तो मान्य नव्हता. ती पळून जाऊन लग्न करायला पण तयार होती . तिची तसी सगळी तयारी झाली होती. पण घरच्यांना तिचा बेत कळला तिथंच घोडं फसलं. तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि काही दिवस घरात डांबून ठेवले. तिचे मत परिवर्तन करण्यात सुरुवात केली. तिला उद्याची स्वप्न दाखवल्या गेली. गरीबीची उदाहरणे डोळ्यासमोर दाखवून तिला पटवून दिल्या गेले की तुला असं आयुष्य जगणं श्राप आहे. शिवाय वैभवात वाढलेली ती तिला ही ते पटले. आईवडिलांनी त्यांच्या सारख्या उच्च शिक्षित वैभवशाली घरात तिचं लग्न जुळवले.
कितेक दिवसा पासून स्वाती आपल्या भेटली नाही.फोन ही उचलत नाही.मॅसेचा रिप्लाय देत नाही.खूप वेळा त्याने तिचे घर गाठले पण ते लोक दुसरीकडे शिफ्ट झाले होते. मनिषवर जणू पहाड कोसळले होते. जणू त्यांच्या श्वास कुणी हिरावून घेतला आहे असे जाणवत होते. तो वेड्यासारखा तिला शोधत होता. पण काही केल्या तिच्या पत्ता लागत नव्हता. सगळ्या मित्र मैत्रिणींना विचारून झाले होते. पण कुणाला ही काही कल्पना नव्हती. दोन तीन दिवसांपूर्वी पुजाचा फोन आला तिनं सांगितलं की स्वातीच आज लग्न आहे.तिला बोलावले आहे.तिने सगळा पत्ता सांगितला. तो क्षणाचा विलंब न करता तिला भेटायला गेला.पण नशीबाने साथ दिली नाही आणि तो त्या क्षणी पोहचला ज्या क्षणी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्या गेले होते. आज पुर्णतः दुसऱ्याची झाली होती. तिनं समोर त्याला बघताच नजर फिरवली. तो तसाच तिथून मागे वळला आणि त्या प्रत्येक जागी वेड्या सारखा तिला शोधत होता. जि त्याला आज लग्न मंडपात दिसली ती स्वाती नाही असं त्याचं मन सांगत होते. ती तर त्यांच्या जिवापाड प्रेम करणारी होती. त्यांच्यासाठी सगळ्या जगाशी लढणारी होती.
दोन तीन दिवसांपासून तो स्वतःला हरवून तिलाच शोधात होता. आठवणींच्या विश्वात जगत होता. धुसूर
झालेल्या खुणा पुन्हा पुन्हा बघत होता. ते सगळे मिटवण्याचा केवळाना प्रयत्न करत होता. आता त्याला सगळं असाह्य झाले अण् त्याने अथांग सागर कडे धाव घेतली.आता तो त्यात उडी घेणार तोच त्यांचा पाय अडखळला आणि तो तसाच जोरदार किनाऱ्यावर जमीनीवर पडला.बघतो तर काही क्षणापूर्वी जिथं एक पाय नसलेला भिकारी झोपला होता.तो हि दचकून उठून बघतो तर एक तरुण मुलगी काही अंतरावर वाटेत पडला होता.
कोण तू ? आता काय करतो? किती रात्र आली आहे.
जा घरी घरचे वाट बघत असतील.रात्री असं सागरी किनारपट्टी काही खरं नसतं लेकरा.. किती तरी वेळा येथे मी घात घातलेला पाहिलं आहे. काही तर जीवांनी गेले आहे. काही या सागरात कायमचे समावले पाहिले आहे आणि हो तू असा धाव घेत होता की या सागरात कायमचे हरवून जायचं. खरं ना ! काय रे! जीव इतका स्वस्त आहे का ? जो तुला संपवायचा ?
असं काय घडलं की जगणं सोडून मरणला स्विकारण्याची तयारी केली. मला बघ मी किती अभागा आहे. काही दिवसांच्या प्रेमासाठी जन्मा पासून प्रेम करणाऱ्या माऊली गमावून बसलो. प्रेमा मागे धावताना भान विसरून पळत सुटलो होतो . तिला थांबवण्यासाठी पण माझा अपघात झाला होता. तो इतका भंयकर होता. माझ्या मुळे कुणी तरी जीव सोडला होता.मी रस्त्यावर शुद्ध गमावून पडलो होतो. काय चालकाने मला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचे गाडीवरचे नियंत्रण सुटले मला धडक लागून तो रस्त्यावर येणाऱ्या दुसऱ्या वाहनावर आदळा ती दुसरी गाडी माझ्या पायावरून गेल्यानं असाह्य वेदनेत तडफडत बेशुद्ध झालो होतो.
वडील गेल्यावर आईने मोठ्या कष्टाने मला शिकवलं तिच्या म्हातारपणाची काठी म्हणून रक्ताचं पाणी करून मोठ केलं. मी मात्र दोन दिवसांच्या प्रेमासाठी सगळे विसरून तिला थांबवण्यासाठी वेडा सारखा धावत होतो. माझ्या अपघाताची बातमी कळताच तिच्या हृदयात जोरदार कळ आली आणि ती तिथं कोसळली. कायमच मला सोडून गेली होती. मी मात्र दवाखान्यात असाह्य वेदनेत तडफडत होतो. डाॅक्टरांना नाईलाजाने पाय शरीरापासून अलग करावे लागले.कारण अपघातात पायावरुन गाडी गेल्याने गंभीर दुखापत झाली पुर्ण शरीरात त्याचा परिणाम होऊन नये म्हणून पाय शरीरापासून अलग केले. मला शेवटचं तिला बघता आले नाही. आई कायमची गेली. आजूबाजूच्या लोकांनी सगळे केले.दोन दिवसांच्या प्रेमासाठी माझं आयुष्य संपलं होतं.पण तरी मी जगतो आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत आत्महत्या पाप सांगितले आहे. उलट आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन जो समोर जातो त्याला परमेश्वर नेहमीच साथ देतो.
बघ आज काय अवस्था झाली आहे माझी तरीही या सागरी किनारपट्टी वर याच दगडांच्या साह्यानं जगतो आहे.
कधी इथं तर कधी कुठे...पण तो परमेश्वर मला उपाशी झोपू नाही देत. जगतो आहे उरले आयुष्य जगताना त्याच नाव घेत. देवाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन आलेली वेळ घालवतो. पण तू का असे करतो. तुला जीव का जड झाला.
मनिषला सगळे ऐकल्यावर मन परिवर्तन झाले.आपली चुक लक्षात आली.तो त्यांना नथ मस्तकहून वंदन केले. काही न झाल्याचे भाव दाखवून तो घरी जायला निघाला.
घरी येताच आई वडील धावून मिठीत घेतले.त्याला कुरवाळत होतो. तिला आई मुके घेऊन हृदयाशी घेत होती.त्या दोघांचे प्रेम बघून कळलं की किती मोठी चुक केली होती. दोन दिवसांच्या प्रेमासाठी तो जन्मापासून त्यांच्या प्रेम करणाऱ्याना दुखवायला निघाला होता.किती निःस्वार्थ प्रेम असतं त्याचं जे कधी बदल नाही.. खरंच तो सागर किनारा मला आयुष्या किती सुंदर आहे. जगायला शिकून गेला....
