प्रयास
प्रयास


उन्हाने तापलेल्या मातीवर पावसाचे थेंब पडले. मातीचा सुगंध दरवळत होता हवेत गारवा निर्माण झाला होता.
पावसाने माती ओली झाली होती. पक्षीसुद्धा पंख फडफडत होते .आज सर्वांनाच हायसं वाटत होतं त्यात शाळेचा पहिला दिवस होता. मुलांना हे नवीन दप्तर नवीन पुस्तक नवीन पोषाख मिळाल्याचा आनंद होता. पाऊस पडू लागल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला. आई-बाबांची धांदल उडाली छत्र्या, रेनकोट शोधू लागले. काही मुलं भिजलेल्या स्थितीत रांगेत उभे राहिले. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात होते प्रत्येकाला गुलाबाचे फुल व चॉकलेट देऊन वर्गात घेत होते. मुले खुश होती. एक मुलगी आत येऊ लागली.
"अगं तू कुठे येतेस तुला दिसत नाही वर कशी चढणार ?"विद्या मॅडम म्हणाल्या.
"मॅडम मी शाळेत आले मी शिकणार आहे "
"अग तू दुसऱ्या शाळेत असशील या शाळेत नाही." "मॅडम मी या शाळेत प्रवेश घेतला आहे "सिंधू म्हणाली तेवढ्यात मुख्याध्यापक बाई आल्या
"विद्या मॅडम तिने आपल्या शाळेत ऍडमिशन घेतले आहे तिचे स्वागत करा. "
"अहो पण मॅडम."
" मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे ,आधी मुलांना वर्गात बसून घ्या "मुख्याध्यापक बाई म्हणाल्या
विद्या मॅडम मात्र विचार करू लागल्या. ही अंध मुलगी कशी शिकणार आम्ही फळ्यावर गणिते सोडवणार ते तिला कसे दिसेल गृहपाठ कसं करेल अनेक प्रश्नांचा भडिमार तिच्या डोक्यात सुरू होता.सिंधूचा हात धरून पहिल्या बाकावर बसवले. वर्गातले सर्व मुले तिच्या कडे पाहत होते कारण तिचे दोन्ही डोळे बंद होते पण ती सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न करत होती." विद्या मॅडम तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवले आहे" शिपाई निरोप घेऊन आला. तशा विद्या मॅडम ऑफिसमध्ये गेल्या.
"बसा मॅडम आपल्याला सिंधू ही मुलगी डिपारमेंट कडून आलेली आहे तिला ब्रेन लीपी येते तुम्हाला काहीच अडचण येणार नाही तिला आपण सांभाळून घेतले पाहिजे. "मुख्याध्यापक बाई म्हणाल्या.
"हो मॅडम मी प्रयत्न करीन "असे म्हणत विद्या मॅडम वर्गात गेल्या "एक साथ नमस्ते मॅडम"
सर्व मुले एकदम बोलली.
" नमस्ते खाली बसा चला. आज सर्वांची ओळख करून घेऊया सुरुवात सिंधू कडून करूया सिंधू सांग तुझी ओळख."
"माझे नाव सिंधू चव्हाण मला बाबा नाहीत मी आणि आई एकत्र राहतो. आई धूनी भांडी करते मी खुप शिकणार आहे मी शिक्षिका बनणार आहे आणि आईला मदत करणार."
" अरे वा !खुपच छान "मध्येच एक मुलगा उठला व म्हणाला "ही शिकवणार कशी "
"मला गाणे खूप सुंदर गाता येते मी संगीतात करियर करणार आणि संगीत शिकवणार "सिंधू म्हणाली.
तसा सर्व वर्ग स्तब्ध झाला. "सिंधू एखादं गाणं म्हणून दाखवतेस का "बाई म्हणाल्या .
"हो ."तिने लगेच गायला सुरुवात केली. तिचा मधुर आवाज मंत्रमुग्ध करणारा होता .सर्व जण थक्क झाले. आता सर्वजण हळूहळू तिच्याशी मैत्री करू लागले .सिंधू सर्वांबरोबर रमू लागली सर्वांची लाडकी झाली. शाळेत कार्यक्रम असेल तर सिंधूच्या आवाजाने पाहुण्यांचे स्वागत होई. पावणे तिचे कौतुक करत. वर्गात सुद्धा गणित शिकवताना लक्षपूर्वक ऐकत असे .ब्रेन लिपीच्या पाठीवर हात फिरवी चटकन उत्तर देई. "पहा सिंधू चटकन उत्तर देते तुम्हाला येत नाही."
त्यामुळे सर्व मुले खजील होत.
सिंधू सर्वांचे आता लाडकी झाली होती मुख्याध्यापक बाई तिची आवर्जून विचारपूस करीत. अंध असूनही नेहमी आनंदी असे .जसा फुलांचा सुगंध दरवळतो तसा तिच्या गुणांचा सुगंध दरवळत होता. जणू झाडाला नवीन पालवी फुटली होती हिरवी हिरवी गार पालवी मुळे निसर्ग फुलतो. मन उल्हासित होतं त्याप्रमाणे वर्गात सिंधू मुळे महत्त्व प्राप्त झालं होतं परंतु देवाला हे मान्य नसावं काही दिवसांनी तिची आई आजारी पडली. शाळा शिकण्याचे स्वप्न पूर्ण राहते काय असे तिला वाटू लागले .घरात ती हळू जेवण बनवायला शिकू लागली.आईला क्षयरोग झाला होता. ती सतत खोकत होती .औषधालाही पैसे नव्हते कारण आईचं काम बंद पडलं होतं. "अग तू एवढी आजारी आहेस कामावर कशाला येतेस "मेघना म्हणाली. "कामावर आले नाही तर माझी मुलगी मी काय खाऊ. माझी मुलगी उपाशी मरेल. तिला खूप शिकायचंय तिची इच्छा पूर्ण करायचे आहेत देव काही साथ देईनासा झाला."
" अग आई तू काळजी करू नकोस मी शिक्षिका होणारच तू लवकर बरी हो "सिंधू म्हणाली
"हो गं माझं गुणाचं बाळ. देव तुला यश देवो. "असे म्हणत तिने सिंधूला जवळ घेतले.
"अग सिंधू तू शाळेत का येत नाहीयेस मॅडम विचारत होत्या."
" अग पूजा काय करणार मी आई आजारी आहे ना तिच्याजवळ कोण बसेल ती झोपून आहे ताप खूप भरलाय"
". ठीक आहे मी तसं मॅडमला सांगते तू काळजी करू नकोस "असे म्हणत पुजा शाळेत आली." मॅडम सिंधूची आई खूप आजारी आहे त्याला ताप भरला आहे ती अजून चार-पाच दिवस येणार नाही"
." पूजा पण तिच्या घरी जेवण वगैरे आहे काय ?"
"माहित नाही तिची आई कामाला नाही जात ."
पूजा म्हणाली. "शाळा सुटल्यावर आपण तिच्या घरी जाऊयात "विद्या मॅडम म्हणाल्या
. शाळा सुटली. पूजा व विद्या मॅडम तिच्या घरी निघाल्या. "पूजा थांब आपण दुकानातून थोडं-थोडं साहित्य घेऊया".
साखर चहा पत्ती डाळ पीठ घेतले व सिंधू च्या घरी गेले." सिंधू "
"या मॅडम तुम्ही आमच्या घरी आल्या बसाना. हे घे थोडसं साहित्य."
" कशाला मॅडम मी जाणार आहे आईच्या कामावर." "अग तू कशी करशील काम"
"भांडी वगैरे घासता येतात मॅडम मलाआईने मला दूध तापवायला स्वयंपाक करायला घरची काम शिकवली आहेत. अंदाजाने जमतात मला सगळी कामं. स्वाभिमानाने जगायला शिकवले मला आईने." "ठीक आहे तुझी मोठी बहीण असं समाज आणि साहित्य ठेव.आईला औषध वगैरे आणलाय ना काळजी घे आम्ही निघतो "असे म्हणत मॅडम निघाल्या.
काही दिवस असेच गेले सिंधू पुन्हा शाळेत येऊ लागले शाळेचे वातावरण फुलून गेलं. कोणी शिक्षक नसेल तर तेव्हा त्या वर्गावरकविता गोड आवाजात म्हणून घ्यायची.विद्यार्थीही तिच्याभोवती आणखी दुसरी कविता म्हणून या असे म्हणत उड्या मारत श्रावणातल्या सरी बरसत निसर्ग कसा हिरवा गार होऊन जाईल पानं-फुलांना बहर येई तसं सिंधू शाळेत आले की होई. तिच्यामुळे शाळा आनंदी होई. मुलांमध्ये एक आदर्श शिक्षका सारखी सुंदर कविता गाऊन घेई. खरंच गानकोकिळा होती ती. पुन्हा सिंधू येईनाशी झाली. "पूजा सिंधु का येत नाहीये"
"आज तिच्या घरी जाऊन बघते "
पूजा म्हणाली शाळा सुटली पूजा सिंधूच्या घराजवळच पुढे जात असे जाता जाता तिने आवाज दिला" सिंधू शाळेत येत नाहीयेस"
सिंधू रडत होती. "आईला खूप जास्त झालंय दवाखान्यात न्यायला हवं पण आईच तयार होत नाहीये "
"थांब मी माझ्या आईला बोलून घेऊन येते"
पूजा म्हणाली "आई लवकर चल ना गं सिंधूच्या आईला खूप बरं नाहीये तिला दवाखान्यात न्यायला हवं "
"चल बरं काय झालं बघू या "आई म्हणाली .
दोघी भरभर चालत सिंधूच्या घरात आले" ताई काय झाले खूप ताप आलाय चटके बसत आहेत चला दवाखान्यात जाऊ या मी रिक्षा बोलवते तुम्ही काही काळजी करू नका फक्त चला "असे म्हणत पूजाच्या आईने रिक्षा बोलवले दोघींनी मिळून रिक्षात बसवले "पूजा तू थांब मी दवाखान्यात घेऊन जातो". पूजाच्या आईने सिंधूला व तिच्या आईला दवाखान्यात नेले "डॉक्टर पहा खूप ताप आहे."
बघू डॉक्टर तपासू लागले." यांना ॲडमिट करावे लागेल खुप उशीर झालाय औषध बरोबर खाल्लेली नाही. "डॉक्टरांनी सलाईन लावले. सिंधू दिवस-रात्र आईजवळ बसली होती. शेजारीपाजारीही मदत करत होते. औषधांचा काहीच उपयोग झाला नाही बरेच दिवस अंगावर काढले होते तिचा जीव सिंधू मध्ये अडकलेले होता.ती एकटक सिंधू कडे पहात होती "आई तू बरी होशील तू काळजी करू नकोस मी आहे ना मी शिक्षिका होणार मग तू मस्त आराम कर मला पैसेही मिळतील तुला कामाला जायची गरज नाही." सिंधू म्हणाली. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. क्षणभर असेच टक लावून पाहिले. डोळे तसेच राहिले डॉक्टर आले . "मुली आई राहिली नाही "सिंधू रडू लागली ते एकटी पडली होती. एखाद्या उन्मळून पडलेल्या झाडासारखी. पुन्हा उठण्याचा प्रयत्न करत होती. एखाद्या मूळ मातीत तग धरतय त्याप्रमाणे झालं होतं लक्ष एकच होता संगीत शिक्षक बनायचं प्रयास चालू होता संकट अनेक होती .त्यातूनही लक्ष वेधण्याचा प्रयास चालू होता.